पवारांची लायक नालायक पिढी : पत्रकार हेमंत जोशी

पवारांची लायक नालायक पिढी : पत्रकार हेमंत जोशी 

आजकाल तुला पाहते रे मालिका बघणार्या प्रत्येकाला जशी इशा मध्ये राजनंदिनी दिसायला लागलेली आहे तसे बारामतीकर राहुल पवार मध्ये मला दिवंगत शरद पवारांचे ज्येष्ठ श्रेष्ठ बंधू आप्पासाहेब पवार दिसू लागले आहेत. हा चमत्कार साधासुधा नाही परमेश्वरी चमत्कार आहे, हा चमत्कार बघून ‘ शंभर टक्के फक्त आणि फक्त स्वर्गात बसलेले ‘ आणि त्यांच्या जिवंतपणी शेतकऱ्यांचे मसीहा ठरलेले आप्पासाहेब पवार अगदी नक्की सुखावले आहेत जे त्यांना, हयात असलेल्या त्यांच्या लाडक्या राजेंद्र उर्फ राजुला, राजुच्या पत्नी सुनंदाताई यांना साकारता आले नाही जमले नाही ते स्वप्न साकारतोय प्रत्यक्षात उतारवतोय त्यांचा नातू यंगस्टर यंगस्टार आणि प्रतिभावान रोहित राजेंद्र पवार…


कदाचित पार्थ पवार लोकसभेला निवडूनही येतील पण भरघोस मतांनी जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आल्यानंतर एखाद्या आमदारालाही लाज वाटावी पद्धतीने रोहित पवार बारामती परिसरात राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात काम करीत असल्याने सध्या जी अजित पवार शरद पवार यांना पार्थ निवडून येईल किंवा नाही याची जी धाकधूक वाटते तेच जर त्यांनी रोहित पवारांना या लोकसभा निवडणुकीची उमेदवारी दिली असती तर ती धाकधूक त्यांना राहिली नसती पण एकाचवेळी पवारांच्या घरातले अनेक राजकीय संदर्भ त्यातून बदलले असते म्हणजे रोहित खूप पुढे निघून गेले असते, पार्थ त्यांच्या भावासंगे म्हणजे जय यांच्यासंगे व्यवसाय करण्यासाठी दुबई ला निघून गेले असते, राज्यातल्या राजकारणात हेच रोहित, सुप्रियाताई आणि अजितदादा यांच्यापुढे निघून गेले असते पण रोहित यांना हे असे पटकन पुढे निघून जाणे निदान शरद पवार हयात असेपर्यंत किंवा राजकारणात ऍक्टिव्ह असेपर्यंत सहज शक्य नाही त्यामुळे पुढे न जाऊ देण्याची जी खंत आप्पासाहेब पवारांना त्यांच्या स्वतःबाबत होती किंवा मुलगा राजू आणि सुनबाई सुनंदाताई यांच्याविषयी कायम होती जी अस्वस्थता त्यांच्या मनात शेवटपर्यंत होती ते तसेच रोहित यांचाही बाबतीत घडले आहे, रोहितला लोकसभा नाकारून शरदरावांनी पार्थ यांना संधी दिलेली आहे, पार्थ हे रोहित होणे शक्य नाही त्यामुळे शरदरावांना सुप्रियाचे काय, अशी चिंता पुन्हा एकवार सतावणारी नसल्याने पवारांनी पवारांच्याच घरात घराण्यात एकाच दगडात नेहमीप्रमाणे एकाचवेळी अनेक पक्षी मारले आहेत नेमकी तीच खरी वस्तुस्थिती आहे…


www.vikrantjoshi.com


वाचकमित्रांनो, पवारांच्या घरात बाकी काहीही असो पण अजितदादा यांनी मनाचा मोठेपणा दाखवून वयात केव्हाच आलेल्या पार्थ यांना राजकारणात येण्याची जी संधी दिली ते चांगले काम झाले अन्यथा घरात काहीही अधिकार न ठेवलेल्या वयाची पंचविशी पार केलेल्या पार्थ यांना काही काम नाही म्हणून नैराश्य आले असते. ठीक आहे, पार्थ यांना राजकारण शिकण्यासाठी नक्की काही वेळ जाणार आहे त्यांना आज लगेच रोहित होणे शक्य नाही कारण रोहित यांनी अगदी मनापासून ग्रामीण भागात आईवडिलांसंगे सामाजिक क्षेत्रात योगदान दिल्याने त्यांना नेमके नेतेपण पटकन जमले पण पार्थ हे रोहित होणारच नाही असे अजिबात नाही किंवा त्यावर आज काही भाष्य करणे भविष्य सांगणे चुकीचे ठरेल. मेहनत करावी, पार्थ अजित पवारांनाही चांगली संधी आहे….


रोहित पवारांना लोकसभेला डावलल्याबद्दल ते भाजपामध्ये निघून जाण्याच्या हालचाली कानावर पडल्या तेव्हा मन अस्वस्थ झाले, रोहित नको त्यावेळी नको तो निर्णय घेऊन शरदरावांशी पंगा घेऊन पायावर धोंडा पाडून घेताहेत कि काय, वाटायला लागले होते पण त्यांच्या भाजपा प्रवेशाच्या बातम्या हवेत विरल्या हे नक्की चांगले झाले. कोणते त्यांचे वय निघून चालले आहे, सत्तेत झेप घेतांना थोडा विलंब होऊ शकतो पण शरद पवारांशी पंगा घेऊन त्यांचे अधिक राजकीय नुकसान झाले असते म्हणजे पुन्हा एकदा आप्पासाहेब पवारांची पुनरावृत्ती झाली असती ते घडले नाही. शरद पवारांच्या घरात राजकीय महत्वाकांक्षा असली तरी मला खूप पुढे जायचे आहे हे भासवु द्यायचेही नसते, तसे अजिबात दाखवायचे नसते पुढे भलेहि अजितदादांच्या रूपात नाकापेक्षा मोती जड ठरतो पण तेही सारे काही काळापुरते होते, असते. शरदरावांनी दादांनाही त्यांची जागा दाखवून दिली होती हा राजकीय इतिहास सर्वांना सांगण्याची येथे गरज नाही. दुर्दैवाने आप्पासाहेबांना ते लपविता आले नाही त्यांना देखील राजकारणात नक्की खूप पुढे निघून जायचे होते पण एका म्यानात दोन तलवारी शरदरावांच्या बाबतीत ते शक्य नव्हते आणि आपासाहेबांना मग त्रागा करीत केवळ समाजसेवक म्हणून शेवटपर्यन्त बारामतीमध्येच अडकून पडावे लागले. रोहित पवारांचा नक्की अगदी शंभर टक्के आप्पासाहेब होणार नाही, ते राजकारणात सरस ठरतील. पवारांना पवारांच्याच घरात एक चांगला प्रतिस्स्पर्धी स्पर्धक तयार झाला आहे…

क्रमश:


पत्रकार हेमंत जोशी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *