स्फोटक ! धक्कादायक !! खतरनाक !!!—पत्रकार हेमंत जोशी

 स्फोटक ! धक्कादायक !! खतरनाक !!!—पत्रकार हेमंत जोशी 

जेव्हा बुडत्याचा पाय खोलात शिरतो तेव्हा बुडणार्याने अधिक रिस्क न घेता एका झटक्यात चार पावले मागे येऊन आपला जीव वाचवायचा असतो. एखाद्याला हे माहित आहे कि अमुक एका व्यक्तीसंगे जर संभोग केला तर एड्स होणारच आहे अशावेळी मोह आवरायचा असतो आणि अंगावर कपडे चढवून तेथून पळ काढायचा असतो. पाहून घेऊ बघून घेऊ बदल घेऊ अशी भाषा मग ते आदित्य ठाकरे असतील संजय राऊत असतील किंवा अन्य शिवसेनेतले कोणीही, हि भाषा त्यांना निदान या कठीण दिवसात शंभर टक्के परवडणारी नाही. बिहार पोलिसांना किंवा थेट ईडी सीबीआय ला सुरुवातीला मुंबई पोलिसांकडून किंवा थेट महाआघाडी सरकारमधून न मिळणारे न मिळालेले सहकार्य त्यातून या साऱ्यांचा मोठा रोष नजीकच्या भविष्यात मुंबई पोलीस, शिवसेना आणि महाआघाडी सरकारने ओढवून घेतला आहे हे उघड दिसते आहे आणि हे जे या सर्वांनी केले ते अत्यंत चुकीचे ठरले असे ज्याला त्याला वाटते आहे. काही पुरावे नष्ट करून महाराष्ट्र सरकारने विनाकारण संशयाचा धूर गडद केल्याचे जाणवते आहे… 

आता मला जी अत्यंत धक्कादायक धोकादायक माहिती मिळालेली आहे ती वाचून ऐकून तुमची पण नक्की फाटणार आहे. मला तर वाटते पुढे मी जे तुम्हाला सांगणार आहे ते वाचून जसे राजकारणात दोन प्रभावी गट एकमेकांवर आसूड ओढून एकमेकांना संपविण्यात मग्न असतात आता तेच शंभर टक्के बड्या अधिकाऱ्यांबाबत येथे या राज्यात घडते आहे घडायला लागले आहे. अधिकाऱ्यात आता जे दोन उघड गट पडले आहेत त्यातून त्यांचे आपापसात घनघोर युद्ध पेटण्याची माहितगारांना भीती वाटू लागलेली आहे. मिळालेली माहिती अशी कि आपल्या राज्यात एक अत्यंत प्रभावी खतरनाक धाडसी स्पष्टवक्ते अजिबात न घाबरणारे लढवय्ये असे निवृत्त ज्येष्ठ सनदी अधिकारी आहेत आणि मुंबईत सुशांत सिंग व दिशा सालियन प्रकरणाचा शोध घेतांना सीबीआयच्या अनेक पुरुष व महिला बड्या अधिकाऱ्यांना काही दिवस मुक्काम करायला लागल्यानंतर त्यांना कोणतेही म्हणजे राहण्यापासून तर अगदी जेवणापर्यंत असहकार्य करण्याचे जे महाआघाडी सरकारचे ठरल्याचे समजते त्यावर मार्ग काढण्यासाठी हे निवृत्त बेधडक सनदी अधिकारी आपले अवंती अंबर मधले शासकीय निवास्थान या सीबीआय अधिकाऱ्यांना राहण्यासाठी व स्वतःचे शासकीय वाहन देखील उपलब्ध करून देणार असल्याचे माझी पक्की माहिती आहे. म्हणून हेच सांगतोय राज्यातल्या बड्या आयएएस व आयपीएस अधिकाऱ्यांमध्ये दोन गट पडले आहेत हे तेवढेच खरे आहे. जो कोणी माझ्या निवासस्थानी राहणाऱ्या सीबीआय च्या अधिकाऱ्यांना मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न करेल मग तो अधिकारी असो कि पुढारी अशांना मी व्यक्तिगत पाहून घेईन असे थेट वक्तव्य या निवृत्त सनदी अधिकाऱ्याने केल्याचेही माझी पक्की माहिती आहे. बापरे! आता या राज्याचे काही खरे नाही… 

तूर्त एवढेच : हेमंत जोशी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *