रा. स्व. संघ : काल आज आणि उद्या: पत्रकार हेमंत जोशी

रा. स्व. संघ : काल आज आणि उद्या: पत्रकार हेमंत जोशी 


सुरुवातीला काही चुटके सांगून या लेखाची सुरुवात करतो. 

नानू पाटलाचा बंड्या कोणतेही चित्र एवढे हुबेहूब काढायचा कि ती जिवंत वाटायची. एक दिवस गुरुजी नानूला फोन करून म्हणाले, तुमच्या बंड्याने सशाचे रांगोळीने जमिनीवर एवढे हुबेहूब चित्र काढले कि मी तो जिवंत ससा समजून धरायला गेलो नि खरवडल्याने माझी नखे तुटून पडली. त्यावर नानू गुरुजींना म्हणाला, हे तर काहीच नाही. ऐन दिवाळीत बंड्याने सनी लिओनीचे चित्र काढून ते विजेच्या बोर्डवर चिकटवून ठेवले, जवळपास कोणी नाही हे बघून मी सनीचे चुंबन घ्यायला गेलो आणि आता ऐन दिवाळीत तुमच्याशी थेट आयसीयू मधून बोलतो आहे. 

आणखी एक चुटका. याच बंड्याला नानू सकाळी सकाळी बदडून काढतांना विचारता झाला कि अगदी खरे सांग, शेजारची कविता तिच्या घरातून तुला नको नको त्या घाण घाण शिव्या का घालत होती? त्यावर बंड्या एवढेच म्हणाला कि आपण चहा घेतांना कोणी आले तर माणुसकी म्हणून चहा घेता का विचारतो किंवा जेवतांना कोणी घरात डोकावले तर या जेवायला म्हणतो तेच कवितेच्या बाबतीत घडले, मी झोपण्यासाठी पलंगावर जाण्याची आणि तिची आपल्या घरात डोकावण्याची वेळ एकत्र आली, माणुसकी म्हणून मी विचारले, येतेस का… 

अनेकदा तुम्हाला आजवर सांगून झाले कि मी कट्टर हिंदुत्ववादी आहे पण इतर धर्मांविषयी मनात राग नाही फक्त माझे विशेषतः  हिंदू तरुण तरुणींना एवढेच सांगणे असते कि त्यांनी पर जातीमध्ये विवाह करायला हरकत नाही मात्र त्यांनी कटाक्षाने परधर्मीयांशी लग्न करून मोकळे होऊ नये विशेषतः हिंदूंनी मुस्लिमांशी लग्न तर अजिबात करू नये कारण तेथे लव्ह जिहाद नामक प्रकार प्रामुख्याने असतो ज्यामुळे बहुतेक अशा विवाहातून विशेषतः हिंदू तरुणी उध्वस्त होतात, आयुष्यातून उठतात, विशेष म्हणजे पाश्चिमात्य देशातल्या भारतीय हिंदू आई वडिलांसमोर देखील लव्ह जिहाद हि फार मोठी समस्या आहे, तेथेही त्यात अडकलेल्या मुली शंभर टक्के उध्वस्त झाल्या आहेत. त्यामुळे निखिल वागळेंसारखे अक्कलशून्य हिंदू जेव्हा तुम्ही माझ्याकडे या मी तुमचा परधर्मीयांशी विवाह लावून देतो म्हणतात तेव्हा अशा नालायकांना शंभर मारा आणि एक मोजा वरून सांगा कि जा आणि तुझ्या मुलाचे हिम्मत असेल तर भेंडी बाजारातल्या एखाद्या तरुणीशी लग्न लावून दाखव. आणि ते शक्य नाही कारण मुस्लिम तरुण तेवढे लव्ह जिहाद मध्ये अडकलेले असतात त्यांच्या मुलींमध्ये ती हिम्मत नाही. क्वचित खचित त्यांचे जातीबाहेर हिंदूंशी लग्न लावल्या जाते किंवा त्या लग्न करून मोकळ्या होतात… 

परीक्षेतील एक प्रश्न असा होता कि, पुढील वाक्याचा भावार्थ लिहा : बँकांमध्ये कोट्यवधी रुपयांचे घोटाळे झालेत पण दोरीला बांधलेला पेन मात्र तसाच राहिला. एका प्रतिभावंत विद्यार्थ्याने लिहिलेले उत्तर पुढील प्रमाणे होते, लक्ष्मीला लोक चोरून नेऊ शकतात पण सरस्वतीला नाही. मित्रांनो, रा. स्व. संघाच्या माध्यमातून असे उत्तम संस्कार हमखास दिले जातात म्हणून जेथे जेथे या राज्यात संघाच्या शाळा आहेत आणि शाखा आहेत, निदान दहावी पास होईपर्यंत तरी म्हणजे मुलांचा पाया मजबूत विचारांचा घडेपर्यंत तरी त्यांना संघ संस्कार जेथे केले जातात तेथे अवश्य पाठवा, एकदा त्यांना त्यांचे समजायला लागले कि त्यानंतर मात्र त्यांना अडवू नका पण पाया मजबूत असला कि तुमची मुले कोठेही असली तरी आपल्यावर शक्यतो पश्चाताप करण्याची वेळ येणार नाही. रा. स्व. संघाच्या बाबतीत एक मात्र मला कायम खटकते ज्यात संघाच्या वरिष्ठांनी देखील गंभीर दाखल घेऊन काही अत्यावश्यक बदल घडवून आणण्याची मोठी गरज आहे. आणि हा अत्यंत अत्यंत महत्वाचा मुद्दा असा कि जोपर्यंत एखादी व्यक्ती संघ स्वयंसेवक म्हणून संघात काम करते तीच व्यक्ती जेव्हा संघ सोडून राजकीय प्रवाहात उतरते त्यानंतर त्यातले बहुतेक सारेच अपवाद नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस योगी आदित्य असे बोटावर मोजण्याइतके सोडल्यास बहुसंख्य करप्ट राजकीय नेते म्हणून बदनाम होतात, थोडक्यात रा. स्व. संघाचे पूर्व संस्कार विसरून तेही इतर नेत्यांसारखे भ्रष्ट मार्गाचा अवलंब करतात. अगदी या राज्यातला कोणताही संघ स्वयंसेवक नजरेसमोर आणा जो पुढे सक्रिय राजकारणात उतरला आहे… 

क्रमश: हेमंत जोशी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *