कासावीस आणि फडणवीस : पत्रकार हेमंत जोशी


कासावीस आणि फडणवीस : पत्रकार हेमंत जोशी 

हिंदूंविषयी हिंदुत्वाविषयी एवढी प्रचंड नफरत मग खासदार पत्रकार कुमार केतकर थेट मुस्लिम धर्म का स्वीकारत नाहीत, एकदाचे व्हा पाकधार्जिणे मुसलमान आणि द्या हव्या तेवढ्या शिव्या सहिष्णू हिंदूंना. तिकडे अमोल पालेकरांचेही तेच, माझ्या मित्रांनी त्यांना लागोपाठ चार वेळा मेसेजेस केले,त्यात म्हटले कि तुम्ही मोदींनाच मतदान करा. चौथ्या मेसेज नंतर ते मित्रांना म्हणाले, तुम्ही कोण सांगणारे मोदींना मतदान करा म्हणून, मग मित्रांनी देखील त्यांना तात्काळ रिप्लाय दिला, मग तुम्ही कोण सांगणारे, मोदींना मतदान करू नका ते, तेव्हा कुठे पालेकरांनी बोलती बंद झाली…



पूर्वी आमच्या गावातली पाटलांची मुले सुट्ट्या लागल्या रे लागल्या कि मामाच्या गावाला पळायचे आजकाल ते भाजपामध्ये जातात वरून त्यांचे मायबाप देखील त्यांना मामाच्या गावऐवजी भाजपात जाण्याचा आग्रह करतात, क्या जमाना बदल गया ? अलीकडे खूप दिवसांनी प्रेयसीचा फोन आला, म्हणाली, आज भेट ना रे, मी विचारले, कुठे भेटूया त्यावर ती पटकन म्हणाली जेथे कोणीही नसेल, एकांत मिळेल. मी म्हणालो मग टिळक भवनात भेटूया कि, तिने लगेच होकार दिला. मित्रांनो, पूर्वी निळू फुलेंना पाहिल्यावर बायका पदर सावरायच्या तसे आज फडणवीसांना बघितले रे बघितले कि पवार, चव्हाण त्यांच्या पक्षातल्या नेत्यांना म्हणतात, चला, पटकन आत या बघू, तिकडे कोण आहे रे, जरा, दरवाजा बंद करून घ्या…


www.vikrantjoshi.com


अलिकडल्या पाच वर्षात जे अपेक्षित नव्हते ते या राज्यात घडले आहे सतत घडते आहे, आज घडले, उद्याही घडेल. ज्या पाटलांच्या घराण्यांनी कधीही काँग्रेस किंवा काँग्रेसच्या मुशीतून बाहेर पडलेल्या राजकीय पक्षांकडे पाठ फिरविली नाही ती या राज्यातली काँग्रेसची काँग्रेस विचारांची प्रतिष्ठित व प्रभावी घराणी चक्क भाजपामध्ये येते आहे. अनेक राजकीय विचारवंत त्यावर विविध कारणमीमांसा सांगून मोकळे होतील पण त्याची येथे फारशी गरज नाही, शिवाजी महाराजांचे अति अति कट्टर फॉलोअर्स असलेले या राज्यातले झाडून सारे मराठे एकतर त्यांना सतत देश विकणार्या काँग्रेस विचारांच्या नेत्यांची अति घृणा आलेली आहे, हाती येईल ते खाणे देशाकडे पाठ करणे असे नेते त्यांना नकोसे झाले आहेत आणि कट्टर हिंदुत्व त्यांच्या रक्तात असलयाने हिंदूंशिवाय इतर मंडळींचे विशेषतः पाकविचार असलेले जे जे मुसलमान या देशात आहेत त्यांचे सतत लांगुलचालन करणारी नेतेमंडळी नकोशी वाटू लागल्याने राज्यातल्या मराठ्यांना रा. स्व. संघ आणि भाजपा विचार अधिक आवडू लागले आहेत, या राज्यातल्या मराठ्यांनी फार मोठ्या प्रमाणावर काँग्रेस विचारांकडे पाठ करणे हे या देशासाठी या राज्यासाठी विशेषतः सेना भाजपा युतीसाठी फार मोठे शुभलक्षण आहे. युतीला त्यामुळेच मोठा फायदा होतो आहे, फायदा होत राहील. म्हणून या लोकसभा निवडणुकीदरम्यान फडणवीस खुश आहेत आणि विरोधक कासावीस आहेत. बेंबीच्या देठापासून शरद पवारांसारखे नेते बामणांच्या नेतृत्वाकडे पाठ फिरवा आणि मला येऊन बिलगा, सांगून देखील उपयोग होत नाही म्हणून पवार किंवा त्यांच्या विचारांचे नेते परेशान आहेत, हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व मनापासून पसंत असलेले आणि शिवराय हेच दैवत मानणारे या राज्यातल्या कानाकोपऱ्यातले राजकारणातले परंपरागत मराठ्यांची घराणे काँग्रेस विचारांना सोडून जाणे म्हणजे हे राज्य प्रगत जगाच्या जवळ जाण्यासारखे आहे…


अशोक चव्हाण मुख्यमंत्री असतानाचा हा प्रसंग. एका मुलाने मंत्रालयासमोरच आपली सायकल पार्क केली, तो पायी फिरायला जाणार तेवढ्यात तेथे ऑनड्युटी असलेला हवालदार त्याला म्हणाला, बेटा येथे सायकल पार्क करू नको कारण येथून अनेक मंत्री जातात, मुख्यमंत्री, आमदार खासदार, नेते, बडे अधिकारी असे कितीतरी येथून दिवसभर ये जा करतात त्यावर क्षणभर देखील विचार न करता तो मुलगा चेहऱ्यावर निरागस भाव आणत म्हणाला, काका काळजी करू नका, मी सायकल लॉक करून जातो आहे…

तूर्त एवढेच :


पत्रकार हेमंत जोशी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *