राज आज काल : पत्रकार हेमंत जोशी

राज आज काल : पत्रकार हेमंत जोशी 


लोकसभा निवडणुका दरम्यान जेवढे विनोद राज ठाकरेंवर करण्यात आले मला वाटते तेवढे त्या राहुल गांधी यांच्यावर देखील केल्या गेले नसतील. पक्षाध्यक्षा सकट पक्ष भाड्याने देणारे या देशातले पहिले नेते राज ठाकरे म्हणाल तर हा विनोद म्हणाल तर टीका अधिक बोचरी होती पण राज ठाकरे यांनी त्याकडे कानाडोळा करून आपले काम सुरु ठेवले म्हणून राज हे एकमेव या राज्यातले युतीविरोधी गटातले एकमेव सुपर हिरो ठरले. सारेच त्यांच्यासमोर फिके ठरले, निष्प्रभ ठरले हीच वस्तुस्थिती आहे. स्वतःचा एकही उमेदवार उभा न करता दिन रात राज्य पिंजून काढणारे, डोळ्यात न मावणाऱ्या सभा घेणारे राज हे वेडे किंवा वेड्याचे नेते आहेत असे का वाटते आहे, जर तसे वाटत असेल तर वेडे तुम्ही आहात, राज यावेळी अतिशय धूर्त राजकीय खेळी खेळून गेले आहेत…

राज ठाकरे यांचा आजवरचा मनसे स्थापनेपासूनचा अनुभव असा कि बोटावर मोजता येतील निवडून येणारे असे संख्येने तुटपुंजे नगरसेवक, आमदार, खासदार कोणत्याही क्षणी मनसे सोडून म्हणजे पक्षांतर करून मोकळे झाल्याने वेळोवेळी मनसे आणि राज ठाकरे हिणविल्या गेले आहेत जे अतिशय जिव्हारी लागणारे असते, होते. राज किंवा त्यांच्या समर्थकांचा चेहरा बघण्यासारखा झालेला असतो. जे नेहमी घडले तेच या लोकसभेला जर राज यांनी उमेदवार उभे केले असते तर पुन्हा घडले असते म्हणजे नाही म्हणायला मनसेचे चार दोन खासदार नक्की निवडून आले असते पण पुन्हा तेच, नेहमीसारखे अपमानित होणे, ज्यांना खासदारांची गरज त्यांनी मनसे खासदार फोडून राज यांना खजील केले असते ज्याचा मोठा दुष्परिणाम येणाऱ्या विधान सभा निवडणुकीत दिसून आला असता…नेहमीप्रमाणे मग राज ठाकरे यांनी लोकप्रियता पुन्हा हासील करूनही त्यांना मोठे राजकीय नुकसान झाले असते, परिणाम पाच वर्षांसाठी भोगावे लागले असते. आता मात्र राज यांच्या लोकसभा निवडणुकीतील चतुर खेळीमुळे त्यांचे भविष्यातले होणारे नुकसान तर टाळणार आहेच पण मनसे विरोधी पक्षांना त्यांचे आमदार निवडून आणतांना मोठी कसरत करावी लागणार आहे. माझे वाक्य लक्षात ठेवा, पुढल्या विधानसभेला राष्ट्रवादी किंवा काँग्रेस आघाडीची या राज्यात पीछेहाट होईल पण राज फॅक्टर येत्या विधानसभा निवडणुकीनंतर फार महत्वाचा ठरणार आहे. पुन्हा तेच, राज यांच्याकडे उमेदवारी मागणाऱ्यांची मोठी रीघ रांग असेल आणि त्यांचे निवडून येणारे आमदार राज यांचे राजकीय भवितव्य पुन्हा एकदा उज्वल करून सोडतील. लोकसभेचे निकाल आल्यानंतर राज यांचे महत्व वाढलेले असेल. यापुढे राज यांना अमुक तमुक सोडून गेलेत असे फारसे घडणार नाही…


www.vikrantjoshi.com

आता अत्यंत महत्वाचे म्हणजे राज ठाकरे आणि कुटुंबियांचे आर्थिक गणिते. तुम्हाला काय वाटते, मोदी आणि शाह यांच्यावर लोकसभा निवडणुकांपूर्वी कायम तुटून पडणारे उद्धव ठाकरे आणि नितीन गडकरी असेच का शांत झालेत. अजिबात नाही. सीबीआय, गृह, आयकर खाते, ईडी इत्यादी शासकीय खाते वरकमाई मोठ्या प्रमाणात येणाऱ्यांना क्षणार्धात वठणीवर आणतात. मला थेट आरोप करायचे नाहीत पण माझी जी माहिती आहे, त्यानुसार केंद्रात भाजपा सरकार आल्यानंतर अमापसमाप उत्पन्न असलेल्यांना वरून भाजपाशी पंगा घेणाऱ्यांना कसे सरळ करायचे, हे यावेळी मस्त जमून आलेले आहे आणि हे असच सुरु राहिले तर राज ठाकरे आणि शरद पवार या दोघांनीही आर्थिक व्यवहार व्यवस्थित ठेवल्या जातील याची डोळ्यात तेल घालून काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे, राज यांची त्यावर अधिक काळजी यासाठी वाटते कि त्यांना एखादा बादरायण संबंध लावून अडकविल्या गेले तर…? 


ज्यापद्धतीने वर्षानुवर्षे या राज्यात शरद पवार विरोधकांना किंवा विरोधात जाणाऱ्यांना विविध क्लुप्त्या वापरून नाक घासायला लावायचे, सरळ करायचे, आधी मारायचे मग गोंजारायचे, उध्वस्त करायचे, घरी बसवायचे त्यापध्दतीची सुप्त दहशत यावेळी भाजपाच्या काही नेत्यांनी अमलात आणल्याने मी पहिल्यांदाच बघतोय. शरद पवार एवढे अस्वस्थ झालेले, अस्वस्थ होऊन इकडून तिकडे येरझार्या मारणारे, मानसिक दृष्ट्या काहीसे खचलेले, हिम्मत हरलेले मी पहिल्यांदाच बघतोय. ज्या महाराष्ट्रात किंवा ज्या देशात आम्ही हिंदू आहोत हे सांगायला देखील भीती वाटायची, जणू या देशात हिंदू हेच उपरे, असे वाटायला लागले होते ते भाजपा आणि मोदी सत्तेवर आल्याने शिवाय या राज्यात, या मुंबईत शिवसेना भाजपासंगे बसल्याने, आम्ही हिंदू बऱ्यापैकी मान वर करून सांगू लागलो आहोत कि होय, आम्ही हिंदू आहोत. म्हणून नरेंद्र मोदी यांच्यासारख्या बाजीगर नेत्यांना अभिमानाने हिंदू आहोत सांगणाऱ्यांनी शंभर गुन्हे माफ करायला हवेत. आणखी एक सांगतो, मोदी शाह यांची भलेही दहशत असेल पण देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी विरोधकांना आदरयुक्त दरारा आहे जो जनतेला अधिक भावतो, मनापासून आवडतो. बाळासाहेब ठाकरे यांचे वागणे हे असेच होते त्या देवेंद्र फडणवीसांसारखे. आदरयुक्त भीती आणि दराराही….

तूर्त एवढेच


पत्रकार हेमंत जोशी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *