उदय सामंत : पत्रकार हेमंत जोशी

उदय सामंत : पत्रकार हेमंत जोशी 

जेव्हा काळ्याभोर लांबलचक दाट केसांमध्ये मागून हळूच येऊन कोणीतरी पांढऱ्या शुभ्र सुगंधी फुलांचा गजरा केसांमध्ये लावावावासा हवाहवासा एखादया सर्वांगसुंदर तरुणीला वारंवार वाटत असते, दुर्दैवाने ती वेळ तिच्या आयुष्यात उशिरा येते म्हणजे गजर्याची फुले कोमेजलेली असतात आणि डोक्यावरचे केस सशासारखे पांढरेशुभ्र होऊन त्या केसांचेही कुत्र्याचे शेपूट झालेले असते..


जेव्हा वय असते एखाद्या तरुणाचे प्रेयसीला घेऊन हातात हात घट्ट पकडून कधी पिकनिकला जाण्याचे तर कधी कॉफी शॉप मध्ये बसून तासनतास एकमेकांकडे बघत वेळ घालविण्याचे पण कुठेतरी माशी शिंकते त्यांच्या आयुष्यात अचानक आलेला एखादा खलनायक तिला गटवून पटवून लग्न करून मोकळा होतो आणि हा प्रियकर एकटाच मग भूतकाळातल्या आठवणी काढत काढत रमतो रंगतो रडतो. पुढे एक दिवस त्याच्या घरातले त्याला लग्न करायला भागही पाडतात पण ती वेळ निघून गेलेली असते म्हणजे त्याच्या नाजूक अवयवाची खारीक झालेली असते आणि डोक्याचे वाळवंट झालेले असते म्हणजे कुठेतरी विरळ केस आणि मध्यभागी एखाद्या सुकलेल्या तलावासारखे डोके…


रत्नागिरीचे आमदार उदय सामंत यांच्यावरून हि दोन्ही उदाहरणे आठवलीत. उदय सामंत मनाने कळकट नाहीत वृत्तीने बळकट आहेत. ते एकदा नामदार देखील होते, राष्ट्रवादीत असतांना नगरविकास खात्याचे राज्यमंत्री होते. राष्ट्रवादीला उदय सामंत नेमके कसे प्रभावी, उमजले नाही त्यांना भास्कर जाधव आकाशाला टेकलेले उत्तुंग लोकनेते वाटले आणि सुनील तटकरे यांना शरद पवारांची सवय झाल्याने त्यांना त्यांच्यापेक्षा मोठा होऊ पाहणारा नेता नको होता, राष्ट्रवादी संपली तरी चालेल हेच तटकरे यांचे मत होते. तेथेच नेमका राष्ट्रवादी पक्षाचा पचका झाला, वरच्या आळीतली म्हणजे रत्नागिरी, सिंधुदुर्गातली उरली सुरली राष्ट्रवादी लयाला गेली आणि उदय सामंत शिवसेनेत गेल्याने तेथे शिवसेनेच्या आमदारांची संख्या वाढली आणि काहीशी अशक्त होत चाललेली शिवसेना उदय सामंत यांच्या प्रवेशाने पुन्हा एकदा छान बाळसे धरती झाली…


सुरुवातीची दोन्ही उदाहरणे आमदार उदय सामंत यांच्यामुळे यासाठी आठवलीत कि उद्धव ठाकरे यांनी सामंत यांचे म्हाडाशी फार उशिरा लग्न लावून दिले, अगदी अलीकडे त्यांना म्हाडा चे अध्यक्षपद बहाल करण्यात आले. जर सामंत यांना म्हाडाचे अध्यक्ष करण्यात त्यांचे नेते उद्धव ठाकरे आणि मित्रवर्य देवेंद्र फडणवीस यांच्या मनात होते तर ते फार पूर्वी दिले असते तर उदय यांचे हे असे एखाद्याचे वृद्धाश्रमात गेल्यानंतर लग्न लावण्या सारखे हे घडले नसते, आता वेळ तसा फार कमी आहे कारण विधान सभा आणि लोकसभा निवडणुका जवळ आल्या आहेत, नसबंदी केलेल्या पुरुषाकडून पुत्रप्राप्तीचा अपेक्षा ठेवण्यासारखे हे घडले आहे…


उदय सामंत हे मनाने आणि पैशांनी श्रीमंत आहेत, दिलदार दमदार आहेत. वास्तविक जे तटकरे यांचे झाले तेच जर विनोद तावडे आणि बाळ माने या कोकणातल्या भाजपाचे नेतृत्व करणाऱ्या नेत्यांचे झाले नसते तर अगदी सहज या दोघांना सामंत यांना भाजपामध्ये आणणे सोपे होते कारण सामंत यांच्या आयुष्यात तो क्षण एवढा नाजूक होता कि त्यांना आपली आमदारकी 

आणि नेतृत्व टिकविण्यासाठी राष्ट्रवादीतून बाहेर पडून शिवसेना किंवा भाजपा पर्याय निवडायचा होता पण भाजपा मध्ये देखील तेच घडले. तावडे आणि माने या दोन एकमेकांच्या जिवलग मित्रांना सामंत यांना भाजपा मध्ये आणणे तगडी स्पर्धा निर्माण करण्यासारखे होते शिवाय बाळ माने त्यांचे नातेवाईक भास्कर जाधव आणि विनोद तावडे हे मित्रांचे त्रिकुट वरून सुनील तटकरे यांचा झालेला शरद पवार, उदय सामंत यांना त्यामुळेच देवेंद्र फडणवीस यांची त्यादरम्यान भाजपाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून तीव्र इच्छा असूनही त्यांना ते करता आले नाही आणि सामंत शिवसेनेत गेले ते कायमचेच, आता त्यांना यापुढे पक्षांतर करायचे नाही याउलट कोकणात रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात शिवसेना अधिक बळकट करायची आहे…


कोकणाचा वरचा भाग हा विषय निघाला कि भाजपा मध्ये विनोद तावडे आणि बाळ माने यांच्या जोडीने मधू चव्हाण यांचेही नाव घ्यावे लागते पण मधू चव्हाण नको त्या वयात कधी मुंबईत तर कधी कोकणात बायको सोडून काही बायकांच्या नादी लागल्याने त्यांचे अलीकडे उरले सुरले नेतृत्व देखील कसे टिकून आहे त्यावर अनेकांना आश्चर्य वाटते, दिसली बाई कि पडले प्रेमात हे वागणे नेत्यांना शोभणारे नसते, भाजपा हा सुसंस्कारित नेत्यांचा पक्ष समजल्या जातो…

तूर्त एवढेच :

पत्रकार हेमंत जोशी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *