सेनेतले बंड : पत्रकार हेमंत जोशी

एकनाथ शिंदे तेवढे चांगले, इतर मंत्री ना कामाचे ना धामाचे, इतर सर्वांना म्हणजे दिवाकर रावते, सुभाष देसाई, रामदास कदम, डॉ. दीपक सावंत, संजय राठोड, दादाजी भुसे, विजय शिवतारे, दीपक केसरकर, रवींद्र वायकर, गुलाबराव पाटील, अर्जुन खोतकर या साऱ्याच्या साऱ्या मंत्र्यांची हकालपट्टी करून आमच्यातल्या कोणालाही मंत्रिमंडळात स्थान द्या, अशी काहीशी चुकीची, बरीचशी रास्त मागणी शिवसेनेच्या ५-१० नव्हेत तर तब्बल ६० आमदारांनी एकजूट करून हि मागणी केली आहे. दहा पाच आमदारांनी लायक नसलेल्या मंत्र्यांना, राज्यमंत्र्यांना काढून टाका, अशी मागणी केली असती तर शिवसेनेतून, मातोश्रीवरून जो आरोप केला जातोय कि हि मुख्यमंत्र्यांची फूस आहे, त्यात तथ्य वाटले असते पण एकाचवेळी साठ तेही विधानसभा सदस्य एकत्र येऊन शिंदे सोडून इतर मंत्र्यांची हकालपट्टी करा, सांगतात तेव्हा हे प्रकरण तेवढे सोपे नाही. एक मात्र नक्की त्यांनी शिंदे सोडून, हे जे वाक्य पेरले आहे, त्यावर उद्धव यांनी नेमकी माहिती घेणे आवश्यक आहे त्याचवेळी सध्या आमदार प्रताप सरनाईक भाजपाच्या वाटेवर, हि जी बातमी वावटळीसारखी 

जोरात फिरते आहे, त्या बातमी मध्ये कितपत तथ्य आहे कि एकनाथ शिंदे यांच्या गटातून तशी बातमी पसरविल्या जातेय, हेही उद्धव यांनी जाणून घेण्याची आवश्यकता आहे. अर्थात मी बापडा उद्धव यांना उपदेशाचे डोस पाजणारा कोण? आम्ही उद्धव यांना उपदेश करणे म्हणजे संजय राऊत यांनी आचार्य अत्रेंच्या लिखाणातील चुका काढण्यासारखे किंवा राजे अंबरीश या राज्यमंत्र्याने मी शरद पवारांपेक्षा राज्यात लोकप्रिय आहे, सांगण्यासारखे किंवा दीपक सावंत यांच्या कार्यालयात आचार्य नामें औषध व्यवसायिकाने ढवळाढवळ बंदकरण्यासारखे. अफवा पसरत असतात, बातम्या कानावर येत असतात, मातोश्रीप्रमुख मिलिंद नार्वेकर भाजपाच्या वाटेवर अशी बातमी 

अलीकडे खुद्द भाजपा कार्यालयातून माझ्या कानावर टाकण्यात आली. उद्या तशी वेळच आली तर उद्धव ठाकरे अबू आझमी यांच्या पक्षात शिवसेना विलीनीकरण करण्याची दात शक्यता, अशी बातमी, अफवा देखील पसरावयाला विरोधक कमी करणार नाहीत….

श्रीमान उद्धव ठाकरे यांच्यावर दबाव टाकून फेल्युअर ठरलेल्या विधान परिषद सदस्यांना घरचा रास्ता दाखवून जे थेट लोकांमधून निवडून येतात, त्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात यावे, विधानसभा सदस्यांनी योग्य वेळी केलेली हि मागणी, आता नाही तर उरलेल्या जेमतेम अडीच वर्षात पुन्हा नाही, हे या ६० आमदारांच्या अतिशय योग्य क्षणी लक्षात आले आहे, असे वाटते. आता जमल्यास मी वर्षभरापूर्वी लिहिलेला लेख आठवा, जे मी त्या वेळी सांगितले होते, ते मातोश्रीने सिरियसली घेतले असते तर आजची हि गंभीर परिस्थिती त्यांच्यावर ओढवली नसती. मी हेच म्हणालो होतो, जे शिवसेनेतले वरिष्ठ नेते आहेत त्या रामदास कदम यांच्यासारख्या नेत्यांना मातोश्रीकडून भरपूर मिळालेले आहे अपवाद दिवाकर रावते यांचा कारण सत्तेत नसतांना आणि मातोश्रीच्या खिशातून कवडीही निघत नसतांना दिवाकर रावते यांनी भर उन्हाळ्यात मराठवाडा आणि विदर्भात पायपीट करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी अख्खे शरीर झिजविले आहे, थोडक्यात शिवसेनेतले प्रमुख नेते या नात्याने विदर्भ आणि मराठवाड्यात शिवसेना त्या भाजपाच्या झंझावातासमोर जिवंत ठेवण्याचे काम केले आहे ते फक्त आणि फक्त दिवाकर रावते यांनी. महत्वाचे म्हणजे कोणी काही देईल तर मंत्री म्हणून समोरच्या माणसाचे मग तो शिवसेना नेता जरी असला तरच काम करायचे असे ‘ कदम कदम ‘ पर घाणेरडे कुजके सडके विचार रावते यांच्या डोक्यात ना कधी आले ना कधी येतील, अपेक्षाविरहित या मंत्र्यांचे आपण मंत्रिपद काढून घेऊन वाटोळे करू नये असा अनाहूत सल्ला देखील त्यावेळी आम्ही दिला होता….

वाईट वाटून घेण्याचे कारण नाही पण अगदी सहज शक्य असतांना निवडणूक मग ती कोणतीही, कितीही महत्वाची असो, जे शरद पवार 

करतात किंवा भाजपामध्ये देखील जे घडते ते मातोश्रीवरून कधीही घडत नाही म्हणजे निवडणूक लढविण्याची आर्थिक ऐपत नाही का मग हे घेऊन जा, असा निरोप आजतागायत मातोश्रीवरून कधीही कोणालाही गेलेला नाही, म्हणणारे गमतीने म्हणतातही कि मातोश्रीवर इनकमिंग तेवढे माहित आहे, खरे खोटे मातोश्री आणि देव जाणो. अत्यंत महत्वाचा मुद्दा असा कि केवळ पायपीट करून आणि मतदारांची मने जिंकून डॉ. सुजित मिणचेकर यांच्यासारख्या आर्थिकदृष्टया कित्येक कफल्लक आमदारांनी लागोपाठ दोन दोन तीन तीन टर्म आर्थिकदृष्ट्या अतिशय बलाढ्य उमेदवारांना पराभूत करून निवडणुका जिंकल्या आहेत. आता सत्तेत आल्यानंतरही जर या सतत सत्तेपासून दूर असणाऱ्या आमदारांना मंडळे किंवा मंत्रिपद मिळणार नसतील तर कामे खेचून कशी आणायची या चिंतेत सदैव असणाऱ्या आमदारांना बंड करणे किंवा विधान परिषद सदस्यांना मंत्री मंडळातून हाकलून लावा, त्यांनी केलेली हि मागणी अतिशय रास्त आहे, फारच थोडे असे आमदार आहेत कि जे कालपर्यंत त्या रवींद्र वायकर यांच्यासारखे चाळीत राहायचे आणि आज महालात थेट पोहोचले आहेत, इतरांना पुढल्या निवडणुकीचे आर्थिक गणित जमत नाही, आमदार सेनेचा म्हणून भाजपाकडून कामेही होत नाहीत, आणि हाती सत्ता नसल्याने विकासाच्या कामातही मागे, थेट लोकांमधून निवडून येणाऱ्या सेनेच्या आमदारांची संधी न मिळाल्याने मोठी गोची झाली आहे. अर्थात अकार्यक्षम मंत्री आणि राज्यमंत्री भाजपामध्ये देखील बहुसंख्य आहेत पण मुख्यमंत्री हा भाजपामधला हुकमी एक्का, म्हणून तेथे बंड नाही, पण भाजपमध्येही आमदार बंडाच्या तयारीत नाहीत असे सांगणे म्हणजे मुर्खांच्या नंदनवनात वावरण्यासारखे….

प्रकरण नक्कीच गंभीर आहे म्हणजे कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केलेल्या 

पुरुषाच्या बायकोला दिवस गेल्यासारखे किंवा हागवणीचा त्रास होत असलेल्या रोग्याला जवळपास शौचालय शोधून शोधून न सापडल्यासारखे या बंड प्रकरणाने गंभीर वळण घेतले आहे. शिवसेनेतील जादूगार एकनाथ शिंदे सोडून जवळपास सगळे म्हणजे १२ मंत्री, राज्यमंत्री कुचकामी ठरले आहेत असा थेट आरोप या ६० आमदारांनी बैठक घेऊन केला आहे, कोणत्याही क्षणी हे आमदार थेट उद्धव ठाकरे यांना भेटून आपली कैफेयात मांडणार आहेत, मंत्रीपदे तेवढी उपभोगली, मात्र जनहिताच्या आणि पक्षाच्या दृष्टीने या मंत्र्यांनी काडीमात्र काम केले नाही त्यामुळे त्यांना मंत्रिपदावरून हटविण्यात यावे, त्यांची हि मागणी अजिबात अयोग्य नाही, मात्र उद्या जर कोणा एकाने फूस लावून हे काम सेनेच्या आमदारांकडून करवून घेतले तर मात्र याच आमदारांना अजिबात अक्कल नाही, असे जर उद्धव यांनी जाहीर म्हटले तर त्यात काहीही गैर नसेल. एक मात्र छान कि अमुक एखाद्या आमच्यातल्या आमदाराला मंत्री करा, असे त्यांनी कोठेही, कोणाच्याही नावाचा उल्लेख करून म्हटले नाही, ते एका अर्थाने बरे झाले. समजा त्यांनी प्रताप सरनाईक यांना मंत्री करा, असे म्हटले असते म्हणजे अमुक एखाद्याचे नाव घेतले असते तर मात्र ज्याचे नाव घेतले तो अडचणीत सापडला असता…अपूर्ण….पुढला लेख अधिक खतरनाक…!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *