फसलेले गणित : पत्रकार हेमंत जोशी


फसलेले गणित : पत्रकार हेमंत जोशी 

पहिल्यांदा गर्भार असलेली तरुणी माहेरी बाळंतपणाला आली कि बाहेरचे पुरुष तिच्या बापाला भेटायला आलेत कि हि लाजून पटकन आत पळते. गावातल्यांची रस्त्याने ती फिरतांना तिच्या पोटावर साधी नजर जरी पडली तरी हि लाजून लाजून चूर होते लगेच आईच्या पाठी लपते तसे आपल्या अजितदादांच्या सध्या झाले आहे, एकतर ते डोळ्याने दिसता दिसत नाहीत चुकून दिसले तर लाजून असे काही गोरे मोरे होतात कि जणू ते वयात आलेले तरुणी आणि गावचा तरणा आडदांड पाटील त्यांच्याकडे चहा पोह्यांसाठी म्हणजे पोरगी बघायला आला आहे. कोरोना लॉक डाऊन सुरु होण्यापूर्वी संघ भाजपच्या वर्तुळातून आघाडीतले कोणकोणते अस्वस्थ आमदार  बाहेर पडू शकतात त्यावर चाचपणी नक्की सुरु करण्यात आली होती पण कोरोना महामारीचे हे महासंकट ओढवल्यानंतर त्यांनी तशी चाचपणी करणे सुद्धा बंद केले जे भाजपा आणि देवेंद्र फडणवीस या दोघांच्याही दृष्टीने अतिशय योग्य पाऊल उचलल्या गेले एवढेच मी सांगतो..

अलिकडल्या काही दिवसात लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांच्या वाचक लोकप्रियतेचा ग्राफ झपाट्याने खाली आला, लिखाणातून मोठमोठाले संदर्भ देणारे कुबेर हे अभ्यासातून नव्हे तर थेट उचलेगिरीतून मी लोखणांत कसा दर्जेदार दाखवण्याचा प्रयत्न करतात वाचकांच्या लक्षात आले नि येथेच सारे बिघडले. थोडक्यात उचलेगिरी हि अशी एखाद्याला मारक ठरू शकते एखाद्याची लोकप्रियता झटक्यात संपवू शकते म्हणून हा उचलेगिरीचा आगाऊपणा भाजप किंवा संघाने केला नाही कारण फोडाफोडीचे राजकारण या गंभीर वातावरणात त्यांना मोठ्या प्रमाणावर भोवले असते महत्वाचे म्हणजे समजा त्यांना सत्ता जरी मिळाली असती तरी भाजपाची या राज्यातली आजची अतिप्रचंड लोकप्रियता क्षणार्धात रसातळाला आली असती. कोरोना महामारीचे संकट पूर्णतः ओसरे पर्यंत भाजपा सत्तेत येण्यासाठी अगदी धडपड देखील करणार नाही कोणतेही डावपेच आखणार नाही हे माझ्याकडून लिहून घ्या… 


www.vikrantjoshi.com

यादिवसात नाही म्हणायला तशा कंड्या अधून मधून पिकवल्या उठवल्या जातात कि भाजपा, आघाडी मध्ये फूट पाडण्याचा आटोकाट करतेय त्यावर एवढेच सांगतो कि आघाडीला आपला प्रचंड घसरलेला लोकप्रियतेच्या ग्राफची मोठी काळजी असल्याने त्यांच्याकडूनच या अशा अफवा कंड्या मुद्दाम जाणून बुजून पिकवल्या उठवल्या जाताहेत. कोरोना महामारीचे विशेषतः राज्यातील विविध मोठ्या शहरातून वाढलेले संकट जो तो म्हणजे प्रत्येकजण हेच म्हणतोय कि या अशा संकटात फडणवीस मुख्यमंत्री म्हणून हवे होते. का कोण जाणे उद्धव यांचे प्रामाणिक प्रयत्न त्यांच्याच आघाडीतल्या मित्रांकडून आणि मित्रांशी लॉयल असलेल्या सरकारी अधिकाऱ्यांकडून हाणून पाडले जात आहेत म्हणजे उद्धव यांना मुद्दाम किंवा जाणूनबुजून कमकुवत केले जात आहे जे त्यांना एक सक्षम नेता म्हणून आणि शिवसेना एक अति प्रभावी पक्ष म्हाणून कमकुवत केल्या जातो आहे आणि हीच खरी वस्तुस्थिती आहे. माझे एक ब्राम्हण वकील मित्र होते त्यांची अतिशय देखणी मुलगी थेट झोपडपट्टीतल्या मुसलमान तरुणाच्या प्रेमात पडली तिने त्याच्याशी लग्न करू नये म्हणून आम्ही तिला सर्वोतपरी समजावून सांगितले, हेही म्हणालो कि आज तुला हे बरे वाटते आहे पण नंतर शंभर टक्के पस्तावशील, तिने ऐकले नाही, पुढे तेच झाले, पश्चातापातून ती दररोज ढसाढसा रडायची. शिवसेनेचे आघाडी करून त्या ब्राम्हण तरुणीसारखे झालेले आहे, उद्धव यांना नक्की मनस्ताप आणि पश्चाताप होतो आहे पण याक्षणी त्यांना बाहेर पडणे आता शक्य नाही…

तूर्त एवढेच : हेमंत जोशी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *