नालायक तुम्ही आम्ही : पत्रकार हेमंत जोशी

नालायक तुम्ही आम्ही : पत्रकार हेमंत जोशी 

मी जातीयवादी नाही पण हिंदुत्ववादी शंभर टक्के आहे आणि मी काबुल करायलाच हवे कि मला ब्राम्हण कमी ब्राम्हणेतर हिंदूंनी घडतांना वाढतांना कमावताना भरभरून सहकार्य केले. मित्रांचा माझ्यावसरील हा आरोप देखील तेवढाच खरा आहे कि मी आडनाव बघून अमुक एखाद्याला सहकार्य करतो किंवा मैत्रीचा हात पुढे करतो जेथे मुल्ला मौलवींकडून मी वस्तू विकत घेत नाही तेथे मैत्रीचा हात पुढे करणे मला कदापि शक्य नाही पण पाक विचारांचे नसलेले मुस्लिम मात्र माझे मित्र होतात मित्र असतात, इतर हिंदूंनी देखील हि अशी कणखर भूमिका घेऊनच जगायला पुढे जायला हवे. तुम्हाला धर्मांमधला फरक बघायचा असेल तर एखाद्या मॉल मधल्या टॉयलेट मध्ये सार्वजनिक मुतारी मध्ये एक तास घालवा बारीक निरीक्षण करा, तुमच्या लक्षात येईल कीं कोणताही हिंदू तरुण फारतर एखादा पेपर नॅपकिन हात तोंड पुसण्यासाठी घेईल राष्ट्रप्रेमी मुस्लिम देखील हेच करेल पण ज्या मुस्लिमांना या देशाबद्दल प्रेम नाही असे मुस्लिम गरज नसतांना पटापट खूप सारे पेपर नॅपकिन्स चुराडा करतील. उद्देश हाच कि नुकसान कुठल्यातरी हिंदूंचे होणार आहे ते करून मोकळे व्हायचे, कधी या वृत्तीमध्ये बदल घडणार आहेत परमेश्वर जाणे. तुमच्या सभोवतालची माणसे नेमकी कोणत्या वृत्तीची आहेत ओळखणे हे असे सोपे आहे असते…

जसे कोणतीही स्त्री जर समोर आल्यानंतर पुरुष तिच्या छातीकडे आधी बघून नंतर चेहरा बघत असेल ताडकन ओळखते महाशय स्त्रीलंपट आहेत. स्त्रीच्या छातीकडे विकृत कटाक्ष टाकणे खरे तर हा तिचा मोठा अपमान असतो अशा पुरुषांनी हे लक्षात ठेवले पाहिजे कि जे ते करताहेत नेमके तसे त्यांच्या घरातील तरुण स्त्रियांच्या बाबतीतही घडू शकते. बहुतेक भारतीय घरी चहात एक चमचा साखर घालत असतील तेच भारतीय बाहेर मात्र नेहमीपेक्षा अधिक साखर घालतात किंवा हॉटेलात जेवायला गेल्यानंतर विशेषतः सहलीला गेल्यानंतर हातात जे जे पडेल खिशात घालतात मग त्या दात कोरण्याच्या काड्या असतील किंवा रूम्स मधल्या विविध वस्तू अगदी टॉवेल्स पर्यंत त्यांची हातचलाखी सुरु असते कारण आम्हा भारतीयांना भ्रष्ट वृत्तीच्या रोगाने जखडलेले आहे. घरी जेवढे जेवतो त्यापेक्षा कितीतरी अधिक पटींनी आपण जेव्हा कोणीतरी बिल भरणारा असतो किंवा अमुक कुणाच्या घरी जेवायला जातो तेव्हा गरजेपेक्षा कितीतरी अधिक पटींनी हासडून मोकळे होतो याला लुटारू आणि लालची वृत्ती म्हणतात जी भारतीयांच्या वृत्तीत ठासून भरलेली असते. रांग मोडून नजर चुकवून पटकन पुढे जाणे न शोभणारे हीच वृत्ती नेत्यांची असते म्हणजे अगदी जवळच्या माणसाला पण प्रसंगी बाजूला ढकलून पटकन पुढे निघून जाणे यालाच सत्तेचा गैरवापर म्हणतात, असे फारच कमी भारतीय आहेत ज्यांना सत्तेचा गैरवापर टाळणे जमते….


मी ज्या इमारतीमध्ये राहतो तेथे सारेच श्रीमंत आणि सुशिक्षित आहेत पण अगदी आत्ता आता पर्यंत असे घडायचे कि कोणाचे लक्ष नाही बघून अनेक रहिवासी कबुत्तरांना कुठे धान्य टाक  कुठे फरसाण टाक किंवा खिडकीतून सिगारेटचे थोटके टाक थोडक्यात वाट्टेल ते टाकायचे, एक दिवस जेव्हा कोणीतरी वापरलेले कंडोम टाकले मग मात्र माझी सटकली आणि संशयितांची मग मी जेव्हा आई बहीण घेतली तेव्हा जरा हे प्रमाण बऱ्यापैकी थांबले. हीच सवय तुमचीही असेल तर तुम्ही शिक्षण घेऊनही अतिशय असंस्कृत आणि नालायक आहात हाच यातून अर्थ निघतो. अगदी अलीकडे मी जे तुम्हाला सांगितले होते ते तर विकृतीचे नीच उदाहरण आहे कि तुमची बायको जर तुमच्यासारखी व्यसनी नसेल म्हणजे सिगारेट दारू गुटका तंबाखू विडी ड्रग्स इत्यादी व्यसनांच्या आहारी गेलेली नसेल पण तुम्ही मात्र तिच्याशी संभोग करतांना आपले तद्दन घाणेरडे ओठ तोंड तिच्या ओठात तोंडात देत असाल तर तुम्ही तुमच्या बायकोकडे केवळ वापरण्याची वस्तू म्हणून बघता तुमचे तिच्यावर काडीचेही प्रेम नाही असाच त्यातून खरा अर्थ निघतो. नवरा बायको दोघेही समसमान व्यसनी असतील त्यातून यापद्धतीने एकमेकांना जवळ घेत असतील तर हरकत नाही पण व्यसनी नवरा बायको हे वाक्य म्हणजे त्या त्या कुटुंबाचा सर्वनाश नजदिक येऊन ठेपलेला आहे असाच त्यातून एकमेव अर्थ निघतो. व्यसनांचे समर्थन करणारे स्त्री पुरुष म्हणजे नालायक आणि निर्लज्ज वृत्तीचे हलकट उदाहरण हाच अर्थ त्यातून काढावा आणि वाद न घालता अशा जोडप्यापासून दूर निघून जावे…

तूर्त एवढेच : हेमंत जोशी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *