संघ आणि भाजपा ४ : पत्रकार हेमंत जोशी

संघ आणि भाजपा ४ : पत्रकार हेमंत जोशी 

वाचक मित्रहो, आहार म्हणजे अन्न घेणे, झोप, भय आणि मैथुन म्हणजे प्रजा निर्माण करणे या चार गोष्टी माणूस आणि पशु यांच्यात समान आहेत. पण पशूंपेक्षा माणसाजवळ धर्म आणि संस्कार या दोन वेगळ्या गोष्टी आहेत म्हणून धर्महीन आणि संस्कारहीन माणूस पशूसारखा असतो. राष्ट्रीय स्वयंसेवक संघात जे उत्तम आहे ते सांगितलेच पाहिजे आणि जे उत्तम नाही किंवा विस्कटवल्या गेलेले आहे तेही येथे या लेखमालिकेतून सांगणार आहे. रा. स्व. संघातले स्वयंसेवक म्हणजे संघ सदस्य दररोज दोन वेळा एकत्र जमतात, ते ज्या मैदानावर एकत्र जमतात त्याला संघ शाखा असे म्हणतात. सकाळी सहा वाजता आणि संध्याकाळी सहा वाजता संघ शाखा भरते पैकी प्रात: शाखेवर वयस्क सिनियर मंडळी प्रामुख्याने एकत्र येतात, अपवादाने शिशु आणि तरुणांना देखील सकाळी या, सांगितल्या जाते. संध्यकाळी लहान थोर सारेच संघ शाखेवर येतात. उत्तम हिंदू संस्कार आपल्या मुलांवर घडविण्याचे संघ शाखा हे प्रभावी माध्यम आहे दुर्दैवाने याने काळाच्या ओघात शिक्षण पद्धतीतीत आणि नोकरी व्यवसायात अलीकडे आपल्याकडे आमूलाग्र बदल झाल्याने आपल्या राज्यातल्या बहुतेक सायं शाखा एकतर बंद पडल्या आहेत किंवा ओस पडल्या आहेत जर या सायं शाखा बंद पडल्या नसत्या तर रा. स्व. संघाची सदस्य संख्या झपाट्याने आणि मोठ्या प्रमाणात वाढली असती. संघ शाखा बंद पडल्याने वाढण्याचे प्रमाण नक्की कमी झाले आहे…


सकाळच्या शाखा भरतात पण त्यातले बहुतेक निवृत्त असतात, त्यातून त्यांचे फारसे काही साध्य होत नाही. एक अत्यंत महत्वाचे कि संघ शाखा ओस पडल्याने संघात पूर्वी जे जिव्हाळ्याचे प्रेमाचे घरोब्याचे वैक्तिक संबंध सर्व संघ स्वयंसेवकांचे असायचे, जात पात न पाळता त्या परिसरातले संघ कुटुंब सदस्य ज्या एकोप्याने एकमेकांसाठी प्रचंड दारिद्र्य असतांनाही धावून जायचे ते आता राहिलेले नाही, फार फार कमी झाले आहे. नजर आणि नियत साफ ठेवून एकमेकांच्या कुटुंबासाठी धावून जाणारे संघ स्वयंसेवक खरेच विरळे पण ते आता पूर्वीसारखे राहिलेले नाही, कारण त्यांच्यात जिव्हाळा निर्माण करणारे संघ शाखा हे प्रभावी माध्यम जवळपास संपलेले आहे…


सायंकाळची सिनेमा वाहिन्या इत्यादी विविध आकर्षणे, प्रेम प्रकरणे, व्यसने आणि दिवसभराच्या अतिव्यस्ततेमुळे संध्यकाळी तरी कुटुंबात एकत्र बसून चार गोष्टी करू या, बदललेली शिक्षण पद्धती त्यातून सतत शिक्षणाभोवती केंद्रित असलेले विद्यार्थी आणि अत्यंत अत्यंत महत्वाचे म्हणजे संघ स्थानावर आजमितीला देखील कालबाह्य ठरलेल्या व्यायाम आणि खेळांचे प्रकार इत्यादी कारणास्तव संघ शाखा ओस पडल्या, बंद पडल्या. संघ शाखांचे कार्य पूर्वीच्या गुरुकुल पद्धतीने चालते म्हणजे आजही जर संघात लाठ्याकाठ्यांवर भर दिला जात असेल आणि आधुनिक खेळांना स्थान नसेल तर संगणकाच्या माध्यमातून जग बघणारी आजची पिढी का आणि कशी संघ शाखे वर येणे पसंत करेल. आधुनिकतेकडे आणि स्वतःच्या करिअर कडे अति गांभीर्याने बघणारी तरुण पिढी, आऊट डेटेड ठरलेल्या संस्कृतीकडे आकर्षित होणे अशक्य आहे, त्यातून शहरी भागात तर अशक्य पण ग्रामीण भागातल्या संघ शाखा देखील बंद पडलेल्या आहेत, प्रमाण फार कमी झाले आहे. हिंदू संस्कार तर करणे आवश्यक आहेच पण त्याला आधुनिकतेची जोड जर संघाने दिली असती तर संघ शाखेचे आकर्षण कमी झाले नसते…


मला वाटते कि अमुक एखादा तरुण किंवा शालेय विद्यार्थी जर नियमित संघ शाखेवर जाणारा नसेल किंवा संघाशी संबंधित नसेल तर दरवर्षी मे महिन्याच्या दुसर्या आठवड्यात तीन आठवड्यांसाठी जे संघ शिक्षा वर्ग भरविण्यात येतात त्यात संघाबाहेरच्यांना प्रवेश दिल्या जात नाही, हा बदल जर संघाने केला तर मला वाटते त्यानिमीत्ते का होईना संघ स्वयंसेवकांची संख्या झपाट्याने वाढेल, संघांचे कार्य नेमके कसे, हा प्रसार झपाट्याने होईल. पालक आपल्या मुलांवर उत्तम हिंदू संस्कार होण्यासाठी पोटच्या मुलांना नक्की या अशा संघ शिक्षा वर्गात अगदी आग्रहाने पाठवतील. पण हाफ पॅन्ट वरून फुल पॅन्ट वर यायला ज्या संघाने कित्येक वर्षे घेतलीत तो संघ सहजासहजी आधुनिकतेकडे झुकण्यास किंवा काळाच्या ओघात पटकन स्वतःमध्ये बदल करवून घेण्यास राजी होईल वाटत नाही….


संघातले नकळत बदलेले एक अतिशय सूक्ष्म निरीक्षण माझ्या गावातल्या उदाहरणाने सांगतो. आम्ही शाळेत असतांना जेव्हा संघ शाखेत जात असू किंवा संघ स्वयंसेवक होतो, संघातले त्या त्या गावातले अत्यंत महत्वाचे नगर संचालक हे पद असायचे, आजही आहे. ह्या पदाचा मानकरी त्यागावातला अतिशय प्रतिष्ठित व्यक्ती त्या पदी आणून बसविल्या जात असे. आमच्यावेळी आमच्या जळगाव जामोद या गावातले नंबर वन श्रेष्ठ आणि वयाने ज्येष्ठ श्री अण्णासाहेब डिडोळकर त्यांच्या हयातीत अगदी अखेरच्या श्वासापर्यंत नगर संचालक या पदावर कायम होते किंवा शेजारच्या मलकापूरमध्ये माझ्या बहिणीचे मोठे दीर श्री प्रमोद डोरले हे होते किंवा खामगावला माझ्या धाकट्या बहिणीचे आजे सासरे भाऊसाहेब गुप्ते हे होते, थोडक्यात हिंदू समाजातले अतिशय मोठ्या दर्जाची व्यक्ती त्या पदावर विराजमान असे. आज याच माझ्या गावात आमच्या जोशी घराण्यातला, मिलिंद जोशी हा होतकरू सुविचारी तरुण नगर संचालक पदावर आहे, नेमके हेच खटकते आहे. म्हणजे डिडोळकर आणि मिलिंद जोशी यांच्या विचारात फरक नाही पण डिडोळकर हे अमिताभ होते तर मिलिंद हे अनिल धवन आहेत, डिडोळकर हे सचिन तेंडुलकर होते तर मिलिंद जोशी हे सलील अंकोला आहेत, अण्णासाहेब डिडोळकर हे हनुमंत होते तर मिलिंद जोशी फारतर हनुमंताच्या सेनेतले एक सदस्य ठरावे. डिडोळकरांमध्ये आम्ही थेट बाळासाहेब देवरस म्हणून बघत असू तर आजचे त्या मिलिंद कडे फारतर वासरात लंगडी गाय शहाणी, पद्धतीने बघून मोकळे होत असतील, थोडक्यात पूर्वीची ती माणसे जी रस्त्याने चालतांना, प्रत्येक गावकरी त्यांना झुकून आदराने नमस्कार करून आदरयुक्त भीतीने बाजूला होणे पसंत करीत असे, ती तशी माणसे आज संघात सर्वत्र त्यात्या पदावर नसल्याने, आदरयुक्त दरारा नक्की कमी झाला आहे, नको ती माणसे नको त्या पदावर आणून बसविल्या गेलेली आहेत. संघाकडे अनेक दर्जेदार विचारांचे देशभक्त पैसे न खाणारे पदाधिकारी असतांनाही तिकडे मंत्रालयात थेट मुख्यमंत्र्यांच्या शेजारी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अजिबात इच्छा नसतांना जर श्रीकांत भारती याच्यासारखा तद्दन चालू माणूस जर रा. स्व. संघाचा प्रतिनिधी म्हणून भरती केल्या जात असेल, जबदस्तीने घुसविल्या जात असेल तर इतरांनी संघाकडे का म्हणून आदराने बघावे….

अपूर्ण :


पत्रकार हेमंत जोशी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *