तटकरेंचे समग्र १ : पत्रकार हेमंत जोशी

तटकरेंचे समग्र १ : पत्रकार हेमंत जोशी 


मुले मोठी झाल्यानंतर मी नेहमीच त्यांना सांगत आलोय कि माझाही तुम्ही शरद पवार करू नका म्हणजे मुलांनी नालायक निघायचे आणि बापाने त्यांची उतार वयातही लफडी निस्तरता निस्तरता घाम गाळत भिका मागत फिरायचे. पवारांचे हे असे झाले आहे म्हणून त्यांना पवारांचे उदाहरण देतो.राष्ट्रवादी म्हणजे पवारांचे कुटुंब, या कुटुंबातले जवळपास सारेच सदस्य नालायक निघाले, त्यांनी पक्ष संपविला आणि स्वतःचे तेवढे भले केले, सारेच अजित पवार निघाले, आर आर आबा, गुरुनाथ कुलकर्णी असे चार दोन तेवढे बरे होते पण तेही मेले. सुंदर बायको चालू असली कि तिचा नवरा हातचे काम सोडून दिवसभरात उगाचच चार दोन वेळा घरात डोकावून जातो, पवारांचे हे असे चालू बायकोच्या नवऱ्यासारखे झाले, पक्षातले जवळपास सारेच नेते भयंकर चालू लबाड भ्रष्ट व्यसनी राज्यद्रोही, लुटेरे निघाल्याने चालू बायकोच्या नवऱ्यासारखे पवारांना तिकडे दिल्लीतले दुकान मस्त सुरु असतानाही येथे या राज्यात वारंवार यावे लागत असे, आणि सत्ता गेल्यानंतर तर शरद पवारांचा दिल्लीशी, देशाशी जणू काही संबंधच नाही एवढी अवघड बिकट अवस्था त्यांच्या हाताखालच्या नेत्यांनी त्यांची करून ठेवली आहे, वाईट वाटते….

शरद पवारांचा त्यांनी ज्यांना घडविले, मोठे केले, सत्ता दिली, पैसे मिळविलेले,त्या सर्वांनीच सुलोचना, प्रदीपकुमार, भारत भूषण करून ठेवला आहे, ज्या वयातत्यांनी घडविलेल्या वाढविलेल्या दुसऱ्या फळीतल्या नेत्यांचे कौतूक कार्य बघावे त्या सर्वांचे केलेल्या लफड्यांचे निस्तरने एवढेच काम त्यांना उरले आहे. एक मात्र नक्की भुजबळांना तटकरे अजितदादा किंवा तत्सम नेत्यांसारखे वागणे जमले नाही त्यामुळे आज त्यांची वाट अधिक बिकट झाली, अन्यथा जसे विजय गावित सुनील तटकरे अजितदादा तुरुंगाबाहेर राहून मजा मारताहेत तशी मजा भुजबळ काका पुतण्यांनाही मारता आली असती, मी त्यांना माझे नेहमीचे वाक्यही म्हणालो होतो कि पवारांच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करणे म्हणजे गाढवाच्या ढुंगणाला बाम चोळण्यासारखे आहे, अशी लाथ बसेल कि अख्खे त्रिभुवन तुम्हाला आठवेल आणि तेच घडले, भुजबळांनी नको ते विनाकारण केले, पवारांना आव्हान देण्यासाठी म्हणून त्यांनी उभ्या केलेल्या महात्मा समता परिषदेचे आधी दिल्लीत अधिवेशन घेतले नंतर पाटणा मध्ये त्यांनी आपली ताकद काय आहे ते पवारांना दाखवून दिले, तेथूनच शारदरावांचे डोके फिरले, पुढे लवकरच भुजबळ यांचे आणि त्यांच्या समता परिषदेचे बळ संपले, आता भुजबळ राजकारणातून नो व्हेअर झाले, कायमसाठी आणि भुजबळांच्या पश्चात समता परिषदेची देखील घडी पार विस्कटली, आता ती आठवतही नाही…

येथे मात्र भुजबळ किंवा तत्सम नेत्यांचा राग येतो आणि पवारांची परखड बाजू यासाठी घ्यावीशी वाटते कि ज्या पवारांनी या अशा नेत्यांना घडविले, सर्वार्थाने मोठे केले त्याच पवारांना राजकारणातल्या तुमच्या मसिहाला जर तुम्ही संपवायला किंवा तुमचे महत्व वाढवून त्या पवारांनाच तुम्ही शह द्यायला निघालात तर ते शरद पवार आहेत, राजकारणातले डॉन आहेत, शेवटच्या श्वासापर्यंत स्वतःचे महत्व आणि अस्तित्व टिकवून ठेवणारे आहेत मग हे महागुरू का म्हणून तुम्हाला त्यांच्यापुढे जाऊ देतील, प्रसंगी अजित पवार जरी अति शहाणे व्हायला लागलेत तरी, होय ! एक वेळ तर अशी आली होती कि ज्या अजितदादांना शरद पवारांनी डोक्यावर बसविले त्याच काकांच्या डोक्यावर मुतून ठेवण्याची हिम्मत दादांनी केली होती, तेथूनच पुढे सुप्रिया राजकारणात उतरल्या, घरातल्या अन्य अभिजित पवारांसारख्या नातलगांनाही याच शरदरावांनी मग ताकद देण्यास सुरुवात केली होती, बरे झाले अजितदादा चार पावले मागे आले अन्यथा त्यांचा केव्हाच भुजबळ झाला असता….आणि हे असे कठोर वागतांना शरद पवार चुकले हे म्हणणेही व्यर्थ ठरवले. अहो, माझा राजकारणाशी तसा काय संबंध पण जो आयुष्य घडविताना कुठेतरी आपल्यासाठी धावून आलेला असतो त्याचे ऋण जपावे असे मला वाटते. येथे मुंबईत आल्यानंतर हे विश्व उभे करतांना जी काही माणसे माझ्यासाठी वेळोवेळी धावून आलीत त्यातलेच एक शरद पवार होते, आधी मी त्यांच्या खूप जवळ होतो, नंतर त्यांनी मला दूर केले, बाजूला केले, अर्थात मला त्याचे काही वाटले नाही, वाईटही वाटले नाही, आपणच कुठेतरी काहीतरी चूक केली अशी मनाची समजूत मी करवून घेतली आणि पुढल्या कामाला लागलो पण अनेकदा पवारांना अडचणीत आणू शकतील अशा कित्येक भानगडी माझ्याजवळ पुरावे असतांनाही मी त्या उघड केल्या नाहीत कारण नेमके तेच होते आपण पवारांचे खाल्ले आहे, त्यांना नागडे करणे योग्य ठरणार नाही, त्यांनी मला केलेलं सहकार्य अगदीच फुटकळ होते पण असे कितीतरी आहेत ज्यांना शरद पवार यांनी अतिशय उत्तमरीत्या उभे केले आहे. अगदी अलीकडे “एकच वादा अजितदादा” अशा भरभक्कम जाहिराती करणारे अमळनेर येथील साहेबराव पाटील आणि कुटुंब जेव्हा भाजपाला बिलगून मोकळे झाले, तोंडात बोटे घालणे तेवढेच आमच्या हाती उरले, अर्थात अमळनेरच्या पाटील हे तसे फुटकळ उदाहरण पण खूप मोठे झालेले असे कितीतरी जे बाहेर पडले आहेत, पवारांना ठेंगा आणि वाकुल्या दाखवून….

शीट ! विषय आहे सुनील तटकरे यांनी यांच्यावर यांच्यासाठी यांचे अलीकडे निघालेले काढलेले काढून घेतलेले, लिहून घेतलेले ‘ समग्र’ हे श्रीमंत पुस्तक, त्यावर लिहिणे राहिले बाजूला आणि विषय भलतीकडेच भरकटला म्हणजे मधुचंद्राला बायकोला नेण्याऐवजी शेजारच्या शीला काकूंना नेण्यासारखे किंवा मनाचे श्लोक म्हणता म्हणता मध्येच कोकशास्त्र वाचायला घेण्यासारखे. 

खरी मजा पुढल्या भागात….

क्रमश:


पत्रकार हेमंत जोशी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *