क्लुप्त्या अनंत मंत्री सामंत : पत्रकार हेमंत जोशी

क्लुप्त्या अनंत मंत्री सामंत : पत्रकार हेमंत जोशी 

कृपाशंकर सिंह गृह राज्यमंत्री असतांना, दारूच्या दुकानांच्या आणि दारू विकणाऱ्या हॉटेल्स च्या पाट्या देवांच्या नावाने नसाव्यात म्हणून खुद्द त्यांच्या पत्नीनेच आवाज उठवला होता ज्याचे राज्यात सर्वत्र कौतूक तर झालेच पण रिस्पॉन्स देखील मिळाला, कित्येकांनी दारू दुकानांची तसेच दारू विकणाऱ्या हॉटेल्सची देवदेवतांची असलेली नावे तात्काळ बदलविली होती. अलीकडे शिवसेनेचे नेते दिवाकर रावते यांनी सार्या पाट्या मराठीतूनच असाव्यात म्हणून जे आंदोलन छेडले किंवा मनसेने तेच आंदोलन उचलून धरले, महाराष्ट्रात देखील त्यातून इतर राज्यांसारखे घडले, मराठी किमान वाचायला मिळू लागले. या लेखानिमित्ते मला अत्यंत महत्वाचे, सरसंघचालक श्री मोहनजी भागवत यांना देखील हेच सुचवायचे आहे कि या जगात या देशात या राज्यात जेथे कमी तेथे कडवे हिंदू आम्ही, या ज्या आदर्श भूमिकेतून तुम्ही जग देश राज्य बदलविण्याचा प्रयत्न केला मोठे कार्य केले आता मला वाटते या देशात विशेषतः या राज्यात या महाराष्ट्रात बहुसंख्य पाक विचारांच्या मुसलमानांनी आणि या राज्यात विशेषतः पुणे मुंबईत असंख्य अमराठी मंडळींनी ड्रग्सच्या जाळ्यात फार मोठ्या प्रमाणावर तरुण मराठी किंवा भारतीय पिढीला ओढले आहे, रा. स्व. संघाने यापुढे तातडीने ड्रग्स मादक द्रव्य विरोधी मोहीम राबवून उडता भारत किंवा उडता महाराष्ट्र हे देशविघातक काम करणाऱ्यांचे स्वप्न धुळीस मिळवावे…. 

राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत हा असाच झपाटलेला तरुण तडफदार नेता तो त्याच्या मतदारसंघात किंवा रत्नागिरी या त्यांच्या हक्काच्या जिल्ह्यात किंवा मंत्री या नात्याने या अवघड कठीण दिवसात देखील ते काही तरी वेगळे करवून दाखवण्यात कायम गुंतलेले असतात सदा व्यस्त असतात, त्यांच्या उत्साही वृत्तीला हे असे वागणे शोभतेही आणि इतरांना ते आवडतेही. आता हेच बघा, महाराष्ट्रात उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मनातील राष्ट्रभावना जागृत ठेवण्याच्या दृष्टीने किंवा राष्ट्रीय एकात्मतेची भावना रुजविण्यासाठी व देशाभिमानाचे युवा पिढी मध्ये संवर्धन करण्याकरिता उच्च शिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखाली जी जी विद्यापीठे येतात त्या सर्व ठिकाणी अध्यनवर्ग सुरु होण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत गायला हवे असा सरकारी फतवा सामंत यांनी काढून नवा इतिहास रचला आहे. जणू तरुण पिढीला या देशाशी राष्ट्राशी काही घेणे देणे नाही हे असे दृश्य विद्यापीठातून किंवा महाविद्यालयातून दिसायचे, राष्ट्र भावना रुजण्याची व वाढण्याच्या दृष्टीने राष्ट्रगीत कंपलसरी, हा नवा पायंडा मंत्री उदय सामंत यांनी पाडून महाराष्ट्रातील साऱ्यांची छाती अभिमानाने फुलून जावी जणू असे महान मोठे काम त्यांनी केले आहे. अनेकदा उदय सामंत यांचे काही निर्णय चुकतही असतील पण फायदे तोटे यांचा व्यक्तिगत विचार न करता त्यांचे धाडसाने पाऊल उचलणे, मला त्यांच्यातली हि हिम्मत आणि त्यासाठी त्यांची जी मेहनत घेण्याची मनापासून तयारी असते मला वाटते त्यांच्या रत्नागिरी मतदार संघातील प्रत्येकाला त्यांचे हे असे बेधडक वागणे आवडते म्हणून उदय कायम यशस्वी ठरत आले आहेत… 

अत्यंत महत्वाचे म्हणजे उच्च व तंत्रशिक्षण घेणारे वीस लाख विद्यार्थी राष्ट्रगीत म्हणतात असे हे महाराष्ट्र राज्य देशातले पहिले राज्य ठरले आहे. दिवाकर रावते यांनी हाती घेतलेले अप्रत्यक्ष शिवसेनेने हाती घेतलेले महत्वाचे कार्य मंत्री झाल्या झाल्या उदय सामंत यांनी पुढे सुरु ठेवलेले आहे. उच्च शिक्षण संचालनालयाच्या अधिपत्या खाली या राज्यात जे जे येते मग ती विविध महाविद्यालये येत असतील किंवा विद्यापीठे किंवा अन्य कुठलेही क्षेत्र भलेही ते विनाअनुदानित किंवा अशासकीय देखील असतील पण या सर्वंठिकाणचे फलक यापुढे फक्त आणि फक्त मराठीतच असावेत असा फतवा असा लेखी आदेश मंत्री उदय सामंत यांच्या  सूचनेनुसार शासनाने काढला आहे ज्याचे कौतुक राज्यात सर्वत्र होते आहे. डोक्यात कायम काहीतरी वेगळे करून दाखवण्याचा किडा कसा वाळवळतो हे जवळून बघायचे झाल्यास, जा आणि काही क्षण सामंत यांच्या समवेत घालवा. मग तो त्यांचा व्यवसाय असेल किंवा मतदार संघ त्यांचा रत्नागिरी जिल्हा असेल किंवा त्यांचा त्या त्या वेळेचा राजकीय पक्ष, हाती घेतलेले काम आधी तडीस न्यायचे त्यानंतर त्याला नेमकी उंची गाठून देऊन मोकळे व्हायचे, मला वाटते हे असे वागणे त्यांच्या कायम अंगवळणी पडले आहे. चमत्कारिक नव्हे तर सामंत यांच्यासारखे चमत्कार घडवून आणणारे मंत्री सदा कायम प्रत्येक मंत्रिमंडळात असावेत…

तूर्त एवढेच : हेमंत जोशी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *