राष्ट्रीय स्वयंसेवक संघ : ५ पत्रकार हेमंत जोशी

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ : ५ पत्रकार हेमंत जोशी 

ज्यांना आपले आयुष्य कमी करवून घ्यायचे असेल आणि जे मनाने हळवे असतील, त्यांनी अवश्य राजकीय पत्रकारितेला वाहून घ्यावे किंवा आणखी सोपे करून सांगतो समजा तुम्हाला अमुक एखाद्याचा बदला घ्यायचा असेल तमुक एखाद्याला लवकर वर पोहोचवायचे असेल अशा व्यक्तीला राजकीय क्षेत्राशी संबंधित पत्रकारितेत अवश्य जाण्यास भाग पाडावे, तुमचे बदला घेण्याचे सुड उगवण्याचे स्वप्न अगदी लवकर पूर्ण होते. वयाच्या सतराव्या वर्षांपासून येथे या राज्यातही मी हेच बघत आलोय कि भाजपा सहित जवळपास साऱ्या संघटनांना आणि राजकीय पक्षांना राज्याच्या भल्यासाठी फार काही चांगले करायचे नसते, रुटीन मध्ये जे काय चांगले होत असेल तेवढेच कारण तेथे काम करणाऱ्या नेत्यांना व्यक्तिगत आर्थिक प्रगती साधायची असते आणि त्यासाठी ते पक्षाच्या, कार्यकर्त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवतात, दहशत दरारा निर्माण करतात आणि एकदा का अशांची दादागिरी गुंडगिरी फारतर आदरयुक्त भीती निर्माण झाली रे झाली कि या नेत्यांचे नवश्रीमंत होण्याचे कार्य जोमाने सुरु होते, त्यांना त्यानंतर अखेरच्या श्वासापर्यंत कितीही पोट भरले तरी थांबायचे नसते, हाव सतत वाढतच असते. अगदी अलीकडे मी वारकरी सांप्रदायाचे कार्य करणाऱ्या स्वयंघोषित वारकऱ्यांच्या नेत्याला, विठ्ठल पाटलांना देखील हेच म्हणालो, तुम्हीही किंवा तुमच्यातलेही असे अनेक नेते आहेत कि त्यांना पांडुरंगाचे किंवा त्याच्या भोळ्या भक्तांच्या भल्याचे काहीही पडलेले नसते, पण एकेकाळी सामान्य तुम्ही, आज तुमचे वैभव डोळे दिपवून सोडणारे आहे….


केवळ राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही हिंदूंची संघटना त्यात कार्यव्यस्त असलेल्या कोणत्याही व्यक्तीच्या डोक्यात हा विचार नसतो कि आपण जे काय करतो आहे ते वैयक्तिक किंवा आर्थिक फायद्यासाठी करायचे आहे, दूरदूर पर्यंत हे त्यांच्या डोक्यातही नसते मात्र तेच किंवा त्यातलेच जे पुढे भाजपामध्ये कार्यव्यस्त होतात ते लगेच बिघडतांना मी बघितले आहेत, श्रीमंत होण्यासाठी त्यांनीही देशप्रेम बाजूला ठेवून केवळ व्यक्तिगत श्रीमंत होण्यावर भर दिल्याचे दिसते, असे बहुतेक सारेच ‘ राम नाईक ‘ संघातून भाजपामध्ये आल्यानंतर पुढल्या पिढीचे भले करण्यासाठी पातळी सोडून वागतांना दिसतात. मला तर नितीन गडकरी यांच्यासारख्या संघाने लाडावून ठेवलेल्या नेत्यांकडे बघून कधी कधी असे वाटते कि संघाचे नेतेच अमुक एखादा जेव्हा भाजपासाठी काम करायला लागतो, त्याचे पैसे खाणे अप्रत्यक्ष जणू संघाला देखील मान्य असते कि काय कारण संघातल्या प्रमुखांनी डोळे वटारल्यानंतर अमुक एखाद्या भाजपा नेत्याची पैसे खाण्याची, वाम मार्गाने श्रीमंत होण्याची कधीही हिम्मत होणार नाही….


राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची १९२५ साली स्थापना झाली. डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी तब्बल ९३-९४ वर्षांपूर्वी संघस्थापना केली, संघ लवकरच शंभरी पार करेल पण या शंभर वर्षात त्यांच्या शिस्तीने खुबीने कार्य करण्याच्या पद्धतीमध्ये अजिबात बदल घडलेला नाही. जेथे जेथे हिंदू आहेत तेथे तेथे जगभरात संघ आहे, संघाचे कार्य आहे. संघाचे विशाल वटवृक्षात रूपांतर झाले आहे. या वटवृक्षाच्या शाखा किती, पाने किती याची मोजदाद करणे देखील अत्यंत अवघड आहे. एक मात्र नक्की अमुक एखादा हिंदू भलेही संघ विचारांचा नसेल पण ज्याला विचार आहेत त्या प्रत्येक हिंदूंच्या डोक्यात रा. स्व. संघ खोलवर रुजला आहे. अत्यंत महत्वाचे जे मी बघितले आणि अनुभवले ते सांगतो कि परदेशातील हिंदूंना, भारतीयांना आपल्या या देशाशी, हिंदुस्थानाशी, आपल्या महान संस्कृतीशी घट्टपणे जोडून ठेवणारी विविध माध्यमातून कार्यरत असलेली राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही संघटना नाही तर ती एक परंपरा बनलेली आहे….


अत्यंत महत्वाचे म्हणजे जे संघ स्वयंसेवक आहेत पण राजकारणात उतरले आहेत नेते झाले आहेत त्यातून नवश्रीमंत ठरले झाले आहेत ते जेव्हा केव्हा संघाच्या विविध कार्यक्रमांना अगदी उघड हजेरी देतात त्यांनी अवश्य हा विचार करायला हवा कि मी तर आता भ्रष्ट झाल्याने एक प्रकारे संघ विचारातून बाटलो आहे आणि बटणे हा शब्द संघ विचारांना त्रास देणारा आहे मग मी या मंचावर शोभतो का, मनाशी ‘ नाही ‘ उत्तर येत असेल तर अशा संघ विचारांनी बाटलेल्या नेत्यांनी खरेतर अजिबात संघाच्या व्यासपीठावर येऊ नये, भलेहि अशा नेत्यांना संघाच्या व्यास पिठावर बघितल्यानंतर बघणार्यांना नक्की हायसे वाटत असेल पण या नेत्यांमुळे संघाची प्रतिमा मात्र मोठ्या प्रमाणावर ढासळते ही वस्तुस्थिती आहे. संघाच्या शाखा कमी झाल्या पण संघाचे महत्व वाढतच गेले, आक्रमकता देखील तसूभर कमी झालेली नाही किंबहुना आम्ही लहानपणी जो संघ प्रत्यक्षअनुभवला आहे त्यापेक्षा कितीतरी पटीने संघ अधिक आक्रमक झाल्याचे दिसते,जे अतिशय चांगले आहे. पण संघ पुढेही स्वच्छ शुद्ध ठेवायचा असेल तर विचारांनी बाटलेल्यासंघातून भाजपा मध्ये गेलेल्या भाजपा नेत्यांना संघाने आपणहून दूर ठेवायला हवे, त्यांची सावली देखील संघावर पडायला नको पण संघाचा जर अप्रत्यक्ष सत्तेत सहभाग असेल तर मात्र अशा भ्रष्ट 

नेत्यांना दूर ठेवणे संघाला देखील अजिबात शक्य नाही…

क्रमश:

त्रकार हेमंत जोशी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *