हिंदुत्व खतरेमें : पत्रकार हेमंत जोशी

हिंदुत्व खतरेमें : पत्रकार हेमंत जोशी 

मेल पाठवणारे कोठून तरी अनेकदा तुमच्या आमच्या विषयी काहीतरी चुकीची माहिती जमा करतात आणि दिवसभरात नको नको ते मेल पाठवत बसतात. मध्यंतरी म्हणे मासिक पाळी पूर्वी होणाऱ्या पोटदुखीवरच्या गोळ्यांविषयीची माहिती देणारे जाहिरात करणारे मेल सतत त्या जयंत पाटलांना यायचे किंवा आजही म्हणे दादा भुसे यांना तशी अजिबात आवश्यकता नसतांना खोयी हुयी जवानीकी ताकद का इलाज असे सांगून कोणत्यातरी तेलाची जाहिरात पाठविण्यात येते. उद्या, तुमच्या बाळंतपणासाठी आमची विमा पॉलिसी काढा असेही मेल एखाद्या अविवाहित संघ प्रचारकाला पाठविलेले जातील किंवा मुल्ला मौलवीला आमच्याकडून रामायणाच्या ग्रंथावर खास सवलत पद्धतीचे मेल पाठविले जातील. बहुतेक ९९ टक्के आलेले मेल किंवा फोन्स तद्दन फसवे असतात विशेष म्हणजे कितीतरी मराठी अनेकदा कित्येकदा फसविले गंडविले जातात. असे समजायचे कि कोरोनाचे हे घरात काढल्या जाणारे दिवस मनन चिंतन करण्यास भाग पाडणारे आहेत. या दिवसात ज्यांनी काम क्रोध लोभ चिंता खर्चिक वृत्ती निद्रा भय स्वभाव व्यसने दुस्वास लावालाव्या लबाडी फसवाफसवी भ्रष्ट वृत्ती इत्यादी मोजक्या दुर्गुणांवर मात केली तोच या आधुनिक जगातला अर्जुन म्हणावा आणि तीच आधुनिक झाशीची राणी ठरावी. साक्षात मृत्यू किंवा तत्सम संकट दारात उभे असतांना देखील आपल्यातले हे तमो गूण तमाम अवगुण शारीरिक दोष शरीराबाहेर उत्सर्जित केल्या गेले नसतील बाहेर काढल्या फेकल्या जात नसतील तर अशांची तुलना आधुनिक राक्षसांशीच केल्या जावी…

गम्मत बघा माझ्या आजवरच्या अतिशय आवडत्या मुख्यमंत्र्यांमध्ये असलेले देवेंद्र फडणवीस यांची मी जेव्हा केव्हा उघड ठाम बाजू घेतो जगातले माझे लाखो वाचक मी भाजपाचा कसा टीका करून मोकळे होतात पण जेव्हा केव्हा फडणवीस यांच्या बरोबरीन माझ्या आणखी एका आवडत्या आदर्श भन्नाट माजी मुख्यमंत्र्यांची बाजू घेतो तेव्हा मात्र एकही वाचक मला काँग्रेसधार्जिणा कसा, ठरवून मोकळा होत नाही आणि वास्तव असे कि मी आजतागायत कधीही भाजपाचे काम केले नाही किंवा भाजपाचा मी कधी साधा कार्यकर्ता देखील नव्हतो पण याच काँग्रेसच्या विद्यार्थी सेलचा म्हणजे एनएसयूआय या विद्यार्थी संघटनेचा जळगाव जिल्ह्याचा सतत पाच वर्षे मी अध्यक्ष होतो किंबहुना मी अध्यक्ष होण्यापूर्वी ज्या जळगाव जिल्ह्याला काँग्रेसची फार मोठी ऐतिहासिक परंपरा आहे त्या जिल्ह्यात एनएसयूआय कशाशी खातात हे देखील माहित नव्हते पण बाहेरच्या जिल्ह्यातून मी ब्राम्हण तरुण या जळगाव जिल्ह्यात आलो आणि बड्या नेत्यांच्या नाकावर टिच्चून विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष झालो, पुढे राजकीय पत्रकारितेत रमल्याने राजकारणात न उतरण्याचे ठरविले तो भाग वेगळा. येथे काँग्रेस आणि पृथ्वीराज चव्हाण हे विषय यासाठी कि अलीकडे चव्हाण म्हणालेत कि मंदिरात जमा असलेले सोने सरकार दरबारी जमा करून कोरोनामुळे  बिघडलेल्या आर्थिक स्थितीवर प्रभुत्व मिळवा. आणि त्यातून चव्हाण यांना टीकेला सामोरे जावे लागते आहे…

देशातल्या अनिरुद्ध बापूंसारख्या लबाड बुवांकडे किंवा विविध देवस्थानांकडे जे सोने नाणे जमा करण्यात आलेले आहे ते सरकारने जप्त करून त्याचा उपयोग कोरोनामुळे उद्भवणाऱ्या उद्भवलेल्या आर्थिक संकटावर मात करण्यास चव्हाण म्हणतात नक्की करण्यात यावा, चव्हाण हे कधीही बेजाबदारीने वक्तव्य करणारे नेते नाहीत, त्यांचे सांगणे शंभर टक्के योग्य आहे पण त्याचवेळी मुल्ला मस्जिद किंवा देशातले पाद्री आणि चर्च यांच्याही कडे जी अमाप संपत्ती विनाकारण सडते आहे किंबहुना आपल्या या हिंदुस्थानात यांच्याकडे बाहेरून किंवा देशातून येणाऱ्या या अफाट संपत्तीचा विशेषतः धर्मांतर करण्यात हिंदूंना बाटविण्यात किंवा लव्ह जिहाद सारखे देशद्रोही प्रकल्प राबविण्यात जो खर्च केल्या जाऊन देशातले हिंदू संकटात सापडतात,

चर्च आणि मस्जिद मधले असे पैसे देखील शासनाने सरकारने त्वरेने तडफेने जप्त करून त्या पैशांचा योग्य विनियोग या आर्थिक संकटात करून घेणे तेवढेच गरजेचे आहे. फार दूर नाही तुम्ही मुंबईकर कधीतरी त्या माटुंग्याच्या डॉन बास्को शाळेची आणि तेथल्या मिश्नर्यांची जरा माहिती तर काढा तुमच्या ते सहज लक्षात येईल कि या अशा मिशनऱ्यांच्या शाळांमधून बाहेरून येणाऱ्या पैशांचे पुढे नेमके काय केले जाते. ना मोदींचे तिकडे लक्ष आहे ना उद्धव ठाकरे किंवा मोहन भागवत यांच्यासारख्या हिंदू मासिहांचे. इस्लाम कसला खतरे में, कोरोना असो कि धर्मांतर खरे तर हिंदूच हिंदुस्थानात खतरेमे आहेत तिकडे सर्वांनी लक्ष द्यावे घालावे…

तूर्त एवढेच : हेमंत जोशी. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *