पावस्करांची लगीनघाई पोरगीच मिळत नाही : पत्रकार हेमंत जोशी


पावस्करांची लगीनघाई पोरगीच मिळत नाही : पत्रकार हेमंत जोशी 

तुम्हाला हे माहित आहे का राज्याचे जलसंधारण मंत्री आणि राष्ट्रवादी चे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मनात जर एखादा निर्णय घ्यायचा नसेल अमुक एखादे काम जर त्यांच्या मनात करायचे नसेल तर ते समोरचा मग ते थेट शरद पवार जरी असले तरी त्यांच्याशीही असंबद्ध बोलून मोकळे होतात. म्हणजे पवार जर त्यांना म्हणालेत कि आपण अजितदादांना गृहमंत्री करूया तर हे म्हणतील, अमीर खानने काय काम केले आहे त्या थ्री इडियट मध्ये किंवा गावाकडे एखाद्याने त्यांना सांगितले कि आपण अमुक एका कार्यकर्त्याला तमुक करूया तर हे म्हणतात नाशिकच्या बुधाची जिलेबी, वा काय चव आहे त्याच्या जिलेबीला. शेवटी समोरचा जयंतरावांसमोर कंटाळतो आणि कोपऱ्यात जाऊन डोक्यावरचे केस उपटून मोकळा होतो. शरद पवारांच्या मनात गेल्या अनेक दिवसांपासून हेच आहे कि त्यांच्या पक्षात मुंबई अध्यक्षपद  मुस्लिमांकडून काढून घ्यावे म्हणजे नवाब मलिक यांना हटवावे कारण पवारांवर मुस्लिमांचे मसीहा हा शिक्का बसला आहे ज्यात फारसे वावगे नाही त्यामुळे मुस्लिमेतर मुंबई अध्यक्ष पवारांची आता ती गरज आहे. वादग्रस्त कट्टर नवाब मलिक यांच्या जागी मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर महापालिकेचा बऱ्यापैकी अभ्यास असलेले मुंबईची नेमकी माहिती ठेवणारे विधान परिषद सदस्य किरण पावसकर यांना नेमावे असे पवारांच्या मनात मनापासून आहे  पण जयंत पाटलांच्या अजिबात ते मनात नाही कि किरण पावसकर यांना मुंबई पार्टी अध्यक्ष नेमावे, किरण पावस्करांना काहीतरी करूनदाखविण्याची संधी दयावी….

अलीकडे जेव्हा केव्हा थेट शरद पवार गेल्या दोन महिन्यांपासून जयंतरावांची भेट झाल्यानंतर पावस्करांच्या नेमणुकीचा विषय काढतात, जयंतराव तो विषय खुबीने टाळतात. शरदरावांनी,  पावस्करांना मुंबई अध्यक्ष म्हणून नमूया, म्हटले रे म्हटले कि जयंतराव एकतर हवापाण्याच्या गप्पा मारतात किंवा विविध सांस्कृतिक विषयांवर गप्पा मारून तो विषय टाळून मोकळे होतात, इकडे त्यातून पावसकर गुढग्याला बाशिंग बांधून तयार आहेत पण जयंतरावांच्या मनात पावस्कर यांची वरात काढली पाहिजे असे आलेले नाही त्यामुळे हा गंभीर विषय पेंडिंग आहे. एखादा तरुण वय टळत  चालले कि लग्नासाठी उतावीळ असतो पण घरातले लक्ष देत नाहीत आणि एखादी पोरगी त्याच्या प्रेमात पडत नाही त्यामुळे या अशा तरुणांना जसे प्रदीर्घ काळ हस्तमैथुनावर अवलंबून राहावे लागते तसे हुबेहूब किरण पावसकर यांचे अस्वस्थ होऊन इकडून तिकडे आणि तिकडून इकडे येरझाऱ्या मारणे सुरु आहे. नेता उत्साही आहे, पैसेवाला आहे, धडाकेबाज आहे देखणा चिकना आहे मेहनती आहे राष्ट्रवादीशी शिवसेना सोडल्यानंतर लॉयल आहे, कामगार नेता असल्याने पावस्करांकडे चांगल्यापैकी संघटन कौशल्य आहे, मुंबईची खडान खडा त्यांना माहिती आहे त्यामुळे पावस्करांनी मनात आणले तर त्यांना सचिन अहिर यांच्यानंतर एक यशस्वी अध्यक्ष म्हणून पुढे येता येईल किंवा त्यांना त्यांच्या राष्ट्रवादीला कार्यकर्त्यांच्या, पैशांच्या बाबतीत अधिक श्रीमंत होणे सहज शक्य होईल पण जयंतरावांच्या ते मनात यायला हवे अन्यथा लग्नाचे वय टाळून गेलेल्या तरुणासारखी किरण पावसकर यांची अवस्था शोचनीय आणि दयनीय होईल, त्यांचे डोळे कायम डबडबलेले दिसतील, पाहायला मिळतील…

www.vikrantjoshi.com

जे उद्धव ठाकरे यांच्या दूरदूरपर्यँत देखील मनात नाही किंवा त्यांना जे जमणारे नाही ते शरद पवार मात्र करून मोकळे होताहेत. पवारांना धोका देऊन पवारांना प्रसंगी फसवून पवारांची राष्ट्रवादी सोडून जे गेले ज्यांनी मागल्या सरकारात पवारांना एकटे पाडण्याचा प्रयत्न केला त्यावर तुम्हाला तर ते माहीतच आहे कि अशावेळी शरद पवार यांचे वागणे सिनेमातल्या धर्मेंद्र सारखे असते, कुत्ते कमीने मै तेरा खून पी जाऊंगा पद्धतीचे पवारांचे तसे वागणे एखाद्याच्या बाबतीत निर्णय घेणे असते त्याचा अनुभव आता अनेक नेत्यांना आणि मीडियाला देखील येऊ लागला आहे त्यावर भास्कर जाधव यांचे उदाहरण पुरेसे आहे. ज्या भास्कर जाधव यांना पवारांनी राज्यमंत्री केले होते आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्षपद दिले होते ते उतावीळ जाधव पुढे त्यांच्याशी लॉयल न राहिल्याने आता भास्कर जाधव सेनेत असूनही त्यांचे राजकीय भवितव्य पुढे फार उज्वल आहे असे दिसत नाही कारण पवारांनी पाहुण्यांच्या काठीने त्यांना ठोकायला सुरुवात तर आधीच केली आहे त्यातूनच म्हणे अलीकडे जाधव यांना उद्धवजींच्या रत्नागिरी जिल्ह्यातील दौऱ्यात मंचकावर न बोलविता सामान्य लोकांमध्ये त्यांच्या बसण्याची व्यवस्था करण्यात आली होती त्यातूनच जाधव चिडले आणि भर सभेत तेही उद्धवजींच्या उपस्थितीत त्यांनी मंचकावर स्टेजवर येऊन विनायक राऊत यांच्याशी हुज्जत घातल्याचे उभ्या महाराष्ट्राने बघितले, जाधव यांचा राजकीय डाऊनफॉल तर सुरु झालेला नाही ?

क्रमश : हेमंत जोशी. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *