कोण कसे : तावडे असे २ : पत्रकार हेमंत जोशी

कोण कसे : तावडे असे २ : पत्रकार हेमंत जोशी 

अलिकडल्या काळात प्राध्यापक वसंत पुरके सोडले तर लक्षात ठेवावेत लक्षात राहतील असे शिक्षण मंत्री झालेच नाहीत, राजेंद्र दर्डा यांच्यासारख्या शिक्षण मंत्र्यांना तर जेवढे लवकर विसरू, तेवढे चांगले. वास्तविक पुरके, नाईक आणि दर्डा हे तिघेही यवतमाळ जिल्ह्यातले, दर्डा आणि पुरके तर खुद्द यवतमाळचे, पण पुरके यांना शिक्षण पद्धतीमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणायचे होते, राजेंद्र दर्डा किंवा पतंगराव कदम यांच्या शिक्षण प्रेमाविषयी मी न बोललेलेच बरे, याच यवतमाळ जिल्ह्यातल्या दिवंगत सुधाकरराव नाईक यांनी शिक्षण मंत्री म्हणून दूरगामी आणि आमूलाग्र बदल घडवून आणले, या राज्यात शैक्षणिक क्रांती आणण्याचे श्रेय अर्थात सुधाकरराव नाईक आणि मधुकरराव उर्फ बाळासाहेब चौधरी यांना, चौधरी यांनीच दहा प्लस दोन प्लस तीन हि नवशिक्षण क्रांती या राज्यात तब्बल ४५ वर्षांपूर्वी घडवून आणली. चौधरी यांना गुरुस्थानी मानणारे सुधाकरराव नाईक यांनीहि शेजारच्या कर्नाटक राज्याची भलेही नक्कल केली, अनुकरण केले म्हणजे त्यांनी शिक्षणाचे खाजगीकरण करून उच्च किंवा दर्जेदार शिक्षण घेण्यासाठी राज्याबाहेर जाण्याची गरज नाही, हे सिद्ध केले.अर्थात कोणत्याही सरकारी शासकीय योजना चांगल्या असतात पण त्या योजना पुढे लोकांच्या न राहता पुढाऱ्यांच्या दलालांच्या होतात, शिक्षण क्षेत्राचेही खाजगीकरण झाल्यानंतर तेच झाले, या अफलातून कल्पनेचे स्वतःसाठी आर्थिक फायदे घेणारे पतंगराव कदम डी वाय पाटलांसारखे शिक्षण सम्राट जन्माला आले आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांना लूट लूट लुटून नवश्रीमंत झाले, आजही लुटणे अव्याहत सुरु आहे. अर्थात त्यास अपवाद दिवंगत सुधाकरराव नाईक हेही नव्हते, ते देखील तळे राखी तो पाणी चाखी उक्तीनुसार पुसदचे शिक्षण सम्राट म्हणून पुढे आले, त्यांच्या पश्चात त्याचे चिरंजीव जय यांनी फारसे काही वेगळे केले नाही, आता जय त्या मधुकरराव चौधरी यांच्या चारही मुलामुलींसारखे शिक्षण संस्था चालवतात, मजा मारतात… 

या पार्शवभूमीवर विद्यार्थीमय झालेले शिक्षणमंत्री विनोद तावडे जे म्हणताहेत ते खरोखरी कौतुक करण्यासारखे. तावडे म्हणतात, सर्व स्तरांतील प्रत्येक विद्यार्थ्याला परवडण्याजोगे आणि दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देणे हे शिक्षण विभागाचे कर्तव्य आहे. म्हणूनच शिक्षण संस्थांमध्ये वाढत असलेले बेकायदेशीर व्यापारीकरण थांबविण्यासाठी शासनाने कडक भूमिका घेतली आहे. वाटेल तशी फीवाढ व विद्यार्थी-पालकांवर लादण्यात येणारे अतिरिक्त खर्च यांच्याविरोधात शाळा प्रशासनांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. वय, आर्थिक परिस्थिती आणि सामाजिक स्थान यापलीकडे जाऊन शिकण्याची इच्छा बाळगणार्या प्रत्येकाला शिक्षणाच्या समान संधी उपलब्ध करून देणे हे आमचे धोरण आहे. त्यासाठी राज्यात मुक्त विद्यालये सुरु करण्याची योजना आखण्यात आली आहे….

संघ भाजपा आणि वसंतराव भगवंतांच्या संस्कारातून म्हणजे विद्यार्थी परिषदेच्या जडणघडणीतून पुढे गेलेले विनोद तावडे, बोलतील एक आणि करतील भलतेच या हीन दीन वृत्तीचे नक्कीच नसावेत किंवा नाहीत त्यामुळे त्यांनी वर जे काय म्हटलंय, ते तसेच सध्या नक्की शिक्षण खात्यात घडते आहे, तावडे शिक्षण मंत्री म्हणून चांगले आहेत. राजेंद्र दर्डा यांच्यानंतर तावडे म्हणजे एखाद्या पीडितेवर बलात्कार करणारा नंतर त्या पीडितेला हळुवार चुचकारून सांभाळून पुढे तिच्याशी लग्न करून तिला समाजात मनाचे स्थान देणारा हा जो त्या दोघातला फरक असतो, येथेही या दोघांच्या बाबतीत नेमके असे, आधीच्या सरकारात शिक्षण खात्याची रांड केल्या गेली, तावडे 

तिला पुन्हा माणसात आणताहेत…छान…!! 

तावडे पुढे जे सांगताहेत ते तर अगदी जाहीर दाद द्यावी असे, तावडे म्हणाले, विद्यमान रात्रशाळांच्या स्थितीत सुधारणा करण्यासाठी शालेय शिक्षण विभाग प्रयत्नशील आहे, मी जातीने शिक्षणाचा दर्जा एकसारखा राहील त्यासाठी सतत प्रयत्न करतोय. महत्वाचे म्हणजे गेल्या १५ वर्षात त्यांच्या अनेक समस्यांचे अजिबात निराकरण करण्याचा साधा प्रयत्न देखील केल्या गेला नाही, ते काम तातडीने आम्ही हाती घेतले आहे. सर्वांना उत्तम आणि समान शिक्षण हे माझे नक्की ध्येय आहे, रात्रशाळा बंद पडणार नाहीत याची पुरेपूर काळजी आम्ही 

घेतो आहे. महत्वाचा मुद्दा असा कि शिक्षकांच्या भरतीमध्ये होत असलेल्या भ्रष्टाचारामुळे कुशल उत्तम कार्यक्षम शिक्षकांच्या नोकरीच्या संधी हुकतात, हा भ्रष्टाचार समूळ नष्ट व्हावा आणि शिक्षकांची भरती निव्वळ गुणवत्तेवर व्हावी, यासाठी केंद्रीय पद्धत आम्ही येथेही सुरु करतो आहे. देव करो, तावडेंच्या प्रयत्नांना यश मिळो..मुख्यमंत्री महोदय तेवढे ते औकाफ खात्याचे बघा अन्यथा काही दिवसानानंतर 

विनोद तावडे डोळ्यात सुरमा घालून मंत्रालयात दिसल्यास फारसे आश्चर्य वाटणार नाही…

तूर्त एवढेच.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *