टार्गेट ब्राम्हण १ : पत्रकार हेमंत जोशी

टार्गेट ब्राम्हण १ : पत्रकार हेमंत जोशी 

होय, विदर्भातले बहुतेक ब्राम्हण एकवटले एकत्र आले त्यांनी त्यांच्या अनेक पुढल्या पिढ्यांनी ५०-६० वर्षे संघ, जनसंघ, भाजपा साठी तन मन धन अर्पण केले आणि आजचे चित्र साकारले, अनेक मोदी त्यांनी या देशाला दिले, काँग्रेसला वठणीवर आणले, मी नक्कीच कोणत्याही विचारांचा नाही, कोणत्याही जाती विरोधात नाही पण ब्राम्हण असल्याचा मला नक्कीच अभिमान आहे आणि हे जाहीर सांगतांना आपण चुकतोय असे मला कधीही वाटले नाही, वाटत नाही, वाटणार नाही. दुसऱ्यांविषयी मनात असूया नाही, तशी ती कोणत्याही ब्राम्हणाच्या मनात नसते कारण ते कायम दुसऱ्याची रेषा पुसण्यापेक्षा आपली रेषा त्यापेक्षा अधिक मोठी काढण्यासाठी आयुष्य खर्ची घालून नेमके लक्ष्य पार करतात…


ज्या विदर्भातल्या ब्राम्हणांनी या जगाला संघ स्वयंसेवक दिले, भारतीय जनता पक्ष्यासारखे काँग्रेस समोर व्यासपीठ निर्माण करून त्यांना आव्हान देऊन प्रसंगी नो व्हेअर केले त्या ब्राम्हणांमधला अनेक वर्षानंतर किंवा इतिहासात पहिल्यांदा एक देशभक्त तरुण या राज्याचा मुख्यमंत्री होतो म्हणून पवारांसारख्या इतर नेत्यांच्या ढुंगणाला एवढ्या मिरच्या झोंबाव्यात, मला जे जमले नाही, देवेंद्र ते तू करून दाखवतो आहेस असे मन मोठे करून पवारांनी किंवा तत्सम नेत्यांनी आपल्या दिवंगत मित्राच्या मुलास जाऊन सांगावे, ते नाही, उलट समोरचा मुख्यमंत्री म्हणजे त्यांच्यासाठी जणू पाकिस्थानी या भावनेतून जे काय सतत वागणे सुरु आहे ते अतिशय हीन प्रवृत्तीचे प्रतीक आहे असे मला वाटते…


ब्राम्हण चुकले नाही असे माझे म्हणणे नाही पण इतर चुकले नाहीत आणि ब्राम्हण तेवढे चुकले हे जे सोशल मीडियावर सतत सांगणे सुरु असते ते अत्यंत लाजिरवाणे. थोडक्यात चुकले ते सारे ब्राम्हण होते असे जर इतरांचे सांगणे म्हणणे असेल तर प्रत्येकाने छातीवर हात ठेवून सांगावे हे खरे आहे का, माझा या राज्यात अतिप्रचंड जनसंपर्क आहे, राज्यभरातले विविध भागातले विविध विचारांचे विविध क्षेत्रातले माझ्या नरिमन पॉईंट येथील कार्यालयात नेहमी येतात, गप्पा मारतात आणि निघून जातात, त्यांच्या बोलण्यातून त्यांचे ब्राम्हण मित्र किंवा ब्राम्हण शिक्षक कसे चांगले होते त्यावर अनेक किस्से सांगतात पण हेच मित्र जेव्हा व्यासपीठावर येऊन अगदी उघड काहीही एक कारण नसतांना ब्राम्हणांना वाट्टेल त्या शिव्या घालून मोकळे होतात, वाईट वाटते, याला अपवाद रामदास आठवले, त्यांनी ब्राम्हणांना टार्गेट केल्याचे कधीही दिसले नाही, ऐकले नाही त्यांनी स्वतःची रेषा मोठी केली आणि ते नेता म्हणून खूप मोठे झाले. अलीकडे निवृत्त प्रशासकीय अधिकारी उत्तम खोब्रागडे यांचे ‘ संघर्षयात्री ‘ हे आत्मचरित्र वाचले त्यात त्यांनी त्यांच्या ताम्हण आडनावाच्या ब्राम्हण जातीतल्या शिक्षकाचा अतिशय आदराने उल्लेख केला किंबहुना मला प्रशासकीय अधिकारी होतांना त्यांचे मोलाचे मार्गदर्शन झाले आणि अनमोल सहाय्य्य मिळाले होते त्यांनी त्यात आवर्जून लिहिले आहे, असे असतांनाही खोब्रागडे किती भयंकर ब्राम्हण द्वेष्टे होते त्यावर अनेक किस्से माझ्या ते नोकरीत असतांना कानावर पडायचे, खरे खोटे देव जाणे. थोडक्यात वैक्तीतक आयुष्यात ब्राह्मणांचे गुणगान गायचे आणि व्यासपीठावर येऊन त्यांचे वाट्टेल तसे अपमान करायचे, हे असे का चालले आहे, सुरु आहे, समजण्यापलीकडे सारे आहे…


मनातले सांगू का, आम्हा ब्राह्मणांचे कामांध नवर्याच्या बायकोसारखे जगणे सुरु आहे ती जसा दररोज एक बलात्कार सहन करते तसे आमचे आहे, इतरांचे सतत जहरी टीका करणे आणि दररोज एक बलात्कार यात काहीही फरक नाही. मला येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बाजू घ्यायची नाही किंबहुना मी एकमेव पत्रकार असावा कि त्यांचे चुकलेले माझ्या कानावर पडले कि अक्षरश: मी त्यांच्याशी वाद घालून मोकळा होतो, तुम्हीही हे असे वागणार आहेत का, अमुक एखाद्या मुद्द्यावर त्यांच्याशी भांडून मोकळा होतो. पण ज्याच्या मनात या राज्याचे भले साधतांना अजिबात पाप नाही हे जो तो भेटल्यानंतर मला सांगतो तेच नेते व्यसपीठावर जेव्हा त्यांची चिरफाड करतात, सत्तेसाठी तसे वाट्टेल ते, बघून वाचून ऐकून पाहून मनाला वेदना होतात…


जाऊ द्या ब्राम्हणांवर पुढले लिहिण्याआधी एक चावट किस्सा ऐकवतो, अर्थात हा किस्सा केवळ वयस्कोके लिये… 

सरकारी कार्यालयात गेलो होतो, 

साहेबांना शर्टची बटणे काढून 

छातीवरले पांढरे झालेले केस 

दाखविले, त्यांनी लगेच मला ज्येष्ठ 

नागरिक असल्याचे प्रमाणपत्र दिले. 

नवरा म्हणाला…

तुम्ही पक्के अर्धवट, बावळट 

आणि मूर्खही…

फक्त शर्टची तेवढी बटणे 

काढलीत, 

नाहीतर ‘अपंग ‘ असल्याचेही 

प्रमाणपत्र साहेबांनी, 

अगदी सहज, हसत हसत 

तुम्हाला दिले असते..

बायको फणकाऱ्याने म्हणाली..!! 

क्रमश:


पत्रकार हेमंत जोशी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *