शरदराव असे का केले तुमचे नक्की चुकले : पत्रकार हेमंत जोशी


शरदराव असे का केले तुमचे नक्की चुकले : पत्रकार हेमंत जोशी 

मी काय लिहावे कोणावर लिहावे आणि विक्रांतने माझ्या मुलाने काय लिहावे कोणावर लिहावे कसे लिहावे, आम्ही एकमेकांना त्यावर कधीही सल्ले देत नाही किंवा कोणतीही आडकाठी आणत नाही पण मी धनंजय मुंडे विषय घेऊ नये असे त्याचे सांगणे होते त्यावर तुझ्यापेक्षा माझे धनंजयवर अधिक प्रेम आहे पण जेथे चुकल्यास मी सक्ख्या भावाला सोडत नाही तुला देखील सोडणार नाही ते मग धनंजय कोण, आणि मी लिहिले, लिहीत राहील, विक्रांतने त्यावर घरात मोठी नाराजी व्यक्त केली, माझ्याशी अबोला पण धरला पण काय करु, लिखाणाच्या रणांगणावर मला अर्जुन व्हायचे नसते त्यावेळी मीच माझा अर्जुन आणि मीच माझा सारथी कृष्ण असतो, लिहिता लिहिता धारातीर्थ पडलो तरी मला त्याची चिंता नसेल पर्वा नसेल. अगदी उद्या मला अवघड जागी फोड झाला तरीही मी तो लपवणार नाही. १९९७ दरम्यान करुणा शर्मा आणि कुटुंबीयांची धनंजयशी इंदोरला ज्यांनी पहिल्यांदा ओळख करून दिली होती ते अध्यात्मिक गुरु देखील त्यातलेच होते कि, जसा गुरु तसा शिष्य, परंपरा छान सुरु आहे. जिच्याशी रीतसर लग्न झाले त्या  धनंजय यांच्यापासून राजश्री यांना तीन मुली झाल्या, घराण्याचा वारसा नको का त्यावर मग राजश्री  व धनंजय यांच्यात अनेकदा वाद होत गेले आणि एकदाचे धनंजय यांच्या मनासारखे झाले, राजश्री यांनी मोठ्या नाराजीने परवानगी दिली आणि करुणाला देखील एक मुलगीच झाली, दुसरीही मुलगी झाली असती तर… 


धनंजय मुंडे यांचा दुसरे लग्न कारण्याचा हेतू केवळ वारसदार हा असता तर जनतेने त्यांनी केलेली हि मोठी चूक नक्की खपवून घेतली असती पण वारंवार जाणूनबुजून मुद्दाम केलेल्या भानगडींना चुका नव्हे तर माफ न केल्या जाणारा गुन्हा म्हटल्या जातो, जो गुन्हा तुम्ही अनेकदा किंवा वारंवार केला आहे विशेष म्हणजे ज्यासाठी तुम्ही हा अट्टहास केला तो मुलगा उद्या या सारी बदनामीतून आणि आईला व मावशीला होणाऱ्या मानसिक आर्थिक सामाजिक त्रासातून  तुमच्याकडे येईल अजिबात वाटत नाही. तारुण्यातल्या केलेल्या चुका त्यावेळी जाणवत नाहीत पण जसजसे आपले वय वाढत जाते आणि पोटची मुले व मुली मोठी होत जातात, धनंजय त्यातून पुढे अनेक गंभीर समस्यां निर्माण होतात, शेवटी वारसदार  मुलगाच जर उद्या तुम्हाला विचारणार नसेल किंवा त्याच्या आईला तुमच्यापासून होणाऱ्या त्रासावर जाचावर अस्वस्थ राहणार होणार असेल त्यावेळी मात्र तुमचे मन आतून नक्की खूप अस्वस्थ झालेले असेल. महत्वाचे म्हणजे शरद पवार यांनी किमान पुढले काही महिने तरी धनंजय मुंडे यांच्याकडून मंत्रिपदाचा राजीनामा घेणे अत्यावश्यक होते. शरदराव, तुमचे जे काय चालले आहे ते जनतेला शंभर टक्के अस्वस्थ करणारे आहे. आधी तुम्ही तुरुंगातल्या छगन भुजबळ यांना थेट मंत्री केले त्यानंतर धनंजय मुंडे यांची पाठराखण केली आणि त्यापुढले अति महत्वाचे म्हणजे जेथे राष्ट्र किंवा राज्य नष्ट होते त्या ड्रग्स प्रकारणात देखील तुम्ही गुन्हेगाराच्या सासऱ्याची देखील म्हणजे मंत्री नवाब मलिक यांची पाठराखण केली… 


काहींही केले म्हणजे ड्रग्स विकले खून केले तुरुंगात गेले गुन्हे केले अनेक लग्न केलीत बलात्कार केले तरी महाराष्ट्रात खपवून घेतल्या जाते, सरंक्षण मिळते वरून सत्तेत देखील राहता येते, हा जो मेसेज महाआघाडी सरकार सत्तेत आल्या पासून नेत्यांपर्यंत पोहोचला आहे, तेथेच हा महाराष्ट्र आता संपला आहे. जावई सुळेसाहेब नेमके काय करतात कुठे जातात काय व्यवसाय उदयोग करतात हे अत्यंत व्यस्त असून देखील जसे शरद पवार यांना माहित असते मग ड्रग्सच्या व्यवसायात कुटुंबातले कोण कोण हे नवाब मलिक यांना माहित नाही नसावे असे भासवून शरद पवार यांनी या मंत्र्याला पाठीशी घालणे किंवा सरकारशी संबंधित कोणत्याही नेत्याला मंत्र्याला महाआघाडीने पाठीशी घालणे, म्हणजे गंभीर गुन्हेगारीला सरकारी संरक्षण मिळते असे चित्र आता स्पष्ट होऊ लागले आहे. शरदराव, या राज्यातले सारे तुम्हाला चळाचळा कापतात, तुम्ही असे संरक्षण देणे कृपया थांबवा, पुढल्या निवडणुकातल्या मतांवर कोणताही वाईट परिणाम होणार नाही, उलट सारेच मतदार तुमच्या पाठीशी नक्की उभे राहतील. नाहीतर या राज्याचे मराठी माणसाचे यापुढे काही खरे नाही. बलात्कार, व्यभिचार, ड्रग्स, तुरुंगवास, खुनाखुनी हि आपली संस्कृती नाही, शरदराव, तुम्ही आमचे हिरो आहात आणि कोणताही हिरो कधीही खलनायकासारखा वागत नाही, लगेच आत्ताच्या आत्ता घ्या सोटा हाती आणि मारा या अशा बदमाशांच्या ढुंगणावर, बघा कसे सारे सुतासारखे सरळ होतात… 


तूर्त एवढेच : हेमंत जोशी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *