काका पुतणे : पत्रकार हेमंत जोशी


काका पुतणे : पत्रकार हेमंत जोशी 

अनेकदा असे राजकारणात घडते म्हणजे अमुक एखाद्या मोठ्या नेत्याच्या घरी त्या नेत्याने पैदा केलेले पोर त्या नेत्याच्या एकदम स्वभावाविरुद्ध असते पण पुतण्या मात्र पावलावर पाऊल ठेऊन असतो जसे नम्बर एक चे उदाहरण दिवंगत बाळासाहेब आणि राज ठाकरे अर्थात बाळासाहेबांचं हे मुख्यमंत्री पोर बापापेक्षा अनेक बाबतीत वरचढ निघालं तो भाग वेगळा पण आपण सारे राज मधेच सुरुवातीपासून बाळासाहेब बघत आलोय, संजय राऊत यांनी कधी कोणाचे ऐकले आहे काय, त्यांना अनेकांनी

सांगितले होते कि ठाकरे सिनेमात त्या मुसलमानाऐवजी राज ठाकरे यांना संधी द्या म्हणजे एका दगडात दोन पक्षी मारल्या जातील एकतर सिनेमा हिट होईल आणि सिनेमा सृष्टीला नवा हिरो मिळेल, इकडे तुमच्यातला एक स्पर्धक कमी होईल पण त्यांनी ऐकले नाही आणि स्वतःचे व सिनेमाचे मातेरे करून घेतले. तिकडे बीड मध्ये तसेच, जयदत्त क्षीरसागर यांचा पुतण्या संदीप त्यांचा बाप निघाला, त्यांनाच पराभूत करून आमदार झाला, राजकारण करण्याची त्याची पद्धत हुबेहूब जयदत्त क्षीरसागर त्यांच्यासारखीच म्हणजे विरोधकांना चारी मुंड्या चित करणारी, जयदत्त यांची मुले मात्र संदीप यांच्या पासंगालाही पुरात नाहीत असे ऐकले आहे…

जसे नागपूर म्हटले कि हिवाळी अधिवेशनात जाणाऱ्या अनेकांना गंगा जमना परिसर आठवतो, जळगाव म्हटले कि माहिजी आपोआप आंबट शौकिनांच्या तोंडावर नाव येते, औरंगाबादवरुन निघालेले जसे अनेक नेते पुण्याला येतांना वाटेत चौफुल्याला थांबतात, बुलढाणा जिल्ह्यात जाणारे बाबांच्या दर्शनाला शेगावी थांबतात, इंदोरला जाणारे जसे पोह्यांवर ताव मारून येतात तसे बीड जिल्ह्याचे शहराचे नाव निघाले आणि मुंडे आडनाव तोंडावर आले नाही असे नक्की होत नाही, आधी बीड जिल्हा काका दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनी गाजवून सोडला ते गेल्यानंतर त्यांची जागा पुन्हा तेच त्यांच्या मुलींना घेता आली नाही कारण बाबा गेल्यानंतर पंकजा यांच्याकडे सत्ता आली पण त्यांना सत्ता कशी उपभोगून ती ज्या पद्धतीने कायम सतत टिकवायची असते ते जमले नाही मात्र काकांच्या पावलावर पाऊल नेमके धनंजय मुंडे यांनी ठेवले. जेव्हा काका गेले तेव्हा धनंजय मुंडे यांच्या बाबतीत राजकीय वातावरण पूर्णतः त्यांच्या विरोधात होते पण धनंजय हे हुबेहूब गोपीनाथ यांच्या पावलावर पाऊल ठेवणारे असल्याने ना ते खचले ना ते कधी हिम्मत हरले. गोपीनाथजी गेल्यानंतर नेमकी सत्ता त्यांच्या मुलीकडे मुलींकडे चालून आली, मतदारांची, स्थानिक लोकांची सिम्पथी देखील मुलींना मिळाली त्याचवेळी टीकेचे रागाचे  क्षोभाचे लक्ष्य फक्त आणि फक्त धनंजय मुंडे हे एकमेव होते…


www.vikrantjoshi.com

जसे मी अतिशय सूक्ष्म निरीक्षण बाळासाहेब आणि उद्धव यांचे केले आहे ते तसेच निरीक्षण कायम काका गोपीनाथ आणि धनंजय यांचेही करीत आलो आहे विशेष म्हणजे जसे काका गोपीनाथ हे माझे सेंटर ऑफ अट्रॅक्शन होते तेच माझे अगदी सुरुवातीपासून म्हणजे जेव्हा धनंजय अगदीच तरुण असतांना मंत्रालयात काकांचे बोट धरून चालायचे तेव्हापासूनच ते देखील माझे सेंटर ऑफ अट्रॅक्शन ठरले आहेत, मुलाचे पाय पाळण्यात त्यापद्धतीने अगदी सुरुवातीपासून भाजपामध्ये कधीही गोपीनाथ यांची राजकीय वारसदार म्हणून पंकजा यांच्याकडे बघितले गेले नाही, ती जागा अगदी तरुण वयात त्यांच्या खानदानात फक्त आणि फक्त धनंजय यांनीच घेतलेली आहे त्यामुळे जेव्हा केव्हा भाजप मध्ये एखाद्या संजय राऊत सारख्या गोपीनाथ भक्तांना त्यांच्यावर सिनेमा काढण्याची हुक्की लहर येईल त्याने मागला  पुढला कोणताही विचार न करता ती भूमिका फक्त आणि फक्त धनंजय मुंडे यांना द्यावी जर तो सिनेमा राज्यात हिट झाला नाही तर मला हेमंत जोशी म्हणू नका बावळट म्हणा बेअक्कल म्हणा राजदीप सरदेसाई म्हणा काहीही म्हणा शिव्या घाला. माझे म्हणणे खोटे वाटत असेल तर एक दिवस संपूर्ण तुम्ही त्या धनंजय यांच्या समवेत घाला, तुमच्या क्षणोक्षणी पदोपदी ते लक्षात येईल कि आपण सतत त्यांच्यात

हुबेहूब गोपीनाथ अनुभवतो आहे, अत्यंत महत्वाचे म्हणजे जसे या राज्याचे यशस्वी नेतृत्व अखेरच्या श्वासा पर्यंत दिवंगत गोपीनाथजी यांनी केले तेच धनंजय यांच्याबाबतीत होणार आहे फक्त त्यांनी कधीही जसे गाढवाच्या मागून जायचे नसते तसे त्यांच्या एका महान नेत्याच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करू नये.

क्रमश: हेमंत जोशी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *