ब्राम्हणांना त्रास पाटलांना सासुरवास १ : पत्रकार हेमंत जोशी

ब्राम्हणांना त्रास पाटलांना सासुरवास १ : पत्रकार हेमंत जोशी 

राज्यातल्या तमाम ब्राम्हणांना माझे एक कडवा ब्राम्हण म्हणून आवाहन आहे कि त्यांनी सांगावे या राज्यातल्या कोणत्याही ब्राम्हणेतर विशेषतः मराठ्यांकडून त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास दिल्या जातो का किंवा जाच सहन करावा लागतो, मला शंभर टक्के खात्री आहे कि ब्राम्हणाचे या राज्यातले एकही असे घर नसेल कि जे सांगून मोकळे होईल, हो, आम्हाला मराठ्यांचा, ब्राम्हणेतर मंडळींचा, दलितांचा, मुसलमानांचा त्रास होतो किंवा प्रचंड मानसिक जाच सहन करावा लागतो…


अस्वस्थ ते आहेत कि ज्या मूठभर पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांना हे राज्य भाजपाच्या गोटात शिरावे वाटत नव्हते केवळ त्यातून त्यांचे हे पाद मारणे सुरु असते कि भाजपा ब्राम्हणांची आहे आणि ब्राम्हण वाईट आहेत. या मूठभर मंडळींना डोळ्यात खुपताहेत ते ब्राम्हण आणि भाजपाचे देवेंद्र फडणवीस आणि त्यांचेच एक सहकारी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील. आणखी पुढे जाऊन हेही सांगतो कि दस्तुरखुद्द फडणवीस सरकारमधले देखील काही मंत्री असे आहेत कि जे या दोघांवर दुःख धरून आहेत, बदनामी मोहिमेत अप्रत्यक्ष सहभागी आहेत. मुख्यमंत्री फडणवीस, मंत्री पाटील हे दोघे मराठा मोर्च्याच्या विरोधात नाहीत हे आरक्षणाचे मोर्चाचे नेतृत्व करणाऱ्या गावकऱ्यांना, तरुणांना, सरकारी अधिकाऱ्यांना अन्य सर्व मंडळींना समस्त मराठा विचारवंतांना, मराठ्यांची कायम कडवी बाजू घेणाऱ्या पुरुषोत्तम खेडेकर यांच्यासारख्या दिग्ग्जना फार चांगले ठाऊक आहेत विशेष म्हणजे या राज्यातला एक विशिष्ट राजकीय पक्ष सोडला तर इतर कोणत्याही पक्षात फडणवीस विरोधी भूमिका नाही, त्या सर्व राजकीय पक्षांचा स्वतःवर प्रचंड विश्वास आहे फक्त जळते एकाच पक्षातल्या तेही मूठभर नेत्यांचे कारण अगदी उघड आहे पश्चिम महाराष्ट्रातील जी सत्ताधीश घराणी आहेत त्यांना भाजपाच्या सत्तेत येण्याने मोठी चपराक बसलेली आहे आणि त्या भाजपाचे बेधडक नेतृत्व चंद्रकांत पाटील तसेच देवेंद्र फडणवीस हे दोघे अगदी समोर येऊन करीत असल्याने त्या मूठभर मंडळींच्या मनात अस्वस्थता आहे, त्यातून ते असे व्यक्तीविरोधी वातावरण ते तयार करताहेत, चंद्रकांत पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांची कशी हुर्यो उडविली जाईल त्यावर त्या जेलस मंडळींचे तेवढे लक्ष असते, अन्य कोणीही ब्राम्हणांना त्रास देत नाही आणि त्रास देतात जर असे ब्राम्हणांनी म्हटले तर ते खोटे सांगताहेत मी म्हणेल प्रसंगी चुकून असे घडत असेल तर निधड्या छातीने त्यांच्यासाठी प्रसंगी धावून जाईल, त्यांना अगदी उघड सहकार्य करेल. मी कडवा ब्राम्हण आहे, ब्राम्हणी संस्कार मानतो बऱ्यापैकी पाळतो देखील पण या राज्यातल्या ब्राम्हणांनी मला सहकार्य केलेले नाही मला घडविण्यात वाढविण्यात ब्राम्हणेतर मंडळींचा विशेषतः मराठ्यांचा मोठा हातभार आहे त्यामुळे ब्राम्हणेतर मंडळींवर वाट्टेल ते आरोप करून ब्राम्हण केवळ कसे श्रेष्ठ हे सांगण्याचा आगाऊपणा मी नक्कीच करणार नाही, खाल्ल्या मिठाला जगायचे असते असे मी आमच्या कुटुंबात नेहमीच सांगत आलेलो आहे, काही मग ऐकतात, काही ऐकून न ऐकल्यासारखे करतात…


www.vikrantjoshi.com


चंद्रकांत पाटील नेमके कसे आहेत आणि ब्राम्हणांनी मूठभर मंडळींना घाबरून तणावाखाली या राज्यात विनाकारण वावरू नये हे नेमके सांगण्यासाठी कोणीतरी पुढे येणे गरजेचे होते आणि ते आव्हान मी स्वीकारलेले आहे, यथावकाश क्रमाक्रमाने मनातले सारे मुद्दे नेमक्या पुराव्यांनिशी तुमच्यासमोर बेधडकपणे मांडणार आहे, कृपया माझे हे लिखाण सोशल मीडिया वरून जगातल्या जास्तीत जास्त ब्राम्हण मंडळींसमोर न्यावे अशी तुम्हाला विनंती आहे कारण जगातले मराठी ब्राम्हण सध्या दडपणाखाली किंवा तणावाखाली यासाठी आहेत कि त्यांना वारंवार अलीकडे असे वाटते कि गांधी वधानंतर पुढले अनेक वर्षे जो त्रास अन्याय अत्याचार जाच मानहानी मराठी ब्राम्हणांना या राज्यातल्या ब्राम्हणांना सहन करावे लागले होते ती परिस्थिती पुन्हा निर्माण झालेली आहे, मित्रहो, असे अजिबात नाही म्हणून वस्तुस्थिती तुमच्यासमोर विशद करणार आहे…


अत्यंत महत्वाचा मुद्दा असा कि ज्या ब्राम्हणेतर मंडळींच्या जीवावर भरवशावर माजी मुख्यमंत्री नारायण राणे आणि त्यांच्या दोन्ही मुलांचे राजकीय भवितव्य मतदान अवलंबून असते त्या नारायण राणे यांना जर या राज्यातले देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील आणि ब्राम्हण मंडळी चुकताहेत, विनाकारण मराठा आरक्षणाच्या बाबतीत डावपेच खेळताहेत, वाटले असते तर प्रसंगी राणे यांची भाजपमधून हकालपट्टी जरी झाली असती तरी त्यांनी फडणवीसांची भाजपाची बाजू घेऊन बऱ्यापैकी हे आंदोलन शांत करण्यात उघड सहभाग घेतला नसता पण त्यांनी अगदी समोर येऊन जो पाठिंबा सत्तेतल्या मंडळींना दिलेला आहे त्याचे कारण हेच आहे, राणे यांना फडणवीस किंवा अन्य सखोल समजलेले आहेत…

क्रमश:

पत्रकार हेमंत जोशी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *