विदर्भातील राज्यमंत्री पाटील : पत्रकार हेमंत जोशी

विदर्भातील राज्यमंत्री पाटील : पत्रकार हेमंत जोशी 

आधी थोडेसे चावट… 


लहानपणी आपण चुकलो, 

असे आता वारंवार वाटते कारण, 

जेव्हा कुलकर्णी मॅडम विद्या बालन 

स्टाईलने पदर सावरून, फळ्यावर 

लिहून, हसून विचारायच्या,

सगळं दिसतंय ना…

तेव्हा आम्ही निरागस मनाने

म्हणायचो, 

मॅडम खालचं काहीच दिसत नाही, 

कधी कधी त्या हे देखील म्हणायच्या, 

माझा पिरियड संपला कि वाट्टेल तो 

गोंधळ घालायला तुम्ही मोकळे…

पण माझे पिरियड सुरु असतांना, 

तुम्ही काहीही करायचे नाही…

मूर्ख आमच्यासारखे आम्हीच, 

अर्थ अलीकडे कळायला लागले..

आता थोडेसे गंभीर : 

जसे मुंबई नंतर पुणे तसे विदर्भात नागपूरनंतर अकोल्याला महत्व आहे, म्हणजे उद्या विदर्भ राज्य वेगळे झाले तर अकोला विदर्भाची उपराजधानी असेल हे मधुकर कांबळे यांच्यासारखा सामान्य वकूब असलेला राजकारणी नेता देखील सहज सांगेल. अर्थात अकोल्याचे नेते मधुकर कांबळे पैसे खाण्यात सामान्य कि असामान्य हे पुढल्या काही दिवसात जेव्हा मुंबईतील अण्णाभाऊ साठे स्मारक उभे करतांना किंवा केल्यानंतर नेमके कळेल कारण त्यांच्यामुंबई एस.आर.ए मधल्या भेटीगाठी मित्रवर्य आमदार श्रीकांत देशपांडे यांना सोबतीला घेऊन अलीकडे वाढल्या आहेत. तर अकोला हे राजकीय आणि आर्थिक दृष्ट्या तसे विदर्भातले पुणे म्हणून येथल्या स्थानिक राजकारणाला देखील तसे वलय आणि महत्व असते. संपूर्ण अकोला जिल्हा अलीकडे सेना, आंबेडकर गट, राष्ट्रवादी इत्यादींना संपवून ज्या झपाट्याने वेगाने भाजपामय झालेला आहे, भाजपा प्रेमींना हेच वाटते कि या उत्तुंग यशाला यापुढे गालबोट लागू नये पण गालबोट लागेल असे दिसतेय कारण या जिल्ह्यातले दोन दिग्गज मामा भाचे म्हणजे आमदार रणधीर सावरकर आणि खासदार संजय धोत्रे, का कोण जाणे त्या राज्यमंत्री रणजित पाटलांवर दात ओठ खाऊन आहेत, पाटलांना खावे का गिळावे हे असे त्यांचे अगदी उघड वागणे आहे म्हणजे अमुक एखादे कुत्रे जरी रणजित पाटील गटाचे आहे असे जर मामा भाच्यांना सांगितल्या गेले तरी ते त्या कुत्र्याला काठीने बदडून काढतील एवढे त्यांना त्यांच्याच पक्षाचे रणजीत पाटील नकोसे झालेले आहेत….

महापालिका असलेल्या अकोला शहराला बिधानसभेचे दोन मतदार संघ, पैकी अकोला पूर्व विधान सभा मतदार संघाचे रणधीर सावरकर हे आमदार आहेत तर अकोला पश्चिम विधान सभा मतदार संघाचे सतत कायम निवडून येणारे आणि ज्यांना विदर्भाचे ‘ गणपतराव देशमुख ‘म्हणावे ते गोवर्धन शर्मा आमदार आहेत. जोपर्यंत या राज्यातले पुढारी अधिकारी पत्रकार पोलीस आपल्या कुटुंबासाठी नव्हे तर लोकांच्याभल्यासाठी कर्तव्य पार पाडणार नाहीत, हे राज्य पुढे जाणे अशक्य आहे, पुढे जाऊन असे म्हणावेसे वाटते कि जोपर्यंत या राज्यातले सारे मान्यवर गोवर्धन शर्मा, गणपतराव देशमुख, भाऊ तोरसेकर, तुकाराम मुंडे यांच्यासारख्या देशभक्तांच्या रांगेत बसण्याचे ठरविणार नाहीत, हे राज्य कधीही यशवंतराव चव्हाण नामें पैसे न खाणाऱ्या देशभक्त नेत्याचे स्वप्न पूर्ण करणार नाही, सतीश मुंडे यांच्यासारखे राज्यविके अनेक सत्तेच्या राजकारणात दिसतील पण दिसायला हवेत प्रवीण दीक्षितांसारखी माणसे, ज्यांचे स्वप्न केवळ हे राज्य पुढे नेण्याचे असावे, स्वतःचे घर भरण्याचे नसावे…

गोची मात्र मुख्यमंत्र्यांची होते, देवेंद्र फडणवीसांची होते कारण त्यांचे रणजीत पाटलांवर मनापासून प्रेम आहे म्हणून त्यांच्यासाठी आग्रहाने राज्यमंत्रीपद त्यांनी श्रेष्ठींकडे मागून घेतले पण त्याचवेळी बुद्धीने तल्लख आणि उच्चशिक्षित रणधीर पाटील आणि बुजुर्ग साधे सरळ गोवर्धन शर्मा हे दोन्ही आमदार मुख्यमंत्री फडणवीसांना तेवढेच महत्वाचे आणि जिव्हाळ्याचे त्यामुळे अनेकदा फडणवीसांची एक बायको आणि दोन प्रेयसी असलेल्या चावट नवऱ्यासारखी फजिती होते, इकडे बघितले कि ती रुसते आणि तिकडे बघितले कि हि फुगते, अशी काहीशी द्विधा अवस्था मुख्यमंत्र्यांची कायम होत आली आहे, तारेवरची कसरत नेमकी कशी असते हे येथे मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत हमखास बघायला मिळते. सहज शक्य असूनही याच जिल्ह्या लगतचे नामवंत प्रभावी आमदार राजेंद्र पाटणी यांच्या मुलीच्या विवाहाप्रीत्यर्थे मुंबईत ठेवलेल्या स्वागत समारंभाला नामदार रणजीत पाटील मुद्दाम कि काय आले नाहीत, असे त्यांच्याकडून का घडते म्हणजे माणसे सांभाळणे त्यांना का जड जाते, नेमके कळत नाही. काहीशा हळव्या मनाचे आणि उच्चशिक्षित असलेले रणजीत पाटील नेमके असे गाफील वागले कि काही माकडांच्या हाती कोलीत आपोआप जाते, कृपया सावरकर आणि धोत्रे या दोघांचेही आधीच्या वाक्यात नाव जोडून माझ्याविषयी त्यांचे मत वाईट करून देऊ नये, माकडे वेगळीच आहेत….


अकोला जिल्ह्यातले, शहरातले आपले अस्तित्व राखण्यासाठी जो तो नेता व्यक्तिगत लढतो आहे म्हणजे सावरकर शर्मा किंवा धोत्रे आमदारकी खासदारकी पुढल्यावेळी टिकवण्यासाठी दिवसरात्र लोकात राहून कामे करताहेत तेच रणजीत पाटलांच्या बाबतीतही घडते आहे म्हणजे त्यांचे अत्यंत यशस्वी जनता दरबार तसे त्यांच्या वैयक्तिक लोकप्रियतेचे मानांकन आहे पण या सर्व नेत्यांचे त्यांच्या भाजपा पार्टीसाठी सांघिक प्रयत्न शून्य आहेत असे स्पष्ट चित्र अगदी उघड दिसते आहे, त्यामुळे या नेत्यांच्या आपापसातल्या अनागोंदीचा गैरफायदा कोणत्याही बेसावध क्षणी एखादा बेरकी नेता अगदी सहज घेऊन अकोल्यातील भाजपा अडचणीत आणू शकेल असे अलीकडे अनेकांना अनेकदा जाणवू लागले आहे….

क्रमश:


पत्रकार हेमंत जोशी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *