वाघाची पोपटपंछी : पत्रकार हेमंत जोशी

वाघाची पोपटपंछी : पत्रकार हेमंत जोशी 

मुंबईतले उद्योगपती भाजपाचे प्रवक्ते वाघांच्या अवधूत यांचे नव्याने नामकरण करण्याचे ठरले आहे, यथावकाश तुम्हाला नामकरण सोहळ्याचे निमंत्रण येईलच. अवधूत ऐवजी ‘ अवलिया ‘ हे त्यांचे नवे नाव असणार आहे, अवलिया हेच त्यांचे यापुढे नाव असणार आहे. हा माणूस अवलिया आहे, अवलिया नावाला आणि वाघ आडनावाला तंतोतंत शोभणारा आहे कारण तो वागण्या बोलण्याच्या बाबतीत म्हणाल तर स्पष्टवक्ते प्रवक्ते वक्ते आहेत ज्याला हिंदीमध्ये ‘ मुफट ‘ असे म्हटले जाते मात्र याचा अर्थ वाघ वाट्टेल ते बरळतात असे अजिबात अजिबात नाही जरी ते कोणत्याही अवस्थेत असले तरी कारण ते बुद्धिमान आहेत, उच्चशिक्षित आहेत आणि यशस्वी व्यवसायिक आहेत त्यामुळे नेमके काय बोलावे आणि काय बोलू नये त्यांना नेमके कळते त्यातून अवधूत वाघ यांची कायम नेमणुकांच्या बाबतीत सावध भूमिका घेणाऱ्या भाजपाने प्रवक्तेपदी नेमणूक केलेली आहे आणि हो, ते आडनावाला नक्की शोभणारे आहेत म्हणजे नाव लता आणि आवाज माधवी जुवेकर यांच्यासारखा असे त्यांचे अजिबात नाही, नक्की नाही ते शूर व धाडसी आहेत…


विशेष म्हणजे अवधूत वाघ हे खिशातून वाटणारे दिलदार नेते आहेत ते लुटारू लुबाडणारे लबाड नेते नाहीत त्यांना त्यांच्या उद्योगातल्या यशाची नशा आहे आणि नशेत असतांना देखील तोल न जाऊ देणारे ते भाजपाचे प्रवक्ते आहेत त्यामुळे त्यांनी जेव्हा नरेंद्र मोदी यांना विष्णूचा ११ वा अवतार म्हटले तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या त्यावर विनाकारण चर्चा देखील घडविण्यात आल्या, वाहिन्यांना विषय मिळाला कि त्यांचे हागवणीचा त्रास असलेल्यांसारखे होते म्हणजे दिसला संडास कि सोडा चड्डी तसे या विविध वाहिन्यांचे, मिळाला विषय कि चढा त्यावर. मला मात्र तेव्हाही आणि आजही वाघांच्या त्या वक्तव्यावर अजिबात आश्चर्य वाटले नाही कारण वाघ हे कोणत्याही अवस्थेत बरळणारे नेते नाहीत भाजपाचे प्रवक्ते नाहीत. विशेष म्हणजे भाजपाध्यक्ष रावसाहेब दानवे किंवा भाजपा नेत्यांना देखील त्यावर यासाठी आश्चर्य वाटले नाही कारण त्यांना तशी खात्री आहे, अवधूत बोलतात नक्की बिनधास्त आणि बेधडक पण तरीही तोल आणि तोंड सांभाळून त्यामुळे रावसाहेब दानवे त्यांना एवढेच म्हणाले, यापुढे जरा सांभाळून, निवडणुका तोंडावर आहेत….


विविध पक्षातल्या बहुतेक प्रवक्त्यांना त्यांच्या पक्षाकडून काहीतरी हवे असते त्यामुळे ते हे जोखमीचे काम अतिशय सावध राहून पार पाडत असतात आणि राजकारणातला इतिहासच सांगतो कि ज्याने प्रवक्तेगिरी केली त्याची पुढे शंभर टक्के चांदी झाली. अवधूत वाघ नक्की त्यातले नाहीत, त्यांचे त्यांच्या पक्षावर नरेंद्र मोदी किंवा तत्सम नेत्यांवर मनापासून प्रेम आहे आणि प्रेमापोटी ते कायम कोणत्याही वाहिनीवर पंगा घेऊन दंगा करून मोकळे होतात, प्रवक्त्यांच्या रांगेत त्यांचे नाव आदराने घेतले जाते. मी त्यांना म्हणालो देखील कि ज्यांना विष्णूचे अवतार ठरविल्या म्हटल्यागेले ते प्रभू श्रीराम असतील किंवा भगवान श्रीकृष्ण हे अवतार मानव होते, मोदी देखील मानव आहेत त्यामुळे तुम्ही तुमच्या नेत्याला फार काही वेगळे संबोधले असे अजिबात वाटत नाही… 


त्यावर अवधूत वाघ म्हणाले, हेमंतराव, कण कण में है भगवान…अहो, हिंदू अनेकांत परमेश्वराचा अवतार बघतात. त्यातून पूजा देखील केली जाते म्हणजे वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलांची शेतकरी पोळ्याला किंवा नागपंचमीला तर थेट नागाला पुजल्या जाते हे सारे कृतद्न्यतेतून, शेतीतले उंदीर फस्त करून शेतकऱ्यांचे नुकसान किंवा अन्नाची नासाडी थांबविणार्या नागाची पूजा केवळ परोपकाराची भावनेतूनच केल्या जाते. असे जर असेल तर ९० कोटी जनतेला गॅस कनेक्शन देणार्या ३२ कोटी लोकांची जनधन योजनेतून बँकेत खाती उघडणाऱ्या तब्बल सात कोटी शौचालये बांधणार्या आणि सतत या देशातील दलित पीडित गरीब ओबीसी आदिवासी कामगार अडचणीतल्या महिला, शेतकरी, तरुण वर्ग थोडक्यात यापूर्वी म्हणजे भाजपा सत्तेत येण्यापूर्वी जे जे रंजले गांजले होते त्या सर्वांना सहकार्य मदत करणाऱ्या नरेंद्र मोदी यांना मी परमेश्वराचे अवतार साक्षात विष्णूचे अवतार संबोधून मोठी चूक केली असे मला अजिबात वाटत नाही, मी क्षमा मागणे शक्य नाही, क्षमा मागणार नाही…


मला वाटते मोदी द्वेष्ट्यांनीच मोदी प्रेमींना ‘ भक्त ‘ म्हणून उपरोधाने हिणविण्यास आधी सुरुवात केली पर्यायाने त्यांनीच मोदींना देवत्व बोलण्याच्या ओघात बहाल केले. मोदींचे देवत्व मान्य केले, मी ते फक्त उघड उघड म्हणालो, हाच काय तो फरक. हनुमंताने निरपेक्ष भावनेने रामाची सेवा केली त्यास त्यातून देवत्व प्राप्त झाले, मोदींनी जनतेला राम मानून सर्वस्वी त्यागातून त्यांची ते गेल्या कित्येक वर्षांपासून सेवा करताहेत तेही आपोआप हनुमान ठरले आहेत, देवत्व त्यांना नक्कीच प्राप्त झालेले आहे. विरोध तर रामाला रावणाकडून किंवा कृष्णाला 

कंसाकडून झाला, मोदी देखील त्याच रांगेतले, काही विरोध करतात, चालायचेच, आपण अशांना रावण कंस समजून सोडून द्यायचे…


अवधूत वाघ हे असे बिनधास्त बोलून मोकळे होतात कारण त्यांना काहीही मिळवायचे नसते पण मिळाले तर मिळाले ते गोड मानून पुढे जायचे हे त्यांनी ठरविलेले असल्याने त्यांचे भाजपामध्ये चांगले सुरु आहे जसे माझा मित्र लग्ना नंतर थेट मधुचंद्राच्या रात्री बायकोला घुंगट बाजूला करताच म्हणाला कि तू माझ्या आयुष्यातली पहिली स्त्री नक्की नाही पण शेवटची स्त्री नक्की आहे ते हुबेहूब अवधूत वाघ यांचे भाजपा नेत्यांना नेहमी सांगणे असते कि भाजपा हा त्यांच्या आयुष्यातला पहिला पक्ष नक्की नाही पण शेवटचा मात्र नक्की आहे, उद्या त्यांच्या मृत्यूनंतर हेच छापून येईल कि भाजपा चे नेते अवधूत वाघ आता आपल्यात नाहीत. अवधूत तुम्ही खूप खूप जगावे आणि असेच कायम बोलत राहावे नेहमीप्रमाणे बिनधास्त, सहज उदाहरण दिले, तुम्ही शंभर वर्षे नक्की जगावे आणि असेच बेधडक बोलत राहावे अखेरपर्यंत…

तूर्त एवढेच :


पत्रकार हेमंत जोशी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *