शुद्ध बिजा पोटी ३ : पत्रकार हेमंत जोशी

शुद्ध बिजा पोटी ३ : पत्रकार हेमंत जोशी 

सौंदर्य सत्ता आणि पैसे या तिन्ही गोष्टींचा कधी गर्व करू नये याउलट सकाळी उठल्यानंतर सर्व शक्तिमान परमेश्वराला हात जोडून एवढेच सांगावे, माझ्या डोळ्यासमोर माझ्या घरातून अकाली वयाची एकही प्रेतयात्रा निघू नये आणि जेवढे आयुष्य दिले आहेस तेवढे निरोगी जगू दे. जे माजले ते संपले असे असंख्य मी बघितलेले आहेत. माजलेल्यांचा वक्त चांगला असू शकतो अंत नक्की वाईट होतो. जेव्हा सारे काही परमेश्वराने बहाल केलेले असते आपण मिळविलेले असते त्या दरम्यान जर इतरांना चांगली वागणूक दिली, उत्तम वर्तणूक ठेवली तर कधी काळी आयुष्यात वाईट बेतले तरी आपली कुचेष्ठा होत नाही, इतरांना सहानुभूती वाटते आणि त्यांचे ब्लेसिंग्स नक्की मदतीला येतात…


काही उदाहरणे आधी देतो. काही वर्षांपूर्वी महाजन नावाचे माझे एक वकील मित्र होते. त्यांची अतिशय देखणी मुलगी एक दिवस अचानक घरातून गायब झाली.आम्ही कितीतरी प्रयत्न केले पण ती सापडली नाही. बापाच्या मनाची घालमेल काय असते ते त्यावेळी मी अगदी जवळून बघितले. अर्थात ती पळून गेलेली आहे, एवढे त्यांच्या नक्की लक्षात आलेले होते. पुढे ७-८ महिन्यानंतर त्यांना कळले कि ती नेमकी कुठे आहे. एका सुखवस्तू सुशिक्षित घरातली देखणी १८-१९ वर्षांची तरुण मुलगी एका झोपडपट्टीत राहणाऱ्या मुस्लिम तरुणाने फूस लावून तिला पळवून नेली होती या मुंबईत ज्या मुस्लिम पट्ट्यात थेट पोलिसांना शिरणे कठीण असते तेथे महाजन वकिलांना पोटाची पोरगी शोधणे नक्कीच शक्य नव्हते…ती सापडली भेटली तेव्हा ती गर्भवती होती तरीही महाजनांनी तिला विचारले, येथून तुला बाहेर पडायचे आहे का, घरी परतायचे आहे का, ती म्हणाली मला जेव्हा या नरकातून बाहेर पडायचे होते तेव्हा ते शक्य झाले नाही, कालपर्यंत नरकासमान वाटणारे हे वातावरण मलाच आता मनापासून आवडायला लागलेले आहे, जाऊ द्या आता मी येथेच माझे आयुष्य आनंदात काढते.


www.vikrantjoshi.com


आणखी एक उदाहरण सांगतो. माझ्या ओळखीचे एक डॉक्टर आहेत, अमेरिकेत ते खोऱ्याने पैसे मिळवायचे पण पत्नीशी अजिबात पटत नव्हते. ते देखणे आणि ती देखील देखणी बुद्धिमान, दोन मुले झालीत पण पटत नव्हते. शेवटी एक दिवस वैतागून डॉक्तरांनी सारी इस्टेट पत्नी आणि मुलांच्या नावे करून ते भारतात आले, आता गुजराथच्या आदिवासी भागात ते विनावेतन आपली सेवा देताहेत, त्यांच्याही बाबतीत तेच, त्यांचे हे असे संसाराला लाथ मारून निघून जाणे, त्यांच्या पत्नीला प्रचंड मनस्ताप आणि पश्चाताप झाला, तिने पुन्हा त्रास देणार नाही वचन दिले,अमेरिकेत परतण्यास सांगितले. पण तिकडे अमेरिकेत पंचतारांकित जीवन तेही सौंदर्यवती पत्नीसंगे जगणार्या डॉक्तरांनी परतण्यास साफ नकार दिला कारण आता त्यांना आयुष्यात प्रेयसी म्हणून आलेल्या सामान्य स्त्रीची आणि तेथल्या अतिसामान्य वातावरणाची गोडी लागलेली आहे, जंगलातले ते रुक्ष आयुष्य आता त्यांच्या पचनी पडलेले आहे…


आधी ऐषोरामी जीवन जगलेल्या एखाद्या पुरुषाला जर पुढला जन्म थेट जंताचा मिळाला आणि परमेश्वराला समजा दया आली कि या जंताला विचारून त्याला पुन्हा पुढला जन्म माणसाचा द्यावा त्यासाठी त्याने यमाला पाठवून आणि यमाने ठार मारण्यासाठी जंताला हाती घेऊन जर सांगितले कि मी आता तुला ठार मारतोय आणि पुढला जन्म मनुष्याचा देतोय, मला खात्री आहे घाण खाण्याची सवय लागलेला तो जंत अगदी गयावया करून यमाला हेच सांगेल, मी येथे मजेत आहे, मलाप्लिज प्लिज ठार मारू नको. हे सारे मला दैनिक लोकमत वरून आठवले. अलीकडे गेली २५ वर्षे केवळ वार्ताहारकी करणाऱ्या यदु जोशी यांना तेथे थेट दोन पदोन्नत्या देऊन मुख्य सहाय्यक संपादक करण्यात आले आहे, नेमके याच मुद्द्यावर मला विस्तृत लिहायचे आहे म्हणजे यदु जोशी यांना प्रमोट होण्याची संधी मिळाली होती का कि नाही आणि संधी समजा मिळाली असेल तर त्यांना वर जी उदाहरणे दिलेली आहेत त्यापद्धतीने आहे त्याच डबक्यात राहायला बागडायला आवडलेले होते कि दर्डा यांनी त्यांना मुद्दाम पदोन्नतीपासून दूर ठेवलेले होते. पदोन्नत्या आणि दैनिके त्यातील राजकारण त्यावर पुढे तुम्ही वाचायला हवे…

क्रमश:

पत्रकार हेमंत जोशी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *