विवाहबाह्य संबंध : पत्रकार हेमंत जोशी

विवाहबाह्य संबंध : पत्रकार हेमंत जोशी 

व्हाट्सअप हे विवाहबाह्य संबंध ठेवणाऱ्यांसाठी, प्रियकर प्रेयसींसाठी, विशेषतः शारीरिक आकर्षण आणि संबंध असणाऱ्यांसाठीचे अलीकडे अतिशय प्रभावी माध्यम ठरले आहे. समजा मला माझ्या भावाला काही सांगायचे असेल तर मी फोन करेन पण माझे लफडे असेल तर सर्वांसमोर मला सतत उठसुठ फोन करणे शक्य नसते अशावेळी अलीकडे व्हाट्सअप हे महत्वाचे माध्यम ठरले आहे. अमुक एखाद्या स्त्री किंवा पुरुषाचा व्हाट्सअप सतत ऑन लाईन असेल तर हमखास समजावे कुठेतरी नक्की पाणी मुरते आहे, विशेषतः या लॉक डाऊन च्या दिवसात आपल्या लहानशा घरात एकमेकांपासून लपून छपून शिवशिवीसारखा जो व्हाट्सअप नावाचा प्रेम खेळ खेळताहेत, तुमच्या ते लक्षात येईल कि राज्यातले देशातले घटस्फोटाचे प्रमाण नक्की वाढणार आहे. लॉकडाऊनच्या दिवसात सतत शारीरिक संबंध ठेवण्यास जबरदस्ती करतो अशी तक्रार करण्याची हिम्मत कुठल्याशा तरुणीने दाखवली आहे, तिने ती हिम्मत केली इतर असंख्य स्त्रिया किंवा पुरुष तसे करण्यास धजावत नाहीत एवढाच काय तो फरक अन्यथा जो पुरुष लॉक डाऊन आधी आठवड्यातून फारतर दोन वेळा पत्नीकडे शरीर सुखाची मागणी करीत असे आज तोच पुरुष जर दररोज शारीरिक सुखाची मागणी करीत असेल तर अर्थ सरळ आहे, साहेब बाहेर नक्की शेण खाताहेत…

स्वातंत्र्याचा मनमुराद आनंद उपभोग घेणाऱ्या स्त्रियांची देखील संख्या कमी नाही त्यामुळे एरवी जी पत्नी नाक मुरडून आठवड्यातून कधीतरी नवऱ्याची शारीरिक इच्छा पूर्ण करीत असे तीच आज या लॉक डाऊन च्या काळात नवर्याकडे कायम आशाळभूत किंवा वखवखलेल्या नजरेने बघत असेल तर चतुर पुरुषांनी समजून घ्यावे पाणी नक्की कुठेतरी मुरते आहे. अत्यंत महत्वाचे म्हणजे आपले शौक पूर्ण करून घेण्यासाठी भरपूर पैसा तर हवा, त्यातून  असे कितीतरी नवरा बायको किंवा कुटुंब सदस्य आहेत असतात कि ज्यांच्या घरातील तरुण स्त्रियांचे एखादे लफडे बाहेर असले तरी खपवून घेतल्या जाते. मला नेमकी भीती याच लफड्यांची वाटते कि लॉक डाऊन संपल्यानंतर स्त्री पुरुष विवाहबाह्य संबंधाचे प्रमाण यासाठी मोठ्या प्रमाणात वाढणार आहे कि बहुतेकांना आर्थिक चणचण जाणवणार आहे किंवा असुरक्षतेची भावना वाढीस लागल्याने देखील या अशा लफड्यांची नक्की मोठी चलती राहणार आहे. मला अशा स्त्री पुरुषांचे आश्चर्य वाटते कि जे एकाचवेळी घरी आणि दारी बेमालूम प्रेमाचे प्रदर्शन घडवून आणतात…

बाहेर प्रियकराच्या प्रेमात आकंठ बुडालेली स्त्री जेव्हा घरी आल्यानंतर नवऱ्यासमोर प्रेमाचे असे काही नाटक करते कि नेमके कळतच नाही कि तिचे अधिक प्रेम नक्की कोणावर आहे. पुरुष तर याबाबतीत एकदम हरामखोर. घरात आल्यानंतर बहुसंख्य पुरुष असे भासवितात कि तेच एकपत्नीव्रत प्रभू रामाचे अवतार आहेत आणि बाहेर तेच पुरुष कितीतरी बायकांशी विवाहबाह्य संबंध ठेवून असतात. ज्यांना घरात खरोखर अडचण आहे, नवरा बायको मधले संबंध दुरावलेले आहेत किंवा जबरदस्तीने संसार रेटावा लागतो आहे अशा स्त्री पुरुषांचा एकवेळ तोल गेला पाय घसरला तर त्यात काही चुकीचे घडले म्हणता येणार नाही पण केवळ शारीरिक विकृती आणि सुख त्यातून विवाहबाह्य संबंध वाढीस लागले असतील तर ते नक्की चुकीचे आहे. येथे मी नाव

नमूद करीत नाही पण अशा एका देखण्या स्त्रीला मी माझ्या फेसबुकवरून डिलीट केले जी फेसबुकवर स्वतःचे उत्तान फोटो टाकायची, विशेष म्हणजे जेव्हा मी तिची फ्रेंड लिस्ट चेक केली त्यात केवळ पुरुषांचा भरणा होता जे पुरुष तद्दन चालू आणि स्त्रीलंपट होते. पुन्हा एकवार सांगतो ज्यांना खरोखरी आधाराची प्रेमाची गरज आहे त्यांचा एकवेळ तोल गेला तर आपण समजू शकतो पण एकमेकांना फसवून विवाहबाह्य संबध ठेवणाऱ्या नवरा बायकोची पुढली पिढी फारशी चांगली निघाली, असे फारसे घडत नाही….

तूर्त एवढेच : हेमंत जोशी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *