गाढव सारे १ : पत्रकार हेमंत जोशी

गाढव सारे १ : पत्रकार हेमंत जोशी 

मित्रांनो, 

तुमची इकडे तिकडे सगळीकडे नजर सतत भिरभिरत असते, पण गाढवाकडे कधी बघितले आहे का, गाढवांचे कधी निरीक्षण केले आहे का, माझ्या या प्रश्नावर तुमचे नेमके उत्तर असेल, नाय..नो..नेव्हर..


एव्हाना तुम्ही जर गाढवाकडे निरखून बघितले असते तर तुमच्या ते सहज लक्षात आले असते म्हणजे, घोडयाला राहायला तबेला असतो, माणसाला निवास करण्यासाठी घर असते, पक्षांसाठी घरटे असते, कुत्र्यांना तर तुम्ही थेट आपल्या घरात राहायला देता, अलीकडे तर ज्यांची पाळीव कुत्री लाडकी असतात अशा कितीतरी बायका नवऱ्याला जमिनीवर झोपवतात आणि पाळलेल्या कुत्र्यांना त्या कुशीत घेऊन झोपतात. देवा, पुढल्या जन्मी मला एखाद्या सुंदर स्त्रीच्या घरातले पाळलेले कुत्रे म्हणून जन्माला घाल रे बाबा..वाघ सिंहाला राहायला गुहा असते. गुरांना गोठा असतो. सापाला बीळ असते,पण जे गाढव आपल्या मालकांसाठी दिवसभर राब राब राबते. त्या मालकाने कधी त्या गाढवाच्या अंगावरून हात फिरविला, असे घडत नाही, ज्या गाढवाकडून मालक दिवसभर उन्हातान्हात वाट्टेल तेवढे काम करवून घेतो, रात्री ते गाढव कुठे उभे आहे, ते काय खाते, त्या गाढवाचे कोणतेही दुःख, त्याची चिंता मालकाला नसते, गाढव मारून पडल्यानंतर त्या गाढवाला उचलूनही म्युन्सिपाल्टीवाले नेतात, थोडक्यात कुठेतरी एखाद्या बेवारशासारखे अनाथासारखे मार खात सारी गाढवे रस्त्याच्या कडेला उभी असतात, टवाळखोरांनी येत जात मारायला सुरुवात केली कि पुन्हा काही क्षण निवांत घालविण्यासाठी दुसर्या रस्त्याच्या कडेला जाऊन 

उभी राहतात. गाढवाने काय खाल्ले तो कुठे आहे, त्याची चिंता मालकाला कधीही नसते कारण त्या मालकाला माहित असते, गाढव आपल्याला सोडून कुठेही जाणार नाही, सकाळी पुन्हा दारासमोर येऊन उभे राहील आणि कामाला सुरुवात करेल…


www.vikrantjoshi.com


या राज्यातल्या प्रत्येक राजकीय पक्षातल्या सामान्य कार्यकर्त्यात आणि कुंभाराच्या गाढवतात अजिबात फरक नाही, कमालीचे साम्य आहे, मी सांगितलेली गाढवांची व्यथा सामान्य कार्यकर्त्यांना, वाचून बघा, तंतोतंत लागू पडते. म्हणून कोणत्याही राजकीय पक्षात कुंभार व्हायचे असते, गाढवांचा तोटा नसतो. प्रत्येक पक्षातले नेते त्यांच्या कार्यकर्त्यांना नियमित सतत आयुष्यभर कायम एखाद्या गाढवासारखे आधी दिवसभर राबवून घेतात नंतर बेवारस ओडून मोकळे होतात कारण नेत्यांना माहित असते हे गाढव पुन्हा सकाळी माझ्या दारासमोर येऊन तेही हात जोडून गोंडा घोळत उभे राहणार आहे…


बायकोपेक्षा प्रेयसी होणे अधिक चांगले असे जे अनेक विवाहित स्त्रियांना वाटते ते तसे या राज्यातल्या बहुसंख्य सामान्य संघ स्वयंसेवकांना आणि भाजपा मधल्या सामान्य कार्यकर्त्यांना वाटू लागलेले आहे कारण बायको आणि प्रेयसीसारखे जे जे नेते राष्ट्रवादी पक्षातून किंवा अन्य राजकीय पक्षातून सर्वसामान्य निरंजन डावखरे यांच्यासारखे नेते भाजपामध्ये येतात असे सारेच्या सारे मग ते विनायक मेटे असतील, राजेंद्र गावित असतील, भारती लव्हेकर, राम कदम, प्रवीण दरेकर, नारायण राणे, प्रसाद लाड असे कितीतरी कि ते भाजपा मध्ये आले रे आले कि लगेच पुढल्या क्षणी त्यांना काहीतरी मिळते. म्हणजे पत्नी बाहेर कुठेतरी रस्त्यावर उभी असते आणि प्रेयसी महालातल्या पलंगावर विराजमान असते, मात्र जे तुरुंगात जाऊन आले, घरची भाजी 

भाकरी खाऊन रस्त्यावर उतरले, पक्ष वाढीसाठी सतत झटले, आजही झटताहेत ते सामान्य कार्यकर्ते दुर्लक्षित केले जातात, हे असे कदाचित भाजपा संघ वर्तुळात मोठ्या प्रमाणात घडत असेल पण इतरही राजकीय पक्षात हुबेहूब तसेच घडते आहे, सामान्य कार्यकर्ते सतरंज्याउचलण्यापुरते, बाहेरून आलेले नेते किंवा नेत्यांचे कटुम्ब सदस्य, या राज्यातले दलाल, कंत्राटदार, अमराठी व्यापारी मजेत आहेत, त्यांना प्रत्येक राजकीय पक्षात किंवा संघटनेत महत्वाचे स्थान आहे, स्थान असते आणि सामान्य कारकर्ते फक्त आणि फक्त गाढव म्हणून आयुष्याच्या अखेरपर्यंत जगून मोकळे होतात कारण सारेच नेते त्या सुनील तटकरे यांच्यासारखेच, जसे तटकरे यांना कायम स्वतःला, स्वतःच्या कुटुंबाला, भावाला, भावाच्या कुटुंबाला पदे वाटून मोठे केले. श्रीमंत केले तेच इतर नेत्यांना करायचे असते, रोह्यातल्या कार्यकर्त्यांच्या पदरी तटकरे टाकतील त्या तुकड्यावर समाधान मानायचे असते. आणि सारेच तटकरे, तटकरे हे एक उदाहरण दिले. कधी तटकरे असतील तर कधी मोहिते पाटील कधी अलिबागचे पाटील असतील तर कधी अकोल्यातले बाजोरिया, सार्या नेत्यांना त्यांच्या सामान्य कार्यकर्त्यांना म्हणाल तर रांडेसारखे म्हणाल तर गाढवासारखे सतत कायम सदा सर्वदा राबवून घ्यायचे आहे, रांडेसारखे वापरून घ्यायचे, नंतर रस्त्यावर सोडून द्यायचे असते. जे शरद पवार यांनी केले म्हणजे बदमाश बदनाम हलकट करप्ट नेत्यांना आणखी आणखी मोठे केले आणि कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष केले तेच सतत सगळीकडे घडते आहे. पुन्हा एकदा, कुंभार व्हावे, गाढव होऊ नये. वसंत डावखरे व्हावे, ठाण्यातले सामान्य कार्यकर्ते म्हणून जन्माला येऊ नये, त्यांचा गजानन देसाई होतो, पण समस्त नेत्यांनी कायम एक लक्षात ठेवावे, आपल्या कार्यकर्त्यांना सदोदित उल्लू बनवू नये अन्यथा जे राष्ट्रवादी पक्षाचे ठाणे जिल्ह्यात आज झाले ते तसे होते, अगदी मागल्या केवळ पाच वर्षांपूर्वी ठाणे जिल्ह्यात राष्ट्रवादी पार्टी टॉपला होती, आज जवळपास राष्ट्रवादी पक्षाचे जे मुंबईत नगण्य स्थान आहे तेच ठाणे जिल्ह्यातही झालेले आहे, पवारांनी ठाणे हातातून घालविले आहे, कारण सामान्य कार्यकर्त्यांना त्यांनी या जिल्ह्यात गाढव करून ठेवले आहे, ठेवलेले होते. एखादेच त्या आव्हाडांसारखे, कसेबसे आपले स्थान टिकवून आहेत. इतरांचे त्या सचिन आहेर यांच्यासारखे आहे म्हणजे ठाणे जिल्ह्यातले राष्ट्र्वादीतले उरले सुरले पक्ष सोडून जाण्याच्या मनस्थितीत आहेत. मुंबईत जशी राष्ट्रवादी पार्टी नरेंद्र वर्मा, सचिन अहिर, संजय दीना पाटील यांच्यापुढे सरकलीच नाही तेच पवारांच्या हातून ठाण्यात घडले जे सहसा त्यांच्याबाबतीत क्वचित घडते पण घडले आणि ठाणे जिल्ह्यातले सारे संपले…

क्रमश:


पत्रकार हेमंत जोशी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *