बायकांनो बिघडू नका : पत्रकार हेमंत जोशी


बायकांनो बिघडू नका : पत्रकार हेमंत जोशी 

आमच्या कुटुंबात एक ओळखीची विवाहित गुजराथी तरुणी आहे ती उत्तम फॅशन डिझाइनर आहे याच व्यवसायात तिचे उत्तम भागायचे पण कोरोना महामारीत व्यवसाय करणाऱ्या बहुतेकांची जशी धूळधाण उडाली आहे त्यातून बहुतेकांची चांगलीच फाटली आहे तिचेही नेमके तेच झाले व्यवसाय पूर्ण ठप्प झाला पण ती हिम्मत हरली नाही तिने या तीन महिन्यात शांत न बसता घाबरून न जाता फूड इंडस्ट्री मध्ये पाऊल टाकले, मला एक चांगली सवय आहे, मी मुंबई पुणे महाराष्ट्रात किंवा देशात कुठेही गेलो तर त्या त्या ठिकाणची उत्तम लोणची शोधून काढतो आणि विकत घेतो, कधी एखाद्या सुग्रण कुटुंबात गेलो तर तेथून निघतांना त्यांच्या घरी तयार केलेली लोणची मुद्दाम पॅक करून घेतो, वृत्तीने आणि जातीने भटजी वरून पत्रकार आहे त्यामुळे दारूच्या बाटलीऐवजी लोणचे मागतांना मला मागायला लाज वाटत नाही थोडक्यात आजतागायत मी अनेक उत्तमोत्तम लोणच्याचा स्वाद घेतला असेल पण अलीकडे आमच्या या गुजराथी तरुण स्त्रीने सॅम्पल म्हणून पाठवलेले लोणचे, तुम्हाला म्हणून सांगतो, आजपर्यंत एवढे अप्रतिम स्वादिष्ट चवदार लोणचे माझ्या खाण्यात आलेले नाही, मुलाचे पाय पाण्यात, ती या क्षेत्रात देखील नक्की यशस्वी होईल आणि कुटुंबाला पुन्हा हातभार लावेल….

कोरोना महामारीत अनेक विशेषतः मराठी कुटुंब रस्त्यावर येणार आहेत कारण अनेकांना व्यवसाय फटका बसला आहे बसणार आहे तर कित्येकांच्या नोकऱ्या जाणार आहेत पण हे संकट म्हणजे चालून आलेली संधी म्हणून त्याकडे बघा आणि हसत खेळत नवीन काहीतरी सुरु करून त्यातही मोठे व्हा यश संपादन करा विशेषतः तरुण मराठी स्त्रियांनी या आर्थिक मंदीच्या संकटात आपला पाय घसरणार नाही याची मोठी काळजी घ्यावी कारण आमच्यातले विकृत तुमच्या मजबुरीकडे बारीक लक्ष ठेऊन आहेत, महत्वाचे म्हणजे ज्यांना मजबूर स्त्रियांचे शरीर हवे असते त्यांना अशा तरुण स्त्रियांसाठी नक्की काहीही करायचे नसते मदत सहकार्य करण्याचा विकृतांचा केवळ एक बहाणा असतो. यापुढे एकाचवेळी उत्पन्नाची अनेक साधने हि संकल्पना ध्यानात घेऊन ठेवूनच मराठी कुटुंबांना नोकरीत किंवा व्यवसायात राहायचे जगायचे आहे हे यापुढे साऱ्यांनी पाठ करून ठेवावे, म्हणजे कठीण प्रसंगातही आपले आर्थिक गणित फारसे बिघडणार नाही, अत्यंत महत्वाचे म्हणजे व्यवसाय बुडाला किंवा नोकरी गेली म्हणून विशेषतः मराठी तरुण जोडप्यांनी व्यसनांना जवळ करून आपले उर्वरित आयुष्य उध्वस्त करून घेऊ नये, तुम्हाला बिघडवायला माणसे आतुर असतात कृपया अशा मंडळींपासून चार हात लांब राहा आणि हिम्मतीने कामाला लागा… 


www.vikrantjoshi.com

भले भले कोरोना महामारीनंतर पूर्णतः बदलले दिसतील विशेषतः हिम्मत न हरता तुमचे आमचे अनेक मित्र उत्पन्नाचे स्रोत वाढवण्यासाठी नक्की काहीतरी चांगले करतील म्हणजे उद्या उदय तानपाठक मुलुंड चेक नाक्यावर बुढीके बाल विकतांना दिसेल किंवा कैलास म्हापदी टेंभी नाक्यावर खारे शेंगदाणे विकतांना दिसू शकतो किंवा मंदार फणसे चार घरी जाऊन इंदोरी साड्या घ्या म्हणून आग्रह करतांना दिसेल किंवा आशिष मोहदरकर पुण्यातल्या पान टपऱ्यांवर जाऊन कंडोमचे प्रमोशन करतांना दिसेल किंवा प्रल्हाद जाधव कुठेतरी चायनीज ची गाडी लावून नूडलस करतांना दिसतील किंवा भली भली माणसे एखाद्या मॉल मध्ये मॉलिश तेलाचे प्रमोशन करतांना दिसतील किंवा एखाद्या  मेडिकल स्टोअर्स बाहेर उभे राहून गर्भनिरोधक गोळ्या विकतांना दिसतील अगदी सुकृत खांडेकर पण तुम्हाला माहीमला सुके बोंबील विकतांना दिसू शकतात. मित्रहो, कदाचित माझीही एखाद्या नाक्यावर कॉफीची टपरी असेल आणि माझ्या शेजारी माझा पत्रकार भाऊ भजी तळताना दिसेल, या महामारीत काहीही घडू शकते अगदी टीना आणि अनिल अंबानी तुम्हाला हातगाडीवर भाजी विकतांना दिसू शकतात पण तुम्हाला हेच सांगायचे आहे कि आयुष्याच्या अखेरच्या श्वासापार्यंत हिम्मत हरायची नसते, मार्ग शोधून परिस्थितीवर मात करून पुढे पुढे जायचे सरकायचे असते. कोरोना महामारी मध्ये आधी आपला जीव वाचणे महत्वाचे आहे कारण राज्य सरकारला हि परिस्थिती फारशी सांभाळता आलेली नाही त्यामुळे वातावरण गंभीर आहे उद्या प्रेत ठेवायला जागा नाही असे बोर्ड लागलेले तुम्हाला दिसलेत तर  त्यात फारसे आश्चर्य वाटून घेऊ नका…

तूर्त एवढेच : हेमंत जोशी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *