शिरीष पै यांच्याविषयी : पत्रकार हेमंत जोशी


शिरीष पै यांच्याविषयी :  पत्रकार हेमंत जोशी 

माणसाने हे असे संकुचित होत जावे म्हणजे सर्वप्रथम त्याचे राष्ट्रावर प्रेम असावे तदनंतर ज्या राज्यात आपण राहतो त्यावर प्रेम असावे तदनंतर ज्या मुलुखातून आपण आलोय म्हणजे विदर्भ, मराठवाडा इत्यादी त्यावर नितांत प्रेम असावे तदनंतर आपल्या जिल्ह्यावर प्रेम करावे तदनंतर ज्या गावातून आलोय त्यावर प्रेम असावे तदनंतर आपल्या जातीवरही आपले प्रेम असावे इतरांनी आपल्या जातीला हिणविलें तर पेटून उठावे तदनंतर आपल्या कुटुंबावर आपले प्रेम असावे, अशा उतरत्या क्रमाने प्रेमाची परिभाषा असावी. शनिवार १६ नोव्हेंबर च्या लोकसत्ता चतुरंग पुरवणीत आचार्य अत्रे यांचे नातू आणि शिरीष पै यांचे चिरंजीव माझे अत्यंत आवडते व्यक्तिमत्व राजेंद्र पै यांचा शिरीष पै यांच्यावर लिहिल्या गेलेला, शुभंकर मार्दव हा दीर्घ लेख हे अतिसुंदर अप्रतिम लिखाण वाचल्यानंतर मनाशी एवढेच म्हणालो कि राजेंद्र पै यांना अत्युत्तम लिखाणाचा वारसा मिळालेला असतांना आपण एका साहित्य संमेलनाच्या अध्यक्षाला का मुकलो आहोत म्हणजे हा राजेंद्र पै यांचा हलगर्जीपणा कि साहित्य वर्तुळातील दिग्गजांचे त्यांच्याकडे झालेले दुर्लक्ष…

ज्या अत्रे पद्धतीने म्हणजे काहीही न लपविता राजेंद्र पै यांनी अत्रे व पै कुटुंबाविषयी शुभंकर मार्दव मध्ये लिहिले आहे ते वाचून शिरीष पै, राजेंद्र पै विशेषतः व्यंकटेश पै यांच्याविषयी अनेक पैलू समोर येतात जे तुम्हा आम्हाला दूरदूरपर्यंत माहित नाहीत, ज्यांचे आचार्य अत्रे आणि शिरीष पै यांच्यावर प्रेम आहे त्यांनी हे लिखाण नक्की वाचावे आणि लेख संग्रही ठेवावा. कदाचित राजेंद्र पै यांना वाईट वाटेल पण मीही मनातले सांगतो किंवा जे इतर तुमच्या पाठी बोलतात ते सांगतो कि मराठी माणसाला जसे अत्रे यांचे काही स्वभावगुण आवडत नसत तशी त्यांना राजेंद्र पै यांच्या वडिलांविषयी फार मोठ्या प्रमाणावर नफरत होती, मनात यासाठी राग होता कि व्यंकटेश पै यांनी अत्रे यांना मानसिक छळले आणि शिरीष पै यांना तर  आयुष्याच्या अखेरपर्यंत सर्वोतपरी अतिशय त्रास दिला ज्यामुळे शिरीष पै यांचे मोठे नुकसान झाले…अत्यंत महत्वाचे म्हणजे जे मधुकर भावे यांच्यासारखे आजही अनेक पै कुटुंबियांशी सलोखा जवळीक घरोबा राखून आहेत किंवा दिवंगत काकासाहेब पुरंदरे तर कायम माझ्याशी गप्पा मारतांना हेच म्हणायचे कि आचार्य अत्रे यांना बुडविण्यात आणि मराठा दैनिक संपविण्यात कायम व्यंकटेश पै आघाडीवर होते…

अर्थात येथे तोंडे किती लोकांची धारावीत कारण व्यंकटेश पै यांच्याविषयी फार कमी चांगले सांगणारे मला येथे मुंबईत भेटलेत पण व्यंकटेश पै नेमके कसे होते हे जे राजेंद्र पै त्यांचे उच्चशिक्षित चिरंजीव अधिकाराने सांगू शकतात ते इतर कोणीही सांगणे अशक्य, नेमके या प्रदीर्घ अफलातून लेखात राजेंद्र पै यांनी जे व्यंकटेश पै यांच्याविषयी लिहिलेले आहे, वाचून आपले आजपर्यंतचे व्यंकटेश पै यांच्याविषयीचे सारे गैरसमज दूर होतात आणि ज्या पद्धतीने राजेंद्र आणि त्यांचे धाकटे बंधू उत्तम घडले वाढले हे लिखाण वाचल्यानंतर हेच लक्षात येते कि शिरीषताई आणि व्यंकटेश पै यांचे एकमेकांवर असलेल्या जीवापाड प्रेमातून त्यांच्यावर उत्तम संस्कार झालेले आहेत. या लेखातील शेवटच्या परिच्छेदात राजेंद्र पै यांनी त्यांच्या दोन पत्नी आणि मुलांविषयी काहीही न लपविता जे लिहिले आहे त्यात आचार्य अत्रे यांची झलक दिसते कारण अत्रे कायम आपल्या गुण दोषांसहित साऱ्यांना कायम सामोरे गेले, ना त्यांनी कधी आपले दोष लपविले ना त्यांच्या बऱ्या वाईट सवयी, म्हणून मी सतत अत्रेंना फॉलो करतो, स्वतःचे काहीही न लपविता लोकांना सामोरे जातो. अख्खे लिखाण वाचल्यानंतर जशा शिरीष पै आपल्यासमोर जशाच्या तशा उभ्या राहतात त्याचवेळी हेही जाणवते कि राजेंद्र पै यांनी लिखाणात अत्रे व शिरीष पै यांचा वारसा चालवायला हवा होता जे दुर्दैवाने घडले नाही, आपण एका उत्तम लेखकाला नक्की मुकलो आहोत, अत्यंत महत्वाचे म्हणजे व्यंकटेश पै कसे होते हेही कळते…

तूर्त एवढेच : हेमंत जोशी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *