उद्धवजी इकडे लक्ष घाला : पत्रकार हेमंत जोशी


उद्धवजी इकडे लक्ष घाला : पत्रकार हेमंत जोशी 

अत्यंत महत्वाचे सांगतो, शिवसेनेत राज्य नेमके कसे चालवावे याचे नेमके प्रशिक्षण असलेले फारसे कोणीही नाही, आघाडीतले इतर घटक पक्ष नेमका आणि योग्य सल्ला उद्धवजींना द्यायला कोणीही तयार नाही थोडक्यात शासनातले सिक्रेट्स सांगायला राष्ट्रवादी आणि काँग्रेसवाले अजिबात तयार नाहीत म्हणून उद्धवजी बरेचसे राज्याच्या मुख्य सचिवांवर म्हणजे अजोय मेहता यांच्यावर अवलंबून आहेत त्यामुळे अजोय मेहता आणि पुण्याचा भोसले बंद दरवाज्याआड जे ठरवितात ते तसे उद्धव यांना सल्ला देऊन मेहता मोकळे होतात, उद्धवजींचे मन यादिवसात मेहता पूर्णतः जिंकण्यात यशस्वी ठरले आहेत जे अयोग्य आहे असे मी अजिबात म्हणणार नाही कारण मेहता हा शासन व प्रशासनातील नक्की बाप माणूस आहे फक्त अडचण तेवढीच आहे कि तो भोसले हाच १९९५ ते आजतागायत भिंती आड राहून त्याला हवे तसे हे राज्य शेकाटतो आहे मग सत्तेत कोणत्याही विचारांचे कुठल्याही पक्षाचे सरकार असले तरी. उद्धवजींच्या बाबतीत हा अत्यंत कठीण परीक्षेचा काळ आहे, लग्न व्हावे आणि पुढल्या चार दिवसातच एखादी तरुणी विधवा व्हावी तसे उद्धव ठाकरे यांच्याबाबतीत घडले आहे. दुर्दैवाने एकतर विधान सभा निवडणूक आटोपल्यानंतर सुरुवातीचे चार महिने काहीच घडले नाही, मंत्रिमंडळ विना हे राज्य कसेबसे चालले होते नंतर उद्धव मुख्यमंत्री झाल्या झाल्या हे कोरोना संकट आले उद्धवजींच्या बाबतीत सांगायचे झाल्यास ऐन मधुचंद्राच्या रात्रीलाच नववधूला पुढे सात आठ दिवस टिकणारी मासिक पाळी आली….

काही माणसे चांगले नशीब घेऊनच मला वाटते जन्माला येतात. विशेषतः या राज्यातल्या बहुसंख्य हजारो निवृत्त सरकारी अधिकाऱ्यांच्या बाबतीत तसे याठिकाणी हमखास सांगता म्हणता बोलता येईल. एकतर बहुसंख्य शासकीय प्रशासकीय अधिकारी आयुष्यभर प्रचंड वरकमाई करतात नंतर ते निवृत्त झाले तरी सरकारी निवृत्ती वेतन त्यांना पुढे त्यांच्या पत्नीला अखेरच्या श्वासापर्यंत मिळतच राहते असते. येथपर्यंत ठीक आहे पण उद्धवजींच्या नजरेत येथे या कठीण दिवसात एक अतिशय

महत्वाचा असा पुरावा मी आणू इच्छितो, तो असा कि असे कितीतरी शासकीय प्रशासकी अधिकारी या राज्यात त्यांच्या निवृत्ती नंतर देखील आजही अमाप समाप कमाई करताहेत. विशेषतः सध्याच्या या गंभीर परिस्थितीत हे राज्य या मंडळींनी लुटणे गंभीर असा प्रकार आहे ज्यात मुख्यमंत्र्यांनी अतिशय तातडीने लक्ष घालणे गरजेचे आहे. असे अनेक कर्मचारी आणि अधिकारी आहेत जे सेवानिवृत्त झाल्या नंतर देखील कित्येक वर्षे थेट पुन्हा शासकीय सेवेत विविध महामंडळांवर प्रतिनियुक्त केल्या गेले आहेत. अत्यंत अत्यंत महत्वाचे म्हणजे हे जे कर्मचारी किंवा अधिकारी जेव्हा केव्हा शासकीय सेवेत होते त्यातले जवळपास ९९ टक्के त्यांच्या वरकमाई साठी कुप्रसिद्ध होते थोडक्यात अतिशय भ्रष्ट होते नेमक्या त्याच कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना त्यांच्या वरिष्ठांनी याच साठी प्रति नियुक्ती वर घेतले आहे कि येथे देखील त्यांनी तेच पूर्वीचे वरकमाईचे काम करावे आणि आपण स्वतः खावे व वरिष्ठांना कमावून द्यावे…


www.vikrantjoshi.com

प्रतिनियुक्ती झालेले बहुसंख्य कर्मचारी अधिकारी त्यांच्या निवृत्ती आधी एकतर राजकीय दृष्ट्या मोठे प्रभावी होते विशेषतः हे सारे मंत्रालयाशी या ना त्या कारणाने संबंधित असल्याने प्रतिनियुक्ती करवून घेतांना त्यांना कसलीही अडचण भासली नाही आली नाही. विशेषतः या राज्यात म्हाडा, एमएमआरडीए, एमएसआरडीसी, एमटीडीसी, परिवहन महामंडळ, मेट्रो सारखे बहुसंख्य मलिदा देणारे महामंडळे आणि मंत्री आस्थापना किंवा तत्सम सरकारी कार्यालये हेच या निवृत्त भ्रष्ट बदमाश भामट्या सरकारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचे टार्गेट असते आणि ते मोठ्या खुबीने आपले राजकीय प्रशासकीय शासकीय लागेबांधे वापरून निवृत्तीनंतर थेट पुढली दहा दहा वर्षे प्रतिनियुक्ती वर अतिशय लाभाचे मोठे पद अधिकार मिळवून त्यावर जाऊन बसतात आणि जेवढी वरकमाई  आधी केलेली असते तेवढीच निवृत्ती नंतर देखील करवून घेतात. लबाड हलकट बेशरम हरामखोर थर्डग्रेड नीच पाजी दलाल संधीसाधू कुठले. ना त्यांना जनाची वाटते ना मनाची. इकडे निवृत्तीनंतरचे सारे आर्थिक लाभ तर सरकारकडून उकळायचेच वरून लाभाच्या प्रतिनियुक्त्या मिळवून सरकारला अखेरच्या श्वासापर्यंत पुनःपुन्हा लुटत राहायचे. अत्यंत घृणास्पद म्हणजे सरकारी नोकरीत असतांना ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप होते नेमके असेच बहुसंख्य प्रतिनियुक्तीवर येऊन बसलेले आहेत हे विशेष…

तूर्त एवढेच : हेमंत जोशी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *