काय म्हणावे पंकजा यांना, कार्टी कि सुकन्या…?

महाराष्ट्रातील तमाम वंजारा समाजाचे दैवत म्हणजे भगवानबाबा आणि दिवंगत गोपीनाथ मुंडे. विशेषत: गोपीनाथ मुंडे यांनी पाथर्डी, अहमदनगर

चा भगवानगड समृद्ध केला, त्यातून दरवर्षी जो मेळावा मुंडे हयात असतांना त्यांच्या नेतृत्वाखाली भगवानगडावर भरविल्या जायचा, त्या मेळाव्यातील गर्दी बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवाजी पार्कवरच्या दसरा मेळाव्याला देखील मागे टाकायची. गोपिनाथ्जी यांना मृत्यू ओढविल्यानंतर २०१५ च्या मेळाव्याचे नेतृत्व त्यांच्या कन्येने म्हणजे पंकजा यांनी केले, विशेष म्हणजे या मेळाव्याला अलोट,  तुफान गर्दी वंजारा समाजाने केली होती, ज्या गर्दीने गोपीनाथजी यांनी भरविलेल्या सार्या मेळाव्यांचा उच्चांक मोडला पण पंकजा यांच्या नेतृत्वाखाली भरलेल्या या मेळाव्याला सर्व वाहिन्यांनी आणि वृत्तपत्रांनी प्रसिद्धी देणे टाळले, नेमके कोण सांगता येणार नाही पण पंकजा यांच्या एखाद्या राजकीय शत्रूने डाव साधला, हे मात्र १०० टक्के सत्य….

मित्रहो, अत्यंत महत्वाचे म्हणजे भाजपाचा प्रचंड व्याप सांभाळता सांभाळता दिन रात पायपीट करून संपूर्ण राज्यातील वंजारा समाजाला एकत्र आणून त्यांना ताकद देण्याचे मोठे काम फक्त आणि फक्त गोपीनाथ मुंडे यांनी केले, उगाच वंजारी समाजाने त्यांना देवघरात आणून बसविलेले नव्हते, नाही…. मला नेमके आठवते, पुतणे धनंजय यांनी सक्रिय राजकारणात येण्याची तयारी १९९५ पासूनच सुरु केली होती जेव्हा गोपिनाथ्जी या राज्याचे उपमुख्यमंत्री होते, गोपीनाथ यांचे बोट पकडूनच धनंजय राजकारणात आले, मोठे झाले, पुढे मात्र त्यांनी आणि पंडितराव मुंडे दोघांनीही गोपीनाथजी यांची साथ सोडली. सत्तेत वाट मिळाला नाही कि नेता मग तो कुठलाही असो, उतावीळ होतो, आणि तत्व किंवा प्रेम बाजूला ठेवून आपापसात चढाओढ निर्माण करतो, धनंजय आणि पंडितराव यांच्याबाबतीत नेमके तेच घडले….

थोडक्यात, धनंजय यांना राज्याचे राजकारण अजिबात नवीन नव्हते जेव्हा त्यांनी गोपीनाथजी यांना सोडून शरद पवार यांचे बोट धरले, अर्थात धनंजय हे गोपीनाथ यांची त्यांच्या समाजातलि जागा केव्हाच म्हणजे गोपीनाथ यांच्या मृत्युनंतर लगेच घेऊ शकले असते पण त्यांची एकमेव मोठी चूक म्हणजे त्यांनी शरद पवार यांच्याशी सलगी केली, मी पंकजा यांच्यावर केवळ चार ओळी विरोधात टाकल्या टाकल्या तर मला अतिशय तिखट प्रतिक्रिया ऐकून घ्याव्या लागल्या, पवार यांनी तर गोपीनाथ यांना कधीही सुखाने राजकारण करू दिले नाही, सतत त्यांचा हरप्रकारे राजकीय छळ

केला, त्यांना दरवेळी अडचणीत आणले, अनेकदा संकटात टाकले, मग आपल्या देवाला त्रास दिलेल्या शरद पवार यांना वंजारा समाज कसे जवळ घेईन, त्यांच्या मनात आपल्याविषयी अत्यंत राग आहे, हे पवारांना चांगले ठाऊक होते, हा समाज आपल्यापासून दूर आहे, हे शल्य पवार यांना सतत अस्वस्थ करायचे, हा समाज कसा जवळ करता येईल, गोपीनाथ यांच्यापासून किमान काही प्रमाणावर कसा तोडता येईल, हा विचार त्यांच्या कायम डोक्यात होता, आणि पवार यांना आयती संधी चालून आली, गोपीनाथ यांचा राजकीय वारसदारच अगदी अलगद पवारांच्या जाळ्यात आला, त्यांची मोहीम फत्ते झाली पण अद्याप ती मोहीम यशस्वी झालेली नाही कारण पवार यांच्याविषयी वंजारा समाजाला मनापासून, मनातून राग आहे, त्यामुळे धनंजय यांचे नेतृत्व गोपीनाथ यांची हुबेहूब नक्कल करणारे असले तरी त्यांची बसण्याची जागा चुकलेली आहे, त्यांनी पवार यांचे नेतृत्व मान्य करून सध्यातरी आपले राजकीय नुकसान करून घेतलेले आहे. धनंजय यांनी राष्ट्रवादी व्यतिरिक्त अन्य कुठल्याही पक्षात प्रवेश केला असता तर केव्हाच धनंजय यांनी पंकजा यांना मागे टाकले असते, कारण तुलनेत धनंजय हे दुसरे गोपीनाथ आहेत आणि पंकजा सामान्य वंजारा समाजाकडे हवे तसे ध्यान द्यायला, या समाजाची पाहिजे तशी दखल आणि काळजी घ्यायला तयार नाही, जसे हुबेहूब बाळासाहेब असूनही राजकीय चुकांमुळे राज ठाकरे मागे पडले आणि सामान्य उद्धव पुढे निघून गेले ते तसे पंकजा यांचे झाल्यासफारसे आश्चर्य वाटणार नाही, त्यांचा राजकारणात ‘ राज ठाकरे ‘ होऊ शकतो, जर त्या गोपीनाथ यांच्याप्रमाणे वंजारा समाजाला आपल्या परमेश्वर वाटल्या नाहीत तर….

वंजारा समाजातील, पुण्याजवळचा एक राजकीय जाणकार, राजकीय अभ्यासक, बुद्धिमान व्यावसायिक तरुण माझा मित्र आहे. गोपीनाथजी यांच्या मृत्युनंतर अत्यंत भावूक होऊन त्याने गोपिनाथ्जी यांचा राजकीय प्रवास असा संदर्भ पकडून एक दिनदर्शिका नवीन वर्ष सुरु होण्यापूर्वी काढली, उद्देश हाच, ती दिनदर्शिका वंजारा समाजाच्या घराघरात भिंतीवर लागेल आणि त्यानिमित्ते का होईना हा त्यांचा देव गोपीनाथ, त्याचे दर्शन दररोज सर्व समाजाला घडेल, मोठ्या कौतुकाने त्याने प्रत्यक्ष भेट घेऊन ती दिनदर्शिका पंकजा यांना भेट दिली, त्यांच्या हाती दिली, आश्चर्य म्हणजे पंकजा यांनी त्या १२ पानाच्या दिनदर्शिकेचे साधे एक पान देखील उलटून न बघता, आपल्या पिएकडे सोपविली, याच याच तरुणाने गोपीनाथजी यांचे जवळपास १००० पुतळे तयार केलेत, त्यातला एक पुतळा मुद्दाम पंकजा यांना भेट दिला पण दिनदर्शिकेप्रमाणे पुतळ्याचे देखील झाले. विशेष म्हणजे हा वंजारी तरुण एक विमान खरेदी करणार आहेत, ती बातमी त्यांनी जेव्हा फोनवर धनंजय यांना सांगितली, आधी धनंजय यांनी केंद्रे यांची आस्थेवाईकपणे चौकशी केली, त्यांच्या उपक्रमाचे कौतुक केले आणि वरून म्हणाले, काहीही मदत लागली तर हक्काने सांगा, मदत नक्की करता येईल. पंकजा यांचे हे असे वागणे सुरु राहिले तर मात्र त्यांना आयती मिळालेली लोकप्रियता घसरायला आता फारसा वेळ लागणार नाही….

गोपीनाथजी आणि मी कसे एकमेकांशी जिवलग होतो, हे मी न सांगता तुम्ही राहुल महाजन, मुकुंद कुलकर्णी, सुनील दत्ता राणे, अतुल भातखळकर इत्यादींना विचारा, ते त्यावर अधिक छान माहिती देतील. त्या माझ्या मित्राच्या मुलीला मी तीन वेळा तिच्या कार्यालयात भेटायला गेलो, ताटकळत उभे राहून पंकजा यांच्या, दुकान्दारीत अधिक रस असणार्या स्टाफने, माझी भेट घालून दिली नाही किंवा पंकजा यांना मी फारसा महत्वाचा वाटलो नसेल, विशेष म्हणजे तिन्ही वेळी मी माझे कार्ड त्यांच्या स्टाफला दिले, पण त्यांच्या कार्यालयातून आजतागायत मला बोलावणे आलेले नाही, गोपीनाथजी मात्र मी दूर कोपर्यात जरी उभा असलो तरी पटकन बोलावून घ्यायचे. धनंजय यांच्याशी देखील माझा फारसा परिचय नाही, त्यांना आजतागायत मी एकदाही भेटलेलो नाही, सांगण्याचा अर्थ असा कि धनंजय यांच्याशी मैत्री म्हणून पंकजा यांच्यावर टीका, असा प्रकार येथे नाही उलट आपल्या दिवंगत मित्राच्या कन्येचे राजकीय नुकसान होऊ नये असे मनापासून वाटले म्हणून शाब्दिक समाचार घेतला, ऐकणे अथवा न ऐकणे हे पूर्णत: पंकजा यांच्यावर अवलंबून आहे. पंकजा मला भेटल्या नाहीत म्हणून मी त्यांच्यावर टीका केली असेही अजिबात नाही, एवढ्या खालच्या पातळीवर मी कधीही एखाद्याचा बदला घेत नाही, माझी ती पद्धत नाही. बापाने भरपूर कमाई करून ठेवलेली आहे, तो मोह मंत्री म्हणून पंकजा यांनी टाळावा, सभोवताली दलाल नव्हेत तर मराठवाड्यातला सामान्य माणूस, मतदार संघातला कुठल्याही विचारांचा मतदार आणि वंजारा समाजातील बंधू तसेच भगिनी, निदान यापुढे तरी पंकजा यांच्या भोवताली दिसायला हवेत आणि मान वर करून न चालता, जमिनीवर चालणार्या सामान्य माणसाला सहकार्य करून पंकजा यांनी बापसे बेटी सवाई ठरावे….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *