प्रकाश विश्वास आणि चंद्र २ : पत्रकार हेमंत जोशी

प्रकाश विश्वास आणि चंद्र २ : पत्रकार हेमंत जोशी 

विश्वास पाठक हे नागपूरचे आहेत ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कट्टर स्वयंसेवक आहेत भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत एकनिष्ठ कार्यकर्ते आहेत ते भाजपाचे प्रवक्ते आहेत ते महाजनको चे संचालक आहेत ते एकाचवेळी अनेकांचे उजवे आणि डावे हात आहेत म्हणजे देवेंद्र फडणवीस यांना वाटते मी सांगितले पळत ये भेटायला तर विश्वास पाठक धावत येतील चंद्रशेखर बावनकुळेंना वाटते कि माझा हात दाबून पकडून उभे राहा तर पाठक त्यांना घट्ट मिठीचे आलिंगन देऊन स्तब्ध पुतळ्यासारखे म्हणजे चेहऱ्यावर कुठलेही भाव न उमटू न देता एका पायावर उभे राहतील किंवा सुधीर मुनगंटीवार यांनी जर पाठक एखादी कविता म्हणून दाखवा, सांगितले तर क्षणाचाही विलंब न लावता विश्वास पाठक त्यांना राग दरबारी आळवून आळवून गाऊन दाखवतील हे असे त्यांच्याविषयी ज्याला त्याला वाटते कारण कोणाचा कसा विश्वास संपादन करायचा हे त्यांना तंतोतंत कळलेले आहे. नेमके कोठे आक्रमक व्हायचे आणि कोठे तोंडावर बोट ठेवून मूग गिळून बसायचे हेही पाठकांना नेमके माहित असल्याने त्यांचा कधीही मधू चव्हाण झालेला नाही, होणारही नाही…


विश्वास पाठक अगदी बारीक मिशा राखून आहेत. बारीक मिशा किंवा चार्ली चॅप्लिन सारख्या मिशा ठेवणारे चतुर असतात. तलवारीसारख्या मिशा म्हणजे राणा प्रतापांसारख्या मिशा राखणारे आक्रमक पराक्रमी लढवय्ये असतात. ज्यांना मिशा ठेवायला आवडत नाहीत ते मायाळू असतात आणि आपल्याला सर्वांनी तरुण म्हणावे त्यांना वाटत राहते. ज्यांच्या मिशा झुबकेदार असतात त्यांना आपण रुबाबदादार आहोत, कायम वाटत राहते आणि ज्या बायकांना दाढी किंवा मिशा असतात त्यांच्या नवऱ्याचे काही खरे नसते कारण पलंगावर, दाढी मिशा असणाऱ्या बायकांचे नवरे बायकांसारखे निपचित पडून राहतात जे काय आक्रमक व्हायचे असते ते त्या बायकांचे काम असते, पुरुषांची अवस्था वाघाने जबड्यात पकडलेल्या हरणासारखी असते….


अत्यंत महत्वाचे सांगतो जर भाजपाला मुंबईत अमुक एखादी जागाविधानसभेला निवडून येतांना अडचणीची वाटत असेल प्रदेशाध्यक्षांनी आजच विश्वास पाठक यांना बोलावून सांगावे कि तुम्हाला अमुक विधान सभा मतदार संघ लढवायचा आहे, मी तुम्हाला लिहून देतो नागपूरवरून मुंबईत स्थिरावलेले विश्वास पाठक जर निवडून आले नाहीत तर मला हेमंत जोशी म्हणू नका वाटल्यास हलकट म्हणा, वात्रट म्हणा, हेकट म्हणा, उर्मट म्हणा, आमदार अतुल म्हणा किंवा गावठी प्रतुल म्हणा…


विश्वास पाठक कसे आहेत हे सिद्ध करायचे झाल्यास त्यावर राज्याच्या वीज खात्याचे उदाहरण द्यावे लागेल. या खात्याच्या मंत्र्याने म्हणजे चंद्रशेखर बावनकुळे यांनी गेल्याचार वर्षात त्यांच्या खात्याची जी चौफेर प्रगती साधली त्याची दवंडी सध्या विश्वासजी राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यात फिरून तेही वाकबगार पत्रकारांसमोर पिटताहेत. अर्थात बावनकुळे यांनी बहुसंख्य निर्णय घेऊन ते पूर्णत्वाकडे वेळेत नेलेत म्हणून विश्वासजी ज्याला त्याला मोठ्या विश्वासाने, कोणत्याही थापा न मारता सांगत सुटले आहेत, बावनकुळे, वीज खाते आणि युतीचे कौतुक करताहेत.अमुक एखाद्या नेत्याला तमुक एका जिल्ह्यात जाऊन ये, असे जरी सांगितलेतरी तो नाक मुरडतो पण पाठक यांनी हातचे काहीही न राखता पायाला भिंगरी लागल्यागत अख्खे राज्य पिंजून काढले, पिंजून काढताहेत आणि नेमके वीज खात्याचे काम समजावून सांगितले, सांगताहेत त्यावर त्यांचे नक्की कौतुक करावे….


बारीक मिशा राखणारा चतुर माणूस एकाच दगडात किती पक्षी मारू शकतो त्यावर विश्वास पाठक हे उत्तम उदाहरण कारण त्यांनी उत्तम प्रवक्ते उत्तुंग नेते म्हणून अख्ख्या राज्यासमोर स्वतःला प्रोड्युस तर केलेच पण वीजखात्यालाआणि या खात्याच्या मंत्र्याला त्यांनी मोठ्या उंचीवर नेत असतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना आणि वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवारांना देखील खुबीने उंचीवर नेऊन सोडले कारण मुख्यमंत्र्यांनी आणि वित्त खात्याच्या मंत्र्यांनी जर बावनकुळे यांच्याकडे संशयाने बघितले असते किंवा सहकार्य केले नसते तर घेतलेले निर्णय बावनकुळे कधीही पूर्ण करू शकले नसते. त्याशिवाय भारतीय जनता पक्ष वेगळा कसा हेही पाठकांनी राज्यातल्या पत्रकारांसमोर मोठ्या खुबीने मांडले त्याची योग्य दाखल भाजपा नेत्यांनी नक्की घ्यावी…

क्रमश 

पत्रकार हेमंत जोशी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *