क्यों बार बार आशिष शेलार? : पत्रकार हेमंत जोशी

क्यों बार बार आशिष शेलार? : पत्रकार हेमंत जोशी  

नेमके ज्याचे आकर्षण जगाला आहे भारतीयांना आहे मुंबई बाहेरच्याना आहे ते सारे एकत्र बघायचे असेल तर आशिष शेलार ज्या विधानसभा परिसराचे प्रतिनिधित्व करतात त्या आमच्या बांद्रा खार सांताक्रूझ पश्चिम परिसरात सारे काही आहे म्हणजे येथे ते श्रीमंत हायफाय मोस्ट मॉडर्न कायम इंग्रजी बोलणारे मुंबईकर जागोजागी बघायला मिळतात आणि झोपडपट्टी देखील आहे, येथे सिंधी पंजाबी गुजराथी मराठी मुस्लिम ख्रिश्चन सिनेमातले, मोठे व्यायवसायीक, उत्तमोत्तम रेस्टारंटस, शॉपिंग चौपाटी, डिस्को, पब्ज, ड्रेस डिझायनर्स, हॉस्पिटल्स, महागडी घरे, मेंटेन्ड गार्डन्स, महागड्या विविध कार्स, देशी विदेशी विमानतळ, दर्जेदार पंचतारांकित हॉटेल्स, विविध अप्रतिम कॉफीशॉप्स, विविध भाषा बोलणारे सारे काही, ज्याचे इतरांना कायम आकर्षण वाटत आले आहे ते सर्व आमच्या या विधानसभा मतदारसंघात आहे, अत्यंत महत्वाचे म्हणजे या विविधांगी लोकांच्या घराघरात आशिष शेलार यांचे नाव अमुक एखाद्या निमित्ताने निघाले नाही असा दिवस जात नाही, आशिष शेलार हे येथे घराघरात पोहोचलेले एकमेव नाव आहे, एक ते दहा क्रमांकापर्यंत फक्त आणि फक्त आशिष शेलार आहेत नंतर क्वचित एखाद्या नेत्याचे नाव आहे…


आशिष शेलार यांची नजर आणि नियत साफ असल्याने त्यांना त्यांच्या बांद्रा ते सांताक्रूझ जुहू पर्यंत पसरलेल्या झक्कास स्टाईलिश मोस्ट मॉडर्न विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक कुटुंबात म्हणजे घराघरात थेट प्रवेश असतो, त्यांचे अनेक घरात कुटुंब सदस्य असल्यासारखे येणे जाणे असते, प्रत्येक मतदार कुटुंबाला आशिष हे आपल्या घरातले जणू एक सदस्य आहे असे वाटत राहते नेमके तेच शेलारांच्या यशाचे रहस्य आहे अत्यंत महत्वाचे म्हणजे राज्याचे विविध प्रांतात नेतृत्व करत असतांना आशिष शेलार येथेही यासाठी प्रत्येकाच्या मनात हृदयात घरात यासाठी पोहोचलेले आहेत कारण ते सकाळी सात वाजता तयार होतात तेव्हापासून तर रात्री उशिरापर्यंत केवळ लोकांच्या गराड्यात राहून सारे काही नियोजन करतात, सतत विविध विकासकामांना वाहून घेतात. असे सतत आपण बघतो कि जे नेते असतात त्यांची लोकांना तरुण स्त्रियांना व्यवसायिकांना नोकरी करणाऱ्यांना भीती वाटत असते, नको या माणसाची सावली अंगावर पडणे असे मतदारांना जनतेला नेत्यांविषयी वाटत राहते, आशिष शेलार हे असे नेते आहेत कि त्यांच्या बाबतीत कोणत्याही जातीधर्माच्या लोकांना कुटुंबांना मतदारांना वाटतो तो आदर आणि प्रेम, शेलार हे आमचे कुटुंब सदस्य याच भावनेने सारे त्यांच्याकडे बघतात, मला वाटते त्यातूनच अलीकडे केवळ तीन महिन्यांसाठी शेलार मंत्री झाले, त्यांच्या सभोवताली त्या मंत्रालयातील त्यांच्या कार्यालयात भोवताली जो गराडा पडलेला असे, अलीकडच्या काळात जे लोकांमध्ये खऱ्या अर्थाने गाजले नावाजले लोकमान्य ठरले त्या मंत्र्यांपैकी एक आशिष शेलार 

आहेत, असे सांगतांना संकोच वाटत नाही…


www.vikrantjoshi.com


निंवडणुका लागल्या कि घरोघरी जाऊन प्रचार करणे आवश्यक ठरते त्यातून बहुतेक लोकप्रतिनिधी असे असतात कि ते मतदारांना ओळखत नाहीत आणि मतदारांना देखील माहित नसते कि हे आमचे आमदार आहेत. येथे मात्र आमच्या या परिसरात अजिबात तसे नाही म्हणजे शेलार हे सध्या जोमाने प्रचारकार्यात गुंतलेले असले तरी लोकांना ते मुद्दाम प्रचार करण्यासाठी आले आहेत असे काहीही वाटत नाही, ते जसे नेहमी या ना त्यानिमित्ते सतत भेटतात तसे आज भेटले आहेत असेच मतदारांना वाटते आहे. मतदारांना बघितले कि गायब गुप्त होण्यातले किंवा माल कमावून देणाऱ्यांना पायघड्या घालणारे शेलार नाहीत त्यामुळे त्यांच्याकडे मतदारांचा बघण्याचा दृष्टीकोन कायम पॉझेटिव्ह आहे. यापुढे केवळ आशिष शेलार हेच आमचे लोकप्रतिनिधी हे जणू मतदारांनी ठरवून ठेवलेले आहे, त्यामुळेच जेव्हा केव्हा शेलारांनी निवडणूक असेल असते किंवा कार्यक्रम असेल, प्रचारसभा असेल, अति व्यस्त असूनही सारे मतदार स्वयंस्फूर्त झुंडीने बाहेर पडतात, जणू एकत्र येऊन जणू आनंदाचा दसरा साजरा करतात…

क्रमश: हेमंत जोशी

Comments 1

  1. Unknown says:

    मी 1966 ते 1991 या काळात बांद्रा पश्चिम या मतदारसंघात संताक्रूझ पश्चिमयेथे रहात होतो जनसंघाच्या
    काळा पासून माझे आई,वडील व आम्ही सर्व कुटुंबीय पक्षाचे काम करायचो त्या मात्र भाजपला कधी विजय मिळत नसे.या मतदारसंघात रामदास नायक यांनी 1990 च्या विधानसभेत कडवी लढत दिली तरीही 4हजार मतांनी त्यांचा पराभव झाला.आज आशिष शेलारजी यांनी या मतदार संघाला भाजपचा बालेकिल्ला बनवले हे पाहून आम्हाला खूप समाधान व आंनद वाटतो विजय पराजय याचा विचार न करता काम करत रहायांचे हा संघाचा मन्त्र मनात रुजवून केलेल्या कामाला चांगले फळ येते आहे हे अनुभवणे खूप आनंददायी आहे.आशिषजींचे अभिनंदन व खूप शुभेच्छा- नितीन परांजपे, बोरिवली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *