पवारांचा गेम पवारांचा नेम : पत्रकार हेमंत जोशी


पवारांचा गेम पवारांचा नेम : पत्रकार हेमंत जोशी 

एखाद्या पुरुषावर  बायको तर प्रेम करतेच  त्याच्यावर त्याची मेव्हणी पण मरत असते जेव्हा कि त्या मेव्हणीला हे पक्के माहित असते कि जावई आपल्याला फक्त वापरून घेतोय. आणखी एक उदाहरण, एखाद्या डिमाण्डेड तरुणाचे कॉलेजातल्या अमुक एका मुलीवर प्रेम आहे हे माहित असतानाही त्याच्यावर एखादी दुसरीच तरुणी भाळलेली असते, मरत असते. राज ठाकरे शरद

पवार आणि उद्धव ठाकरे या त्रिकोणी प्रेम प्रकरणावरून मला हे नेहमीचे आढळणारे उदाहरण आठवले. शरद पवार गावातला देखणा तरुण, या तरुणाचे उद्धव नामक नेत्याशी छान सूर जुळले असतांना, उद्धव त्यांच्या आकंठ प्रेमात पडलेले असतांना आणि पवार यांनी त्यांचे प्रेम उघड केलेले असतांना या दोघात आजही तिसरा राज डोकावतो आहे बघून सखेद आश्चर्य वाटते आहे अर्थात याचे जे कारण आहे ते राज ठाकरे यांना त्यांनी सांगून ठेवले असावे कि जेव्हा केव्हा मी मराठा दलित मुस्लिम मतदारांना व्यवस्थित सिंगलली हॅण्डल करून महायुतीतून बाहेर पडेल तेव्हा तोंडी लावण्यासाठी याने उरलेले मराठी मतदार आकर्षित करण्यासाठी तुम्हालाच नक्की जवळ घेईन, बिलगून मोकळा होईल. शरद पवारांचे हे असे हा ठरलेले आहे कारण त्यांचे तर स्वप्न आहे कन्या सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्री करण्याचे, महाआघाडीतून योग्य वेळी बाहेर पाडण्याचे, प्रसंगी हे पाचही वर्षे महाआघाडी सोबत सध्या संसार करण्याचे नंतर घटस्फोट घेण्याचे…

आज तरी हेच दिसते आहे कि शरद पवार साऱ्यांना प्रसंगी पुतण्या अजित पवार यांनाही बाजूला सारून पुढे निघून जातील त्यातून अतिशय गाफील असलेल्या, केवळ सत्तेसाठी कॉम्प्रोमाइज केलेल्या काँग्रेसचे सर्वाधिक नुकसान होणार आहे जर त्यांनी महाआघाडीला सोडून सत्तेतून बाहेर पडण्याचे ठरविले नाही. काँग्रेसमध्ये नाही म्हणायला राज्यातल्या साऱ्या नेत्यांच्या लक्षात केव्हाच आले आहे पण त्यांचे नेते मंत्रिमंडळात आहेत आणि नेत्यांना सत्तेच्या नशेने ग्रासलेले आहे. त्यांना आता सत्तेची नशा सोडवत नाही, पक्ष नव्हे पैसे बहुतेक मंत्र्यांच्या दृष्टीने महत्वाचे ठरलेले आहे. पृथ्वीराज चव्हाण जरी उघड बोलत नसले तरी त्यांना पवारांचा हा नेमका नेम आणि पक्का गेम समजलेला आहे, त्यातून त्यांचे गल्लीपासून तर दिल्लीपर्यंतच्या साऱ्या नेत्यांचे ब्रेन वॉशिंग करणे सुरु आहे पण त्यांना बाळासाहेब  थोरात वगळता साऱ्यांनी अगदी राहूल गांधींसहित एकत्रित एकटे पाडलेले असल्याने, त्यांचे म्हणणे सांगणे कोणी ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नाही. शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस तिघांचाही नंबर एक शत्रू अर्थात भाजपा विशेषतः व्यक्तिगत नरेंद्र मोदी आहेत आणि महाघाडीला देवेंद्र फडणवीस तेवढे या राज्यात खूप खूप डोळ्यात खुपताहेत. दुर्दैवाने आपल्या या राज्यात नरेंद्र मोदी व त्यांची कुमक कमजोर पडली आहे, महाआघाडीचा हा सत्तेतला

करोना व्हायरस भाजपाला महागात पडलेला आहे…

शरद पवारांचे दलितांना बाबासाहेबांच्या स्मारकातून कुरवाळणे, विशेषतः मुस्लिमांचे लांगुलचालन आणि मराठा ब्राम्हण असा विनाकारण वाद वाढविणे त्यांना सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्री करणे या प्रकारातून सहज सुलभ होणारे आहे पण जातीपातीची तेढ आणि पाक धार्जिण्या मुस्लिमांचे सतत लांगुलचालन, राज्याचे त्यातून भविष्यात मोठे नुकसान होणार आहे. मागल्या पाच वर्षात कंट्रोल्ड झालेले काही पाक विचारांचे मुस्लिम नेते आणि मुस्लिम आक्रमक तरुण त्यांनी भलतेच तोंड वर काढून दादागिरी सुरु केली आहे, हे पाप राज्याला खाली खेचणारे राज्याची बिहारकडे वाटचाल झपाट्याने करणारे नक्की ठरणारे आहे. पवारांचे उद्धव यांना मुख्यमंत्री करणे म्हणजे उद्धव यांना हतबल करून सोडणे हे उद्दिष्ट नक्की सफल झाले आहे. यापुढे दूरदूरपर्यंत सेना व भाजपा जवळ येणार नाहीत, त्यांची युती होणार नाही, त्यांची मते व मने जुळणार नाहीत तेवढी तेढ त्यादोघांत निर्माण करण्यात शरद पवार यशस्वी ठरलेले आहेत. अजित पवारांना गृह खाते न देणे थोडक्यात त्यांनाही पवारांनी अलगद लंगडे लुळे करून सोडले आहे. रस्त्यात आलेले सारे काटे शरद पवारांनी यावयातही मोठ्या खुबीने बाजूला करून पुढल्या स्वप्नपूर्तीकडे त्यांनी यशस्वी घोडदौड सुरु केली आहे अपवाद आणि अडचण त्यांना केवळ राहुल गांधी हे आहेत, काँग्रेसने साथ मधेच सोडली, महाआघाडी तोडली तर मात्र पवार नेमके ध्येय गाठताना कमी पडतील…

तूर्त एवढेच : हेमंत जोशी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *