भुजबळ आणि मंत्रिमंडळ भाग २ : पत्रकार हेमंत जोशी


भुजबळ आणि मंत्रिमंडळ भाग २ : पत्रकार हेमंत जोशी 

नितीशकुमार मुख्यमंत्री झाले तेव्हापासून बिहारची बऱ्यापैकी महाराष्ट्राच्या दिशेने वाटचाल सुरु झाली. सध्या महाराष्ट्राची वेगाने बिहारच्या दिशेने वाटचाल सुरु आहे, असे नाही कि फडणवीस गेले आणि पवारांच्या मार्गदर्शनाखाली राज्याची वाटचाल सुरु झाली, म्हणून महाराष्ट्राचा बिहार होतोय, नो असे अजिबात घडलेले नाही. विशेषतः  १९८० नंतर या. रा. अंतुलेंपासून महाराष्ट्रातील राज्यकर्ते, शासन आणि प्रशासनाची खऱ्या अर्थाने बिघडायला सुरुवात झाली, १९९० नंतर बिघडण्याची प्रक्रिया अतिशय वेगाने सुरु झाली एवढेच. ज्याच्या हाती ससा तो पारधी, सारेच सारखे, एखादेच तुकाराम मुंडे किंवा अश्विनी भिडे किंवा आर आर सारखे चार दोन सोडले साऱ्याच विचारांचे सारेच अविचारी भ्रष्टचारी व दुराचारी. कोणत्याही चौकशांची प्रसंगी तुरुंगात जाण्याची कोणालाही लाज लज्जा अजिबात वाटत नाही, मनातली भीती तर केव्हाच निघून गेलेली आहे. जातीपातीच्या राजकारणात आला तो फक्त निगरगट्टपणा. घर कुटुंब साड्या किंवा आपल्या कुटुंबापेक्षा ऐश्वर्य पैसे आणि ऐय्याशी महत्वाची असे प्रत्येकाला वाटत असल्याने ज्यांच्या घरी मुबलक काळा पैसे येतो अशा कोणत्याही कुटुंबातले सदस्य चांगले नाहीत व्यसनी आहेत, पैसे खाणाऱ्यांच्या ते लक्षातही येते पण तोवर वेळ निघून गेलेली असते. मी स्वतःला देखील हा प्रश्न नेहमी विचारतो अगदी दरदिवशी विचारतो कि बक्कळ पैसे मिळविण्या रात्री उशिरापर्यंत पत्रकारिता करायची कि सातच्या आत घरी येऊन कुटुंबात रमायचे. मुलांना तेच सांगतो सातच्या आत घरात या, कुटुंबाचे आरोग्य मनस्वास्थ्य दीर्घायुष्य महत्वाचे आहे पैसे काय केव्हाही मिळतील, मिळविता येतील…. 


www.vikrantjoshi.com

ज्या भुजबळ यांच्याकडल्या खाजगी सचिवावर म्हणजे खुशालसिंग परदेशी यांच्यावर पुरावे सादर करणार आहे, कदाचित तुम्हाला हे माहित देखील नसेल कि ते गणेश नाईक हे राज्य उत्पादन शुल्क खात्याचे मंत्री असतांना त्यांचे खाजगी सचिव म्हणून वावरायचे पण त्यांची नियुक्ती त्यावेळेचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटलांकडे शासनाने केलेली होती म्हणजे विखे यांच्या कार्यालयात त्यांना खाजगी सचिव म्हणून काही ठिकाणी सह्या करण्याचे नक्की अधिकार होते पण असे अधिकार त्यांना गणेश नाईक यांच्याकडे वापरता येत नसतांना त्यांनी कुठे आणि कशा सह्या मारल्या त्याचे चुरस पुरावे मी नक्की सादर करणार आहे. खुशालसिंग परदेशी यांच्यासारख्या भ्रष्ट व वादग्रस्त खाजगी सचिवाला भुजबळ यांनी संधी देणे म्हणजे पुन्हा तुरुंगात जाण्याची तयारी ठेवण्यासारखे डेंजरस आहे एवढेच मी येथे परदेशी यांच्या माहित असलेल्या व गोळा केलेल्या पुराव्यांच्या  आधारे नक्की सांगू शकतो. माहित आहे कि अमुक एखाद्या रंडीशी शय्यासोबत केल्यानंतर नक्की एड्स होणार आहे तरीही तिला नागडी करून पलंगावर उघडी पाडायची हे असले चुकीचे वर्तन तेही अगदी अलीकडे तुरुंगात जाऊन आलेल्या छगन भुजबळ यांनी करणे म्हणजे मी जे सांगतो आहे ते तसेच घडते आहे, म्हणावे लागेल, नेत्यांच्या व खुशालसिंग परदेशी यांच्यासारख्या अधिकाऱ्यांच्या मनातली भीती कुठल्या कुठे पळून गेली आहे… 

अत्यंत अत्यंत महत्वाचे म्हणजे आजतागायत छगन भुजबळ आणि त्यांच्या कुटुंबाला खऱ्या अर्थाने जर अडचणीत आणले असेल तर ज्यांनी आधी त्यांचे खा खा खाल्ले अशा त्यांच्या सभोवताली वावरणाऱ्या अधिकाऱ्यांनी मित्रांनी दलालांनी त्यांच्या कार्यालयात काम करणाऱ्या काही मंडळींनीच त्यांना अडचणीत आणले म्हणजे भुजबळांनाच आधी लुटून खाल्ले आणि हे असे लुटून खात असतांना त्याच भुजबळ यांचे नको ते पुरावे जमा केले त्यांच्या विरोधकांना न्यायालयात सादर करण्यासाठी दिले आणि पुढे याच दानशूर भुजबळ यांना तुरुंगात जाण्याची वेळ आली. हा अनुभव ताजा असतांना जर का छगनराव आणि पुतण्या समीर जर खुशालसिंग परदेशी यांच्यासारख्या बदनाम भ्रष्ट उद्दाम उर्मट अधिकाऱ्याला थेट कार्यालयात आणि पुन्हा कुटुंबात देखील मानाचे स्थान देऊन मोकळे झाले असतील तर ज्याला दारू पिण्याने अल्सर झाला आहे त्याने पुन्हा दारू ढोसण्यासारखे हे काम भुजबळ यांनी केले आहे जे शंभर टक्के त्यांच्या नक्की अंगलट येणार आहे, काळ्या दगडावरची रेघ आहे. वारंवार त्याच त्या चुका त्यातून काय घडले, भुजबळ यांच्याकडे आलेले सिंचन आणि उत्पादन शुल्क खाते तडकाफडकी पवारांनी काढून घेतले कारण केवळ पंधरा दिवसात भुजबळांच्या कार्यालयातून घातल्या गेलेल्या गोंधळाचे थेट पुरावेच पवारांच्या हाती पडले. भुजबळ लोकमान्य लोकप्रिय लोकनेते आहेत त्यांची सामान्य लोकांना अत्यंत गरज आहे, कृपया यापुढे तरी त्यांनी सावध असावे सावध वागावे… 

क्रमश: हेमंत जोशी. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *