गजब सेना अजब सरकार : पत्रकार हेमंत जोशी

गजब सेना अजब सरकार : पत्रकार हेमंत जोशी 

एखाद्या गावात देखणी स्त्री आणि तिच्या सुस्वरूप उफाड्या दोन तरुण मुली असतात, अशी स्त्री अचानक एकाकी विधवा झाल्यानंतर गावातल्या टवाळ मंडळींच्या नजरेने भीतीने तिच्यावर जी आपबिती कोसळलेली असते संकट ओढवते, राज्यातल्या तमाम मराठी मंडळींची अवस्था त्या विधवेपेक्षा फारशी वेगळी नाही नवऱ्यासारखे संरक्षण करणाऱ्या शिवसेनेला जर अब्दुल सत्तार आता नेते म्हणून हवे असतील, दिवाकर रावते ऐवजी अस्लम शेख यांचा पहिला फोन प्रिन्स ऑफ मातोश्रींना महत्वाचा वाटत असेल, महागड्या मोटार गाडीत शेजारी झिशान सिद्दीकी बसून महाआघाडी नेमकी कशी असली पाहिजे त्यावर सविस्तर बोलत असेल, अबू आझमी शिवसेनेची बाजू कधी सभागृहात तर कधी विविध वाहिन्यांवरून सांभाळतांना दिसत असेल, हसन मुश्रीफ आणि नवाब मलिक उद्धवजींच्या मंत्रीमंडळातले दोन प्रमुख सल्लागार मंत्री म्हणून आघाडीवर असतील, अनेक पाक विचारांचे देशद्रोही मुसलमान ज्या मुंब्य्रात वास्तव्याला आहेत अशा मुसलमानांची बाजू घेणारे त्यांचे नेतृत्व करणारे स्थानिक आमदार जितेंद्र आव्हाड तुमच्या मंत्रिमंडळात उद्धवजी महत्वाची खाती सांभाळत असतील, ज्या शरद पवारांकडे राज्याने अनेकदा दाऊदचे तारणहार म्हणून बघितले आहे त्या पवारांशिवाय तुमचे पानही  हलत नसेल किंवा थेट बांद्र्यात देखील तुम्हाला आशिष शेलार यांच्या ऐवजी बाबा सिद्दीकी जवळचा घरातला वाटत असेल आणि असे कितीतरी प्रसंग, या दिवसात प्रत्येक कित्येक बहुतेक मराठी मनांची अवस्था कशी हो असेल तुम्हीच विचार करून सांगा… 

उद्धव ठाकरे नेमके कोण असावेत म्हणजे शिवसेना प्रमुख कि मुख्यमंत्री या राज्याचे कि एकाचवेळी दोन्हीही. मला खात्री आहे जो तो म्हणेल सांगेल कि प्रत्येकाला उद्धवजी हे शिवसेना प्रमुख म्हणूनच हवे आहेत मान्य आहेत त्यांचे जुन्या सिनेमातल्या जगदीश राज सारखे आहे म्हणजे अनिता राज या अभिनेत्रींचे वडील जगदीश राज बहुतेक हिंदी सिनेमातून पोलीस अधिकाऱ्याची भूमिका वाढवायचे एखादी दुसरी भूमिका कधी त्यांच्या वाटेला आली तर दर्शक त्यांना त्या वेगळ्या भूमिकेत बघून नाक मुरडायचे. उद्धवजी हे मराठी माणसाचे जगदीश राज म्हणजे ते शिवसेना प्रमुख म्हणूनच शोभून दिसतात आणि उठावदार भूमिका निभावून बजावून मोकळेही होतात. सिनेमातली हेलन नाचवायची असते स्वतः हेलन होऊन नाचायचे नसते. ते एक अतिशय उत्तम संघटक अत्योत्तम शिवसेना प्रमुख पण कोणत्या क्षणी आमच्या या नेत्याला दुर्बुद्धी सुचली आणि त्याचा जणू पिंजरा सिनेमातला मास्तर झाला. अगदी ठरवून कोणा दुष्टाने नक्की डाव साधला आणि उद्धवजी तुम्हीच आता मुख्यमंत्री व्हायला हवे हे त्यांच्या मनावर पद्धतशीर बिंबवून त्यांना मातोश्री बाहेर काढले जणू मुख्य नर्तकाला कोरस मध्ये नाचायला सांगावे तसे कोणीतरी ठरवून या उत्तम राजाला प्रधान हो सांगितले आणि हेही महाराज यावेळी पद्धतशीर सापळ्यात अडकले, काय तर स्वतः मुख्यमंत्री झाले आणि सेनेच्या प्रमुख वारसदाराला देखील वरून मंत्री केले. स्वतः राजाच प्रधान होतोय म्हटल्यावर सेनेतले उत्सुक प्रधान आधी हिरमुसले नंतर आपल्या नेत्याचे केव्हा एकदा वाटोळे होते याची प्रथमच हे उत्सुक डोळ्यात तेल घालून वाट बघायला लागले हि वस्तुस्थिती आहे मित्रांनो…. 

तब्बेतीने शरीरयष्ठीने उद्धवजी तसे बऱ्यापैकी किरकोळ पण त्यांच्यातला शिवसेना नेता जागा झाला कि एरवी हेच उद्धव ठाकरे किती व कसे आक्रमक अनेकांनी आणि आम्ही अगदी जवळून केवळ एक पत्रकार  म्हणून बघितले आहेत. उद्धव म्हणजे दुर्लक्ष करण्याचा विषय असे जेव्हा वृद्धत्वाकडे झुकलेल्या बाळासाहेबांच्या अगदी जवळ असलेल्या स्मिता ठाकरे जयंत जाधव मुकेश पटेल किंवा सेनेतले तत्सम नेते, ज्यांना हे उद्धव बाबतीत  किरकोळ प्रकरण वाटायचे, एक दिवस याच उद्धव यांनी बंधू राज यांच्या मदतीने सहकार्याने बाळासाहेबांपासून अनेकांना बहुतेकांना अगदी सिनियर नेत्यांनाही खूप दूर पार कोपच्यात नेऊन ठेवले आणि काहीशी मरगळ आलेल्या शिवसेनेला मग त्यांनीच अटकेपार नेले जणू सेनेचे पराक्रमी पुरुष या नात्याने राज यांच्या संगतीने त्यांनी हे राज्य आणि राज्यातली शिवसेना दोन्ही पुन्हा एकवार दणाणून सोडले गाजवून सोडले, ज्याची दाखल राज्याला नव्हे तर देशाला देखील घ्यावी लागली. उद्धव यांना राज यांची ताकद आणि महत्व नेमके माहित आहे म्हणून आज या बिकट प्रसंगी दोन पावले मागे येऊन, चला पुन्हा संगतीने शिवसेना वाचवू या वाढवू या, हे असेच जणू राज ठाकरे यांना त्यांनी अप्रत्यक्ष सुचविलेले आहे. वाईट नाही, राज आणि उद्धवजी तसेच अमित आणि तेजस हे कॉम्बिनेशन. वास्तविक राज तू उर्वरित महाराष्ट्रातली शिवसेना सांभाळ मी मुंबईत बसून येथली सेना, महापालिका आणि शिवसेनेचे प्रशासन सांभाळतो हे त्याचवेळी काहीसे मन मोठे करून उद्धवजींनी बाळासाहेबांच्या हे नेमके मनातले राज यांना सुचवायला हवे होते किंबहुना वाटचाल त्याच मार्गाने सुरु होती पण उद्धव यांचे तेथे नाही म्हणायला काहीसे चुकले आणि आजचे हे नको ते झेंगट आणि संकट त्यांनी ओढवून घेतले… 

तूर्त एवढेच : हेमंत जोशी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *