नाहीत गाफील रणजीत पाटील : पत्रकार हेमंत जोशी

नाहीत गाफील रणजीत पाटील : पत्रकार  हेमंत जोशी 

पूर्वीचा काळ वेगळा होता, तो काळ चांगला होता, घरोघरी नवराबायकोला खंडीभर मुलं मुली असायची, हिंदूंच्या दृष्टीने ते चांगले होते, पुन्हा एकदा पूर्वीसारखे घडायला करायला हवे, हिंदूंनी भरमसाठ भरपूर मुलं मुली जन्माला घालावीत अन्यथा या देशातल्या हिंदूंचे काही खरे नाही जसे नेपाळ आता हिंदू राष्ट्र राहिलेले नाही, तेच आपले देखील होईल त्या पारशी जमातीसारखे म्हणजे औषधालाही हिंदू राहणार नाहीत, ठरवायलाच हवे हिंदू जोडप्यांनी केवळ एक किंवा दोन यावर समाधान न मानता मोठ्या संख्यने मुलं मुली जन्माला घालणे गरजेचे आहे, आताच कामाला लागा, संकोच न करता, आजही तशी परिस्थिती गंभीर आहेच, हिंदू मुलांना लग्न करण्यासाठी मुली मिळत नाहीत, वय निघून जाते, कितीतरी अविवाहित म्हणून नाईलाजाने जीवन जगताहेत…


पूर्वीच्या काळी घरात संख्यने मुलं मुली खूप असायचे शिवाय एकत्र कुटुंब पद्धती असल्याने मुलांची नेमकी नावे लक्षात ठेवणे घरातल्या बुजुर्ग मंडळींना अवघड जायचे जे माझे किंवा अनेकांचे त्या राज्यमंत्री रणजीत पाटील यांच्या बाबतीत होते, घडते म्हणजे त्यांच्याकडे राज्यमंत्री म्हणूनही अनेक विविध खात्यांची जबाबदारी आहे, खाते मग ते नगरविकास असो कि गृह, त्या त्या प्रत्येक खात्यात त्यांची कामगिरी कलेकलेने उंचावत गेलेली त्यामुळेच रणजीत पाटील नेमके कोणत्या खात्याचे राज्यमंत्री आहेत, लक्षात ठेवणे सर्वांनाच अवघड होऊन बसले आहे. रणजीत पाटील आमच्या विदर्भातले असूनही आळशी नाहीत, ते दिवसरात्र राज्याचे भले साधण्यासाठी झटतात म्हणून ते राज्यमंत्री असूनही मोस्ट पॉप्युलर आहेत, एखाद्या दुसऱ्या नेत्याचा अपवाद सोडल्यास सर्वांचे लाडके आहेत, हो, ते त्यांच्या अकोला शहरातल्या त्यांच्याच भाजपा मधल्या काही नेत्यांना नकोसे झाले आहेत म्हणजे डॉ. रणजीत जेव्हा आपली मेडिकल प्रॅक्टिस करायचे तेव्हा ते सतत स्थानिक आमदार गोवर्धन शर्मा किंवा आमदार रणधीर सावरकर किंवा सावरकरांचे मामाश्री खासदार संजय धोत्रे यांना हवेहवेसे भाजपच्या या तिन्ही नेत्यांना हवेहवेसे वाटायचे कधी फॅमिली डॉक्टर म्हणून तर कधी कौटुंबिक मित्र म्हणून पण डॉक्टर राजकारणात उतरले, उतरल्या उतरल्या विधान परिषदेवर निवडून आले राज्यमंत्री झाले यशस्वी राज्यमंत्री ठरले आणि या तिघांचे त्यावर एकमत झाले असावे म्हणजे भलेही रणजीत पाटील मामा भाच्याच्या जातीचे असतील किंवा कौटुंबिक मित्र असतील किंवा त्यांच्या पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते म्हणूनही कामाला लागलेले असतील पण ‘तेरी साडी मेरी साडीसे सफेद कैसे, पद्धतीने रणजीत पाटलांचे उत्तम कर्तृत्वातून, कामातून हे असे अचानक सर्वांना डावलून पुढे जाणे म्हणे या तिघांना खटकले असावे आणि कालपर्यंत मित्र असणारे रणजीत पाटील या तिघांनाही थेट अमरीश पुरी प्रेम चोप्रा प्राण शक्ती कपूर मदन पुरी ललिता पवार शशिकला शरद केळकर निळू फुले के. एन सिंग अमजद खान वाटायला लागले आहेत, आता त्या तिघांनाही गेल्या तीन वर्षांपासून रणजीत पाटील व्हिलन आहेत खलनायक आहेत असे जळी स्थळी बसता उठता सतत वाटू लागलेले आहे, चिंतेचे कारण असे कि या तिघांनी राज्यमंत्री रणजीत पाटलांना आधी मुका मग मोका देऊन घट्ट मिठी मारावी यासाठी राज्यातले देशातले कुठलेही भाजपा नेते पुढे आले, असे घडलेले स्थानिक कोणत्याही भाजपा कार्यकर्त्याला, संघ स्वयंसेवकाला न दिसल्याने ते सारे आणि रणजीत पाटील ‘कसे होईल आमच्या पक्षाचे’ या चिंतेने या काळजीने खंगून चालले आहेत, या सर्वांचे एक स्थानिक लाडके नेते आहेत, त्यांना अकोला जिल्ह्यातील भाजपामध्ये मानाचे स्थान आहे, त्यांचे नाव प्रतुल हातवळणे आहे, हे हातवळणे या खालच्या पातळीवर उतरून पेटवून दिलेल्या राजकारणाला एवढे कंटाळले होते कि त्यांनी थेट मुंबई गाठली आणि अंगावर पडेल ते काम आणि दाबून मोबदला पद्धतीची रोजंदारी कामे त्यांनी मंत्रालय परिसरात सुरु केली आहेत, त्यांचे काही चुकले असे वाटत नाही, सारेच त्यांच्या जवळचे, यांच्याकडे गेला कि तो बुक्का गुद्दा मारते आणि त्याच्याकडे प्रतुल गेले रे गेले कि ते गुद्दे बुक्के मारून मारून प्रतुलभाऊंची पार हेकोडी करून ठेवतात म्हणून त्यांनी जवळपास अकोल्यातले राजकारण सोडले आणि या मंबईत येऊन मंत्रालयातल्या रोजगार हमी योजनेवर ते रुजू झाले, त्यांचे, पुन्हा सांगतो, काहीही चुकलेले नाही, इतर आले नाहीत ते येथे आले पण इतर नेत्यांचेही पार भरीत झाले आहे, रणजीत पाटलांकडे गेलेले कोणी दिसले रे दिसले कि त्याले कच्चा भाजून खाल्ल्या जाते ना भाऊ…


विशेष म्हणजे अकोला जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टी देखील हळूहळू क्षय रोग्यासारखी दिसू लागेल जर हे असेच सुरु ठेवले तर….स्थानिक नेत्यांचे हातवळणे यांना धमकावणे पुढे सांगितलेल्या चुटक्यासारखे आहे, 


आम्ही गेल्या पंचवीस वर्षात एकमेकांशी एकदाही भांडलो नाही, एक मित्र दुसऱ्या मित्राला सांगत होता. तुम्हाला हे कसे जमते किंवा जमले, दुसर्याने विचारल्यावर पहिला म्हणाला, लग्न झाल्या झाल्या लगेच आम्ही महाबळेश्वरला गेलो होतो. तिथे घोडेस्वारी करतांना माझी बायको ज्या घोड्यावर बसली होती त्या घोड्याने उडी मारून बायकोला खाली पाडले…ती उठली व परत घोड्यावर बसली अन घोड्याला म्हणाली, हे तुझे पहिल्यांदा झाले. थोड्यावेळाने पुन्हा तेच घडले तिला घोड्याने खाली पडले, मग तीही तेच म्हणाली, हे तुझे दुसऱ्यांदा झाले….आणि जेव्हा तेच तिसऱ्यांदा घडले, तेव्हा तिने सरळ त्या घोड्याला दरीत ढकलून दिले.मी तिच्यावर ओरडलो, जाम भडकलो, ए बावळट, ए पागल, तू त्या घोड्याला ठार मारलेस..त्यावर ती लालबुंद होत मला म्हणाली, हे तुझे पहिल्यांदा झाले, तेव्हापासून भांडण तर दूर, साधे वाद देखील नाहीत आमच्यात…


हातवळणे यांचेही हे असे त्या राज्यमंत्री पाटील विरोधकांच्या बाबतीत घडते, हे पाटलांना बिलगले रे बिलगले कि समोरचे म्हणतात, हे असं वारंवार घडायला नको, उपाय नसतो मग हातवळणे इकडे मुंबईत रणजीत पाटलांचे मुक्यावर मुके घेतात आणि अकोल्यात पोहोचले रे पोहोचले कि गोवर्धन शर्माच्या स्कुटरवर डबलशीट बसून गावभर फिरून येतात, काय करतील, चित भी मेरी अन पट भी मेरी…

क्रमश:

 पत्रकार हेमंत जोशी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *