वृत्तपत्रांचा मृत्युलेख २ : पत्रकार हेमंत जोशी

वृत्तपत्रांचा मृत्युलेख २ : पत्रकार हेमंत जोशी 

अभिनेता सचिन आजही पूर्वीसारखाच निदान दुरून तरी दिसतो. फोटोत तर कोणीही छान दिसते किंवा बहुतेक मंडळी त्या वंदना गुप्तेसारखे जुने पुराणे डीपी, आजही तरुण आहोत भासविण्यासाठी ठेवतात. तरुण असणे आणि तरुण दिसणे यात मोठी तफावत असते. एकदा मी एका पुणेकर बाईचे नेत्याशी असलेले प्रेमप्रकरण छापले होते, ती भेटून मला म्हणाली, भाऊ नका छापू, दोन पैसे मिळवू द्या कि मला तसेही त्या नेत्याचे विदर्भातल्या पावसारखे आहे, म्हणजे तुमच्या विदर्भात जोराचा पाऊस आता येईल मग येईल असे उगाचच वाटत राहते आणि पाऊस काही पडत नाही, जमीन तृप्त होत नाही, त्यानंतर नाही मी कधी लिहिले त्या दोघांवर…


अभिनेता सचिनची आठवण येथे त्या ‘ बालिका वधू ‘ सिनेमावरून झाली. त्या सिनेमातली अभिनेत्री रजनी शर्मा एकदा मी आणि ती एकत्र स्विमिंग करीत होतो, जिच्यासाठी सचिन त्या सिनेमात, बडे अच्छे लागते हो, म्हणतो, तीच रजनी आज कशी हिडिंबा, तिला बघून वाईट वाटले. राज्याचा माहिती आणि जनसंपर्क बहुतेक वेळा रजनी सारखा मी ओबडधोबड बघितलेला आहे पण अधून मधून या खात्यात महासंचालक म्हणून काही चांगली माणसे येतात आणि हे खाते सुंदर करून निघून जातात, पुढला महासंचालक चांगला आला, चांगला निघाला तर ठीक अन्यथा या खात्यात काम करणारे काही बिलंदर, झारीतले शुक्राचार्य पुन्हा या खात्याचे बारा वाजवून मोकळे होतात…


श्री ब्रिजेश सिंग तसे आयपीएस म्हणजे बडे पोलीस अधिकारी पण मुख्यमंत्र्यांनी त्यांना येथे आणले, सुरुवातीला आम्हाला वाटले अननुभवी अधिकाऱ्याच्या हाती राज्याचे हे अत्यंत महत्वाचे खाते म्हणजे एखाद्या हिंदी सिनेमात प्रमुख भूमिकेत तेही दीपिका पदुकोण सांगे डॉ. निलेश साबळेला घेण्यासारखे पण माझे निदान चुकले, डॉ. ब्रिजेश सिंग यांनी आतापर्यंत या खात्यात म्हणजे गेल्या तीन वर्षात केलेले काम सदैव ध्यानात ठेवण्यासारखे, त्यांनी खात्यातल्या साऱ्यांना कामाला लावले आणि खाते हिरवेगार केले, ज्याकडे बघून प्रसन्न वाटावे…


ज्या ज्या मुख्यमंत्र्याने चौफेर ज्ञान असलेल्या उत्तम महासंचालकाला या खात्यात आणले त्या त्या मुख्यमंत्र्यांच्या प्रसिद्धीचे काम आपोआप सोपे झाले असे मला नेहमी वाटते. सुधाकरराव नाईक मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी सर्वप्रथम एक काम केले त्यावेळी त्याकाळी अतिशय चुणचुणीतपणे काम करणाऱ्या दिवंगत अरुण पाटणकर यांना म्हणजे प्रशासकीय अधिकारी मनीषा म्हैसकर यांचे पिताश्री आणि मिलिंद म्हैसकर यांचे सासरे, अरुण पाटणकरांकडे यांच्याकडे माहिती खात्याची जबाबदारी सोपविल्यानंतर त्याकाळी घडले असे कि शरद पवार हे सुधाकरराव नाईक यांच्यासमोर फिके पडले. अर्थात पवारांच्या पुढून आणि गाढवाच्या मागून जायचे नसते हे नाईकांच्या लक्षात न आल्याने नेमके तेच घडले, पराक्रमी नाईक राजकारणात शेवटच्या श्वासापर्यंत बाजूला पडले….


ह्यो मुख्यमंत्री म्हणजे एक अजब रसायन आहे असे मला अनेकदा त्यांनी घेतलेल्या निर्णयावरून वाटते. त्यांनी घेतलेले काही निर्णय, चुकीचे घेतले, असे सुरुवातीला वाटते, नंतर लक्षात येते कि हा माणूस अफलातून आहे म्हणून आज या राज्याचा मुख्यमंत्री आहे. माहिती आणि जनसंपर्क खात्याचे महासंचालक कायम प्रशासकीय अधिकारी असतात पण फडणवीसांनी भलतीच रिस्क घेतली त्यांनी चक्क एका आयपीएस अधिकाऱ्याला आणले, सुरुवातीला म्हणून तेच वाटले कि आपले हे मुख्यमंत्री हेमा मालिनी ऐवजी चक्क निरुपा रॉय च्या प्रेमात पडले पण आमचे हे निदान चूक ठरले, ब्रिजेश सिंग या खात्याची शान वाढवून मोकळे झाले आहेत, त्यांनी या खात्यात जान आणली आहे….


मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस, श्रीमान ब्रिजेश सिंग आणि माहिती व जनसंपर्क खात्याने अत्यंत अत्यंत चांगला धाडसी दूरदर्शी उपयोगी घेतलेला निर्णय म्हणजे या राज्यातले असे अनेक वर्तमान पत्रे आहेत जी कधी छापल्या देखील जात नाहीत, ज्यांचा अजिबात खप नाही, अनेक विधी अंगांनी जे फाल्तुक आणि वादग्रस्त ठरले आहेत अशा बहुसंख्य वर्तमान पत्रांना यापुढे करोडो रुपयांचे वाटोळे करणाऱ्या शासकीय जाहिराती देणे थांबविले आहे. गम्मत सांगतो, माझ्याकडे राज्यातल्या विविध जिल्ह्यातून, भागातून महिन्याकाठी किमान पन्नास विविध वृत्तपत्रे येतात, त्यात साप्ताहिके, दैनिके, पाक्षिके असतात, यांपन्नासातले फारतर मी २ किंवा ३ त्या नागपुरातून निघणाऱ्या ‘ विदर्भ मिरर ‘ सारखी वृत्तपत्रे वाचतो, बाकीची बहुतेक वृत्तपत्रे कोपऱ्यात भिरकावून मोकळा होतो. एक महत्वाचे सांगतो, जी वृत्तपत्रे त्या विदर्भ मिरर सारखी दर्जेदार असतील, अशा वृत्तपत्रांना जर शासनाने जाहिराती देणे बंद केले तर अशांसाठी प्रसंगी मी स्वतः मंत्रालयाच्या दाराशी उपोषणाला बसेल.मायबाप सरकार, तुम्ही हरामखोर आणि चोर पत्रकारांच्या ढुंगणावर अवश्य लाथा मारा पण राम शिवडीकरांसारख्या अप्रतिम दर्जेदार सर्वांगसुंदर वाचनीय संग्राह्य दिवाळी अंक काढणाऱ्या संपादकाला, मालकाला अगदी बोलावून सन्मानाने त्यांना हव्या तेवढ्या किमतीच्या जाहिराती उपलब्ध करून द्या, असे संपादक असे मालक जगायला हवेत. उद्याचा मराठवाडा नावाने राम शेवडीकर जो दरवर्षी दर्जदार दिवाळी अंक काढतात, असे पत्रकार टिकायला हवेत, आर्थिक दृष्ट्या काहीही करून त्यांना जगवायला हवे….

क्रमश:


पत्रकार हेमंत जोशी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *