आमच्यातले अर्धवट : पत्रकार हेमंत जोशी

आमच्यातले अर्धवट : पत्रकार हेमंत जोशी 

अरविंद भानुशाली आमच्यातलेच एक आहेत म्हणजे तेही नवशक्ती दैनिकाचे वार्ताहर आहेत, दैनिक नवशक्ती ला यांची गरज आहे म्हणजे जेमतेम शेकड्यात छापल्या जाणार्या नवशक्तीच्या मालकाला शासना कडून नरिमन पॉईंट परिसरात मिळालेला भूखंड टिकवून ठेवायचा आहे म्हणून त्यांना मंत्रालयात पडीक असणाऱ्या त्यांच्या या प्रतिनिधींची अडल्या पडल्या गरज आहे आणि कोणाच्या तरी नावाने कुंकू लावावे तसे या छटाकभर दैनिकाचे भानुशाली मंत्रालय प्रतिनिधी आहेत, या छटाकभर वृत्तपत्राच्या प्रतिनिधीला मंत्री अधिकारी प्रशासकीय अधिकारी वचकून दचकून घाबरून का असतात हे मला न उलगडलेले कोडे आहे… एक तत्व जे मी नेहमी उराशी बाळगले ते असे कि आपण, आपली पत्रकारिता अन्याय अत्याचार भ्रष्टाचार करणाऱ्यांविरुद्ध करायची आहे, लेखणीतून दहशत निर्माण करायची मग त्या दहशतीचे गैरफ़ायदे व्यक्तिगत कामांसाठी करवून घ्यायचे, असे करायचे नाही हे मी पत्रकारिता १९८० मधये सुरु केली होती तेव्हा ठरविले होते, आजही त्या तत्वांना जागून आहे, चिपकून आहे. पत्रकारितेशी संबंधित व्यवसाय किंवा बांधकाम खात्यासारख्या एखाद्या मलईदार विभागात कंत्राटदारी करायची वरून आम्ही कसे लढवय्ये नामवंत पत्रकार असे मुखवटे घालून फिरायचे, मी ते केले नाही, पत्रकार असलेल्या पोटच्या पोरासही करू देणार नाही….

अरविंद भानुशाली नेमके कसे मला लिहायचे नव्हते पण ती वेळ आता आली आहे. एक दिवस एक अधिकारी डोळ्यात पाणी आणून म्हणाले, आम्हाला भानुशाली यांनी सांगितलेले अमुक एक काम कायद्याची अडचण असल्याने करणे अशक्य आहे पण काम भानुशाली यांचे आहे, ते करणे भाग असते, आहे. मग मी त्यांचे ब्रेन वॉश केले, त्यांना म्हणालो ज्यांनी आपले मॉरल विकलेले असते अशा पत्रकारांनाही अजिबात घाबरायचे नसते, तुम्ही विरोध करा, त्यांनी कंपल्शन केलेच तर मला आवाज द्या, मी धावत येईन, त्यांना नकार द्या, अजिबात चिंता करण्याचे कारण नाही… हे असे पत्रकार उठसुठ कोणत्याही मंत्र्याला, नेत्याला, अधिकाऱ्याला एकेरी नावाने उल्लेख करतात म्हणजे ते आमच्यातले दादा आहेत अजिबात समजण्याचे कारण नाही, तसेही मला अरविंद भानुशाली नेमके कसे अनेक पुरावे मांडून सांगायचे आहेत पण सेवानिवृत्तीला आलेल्या थेरड्याला कशाला दुखवायचे म्हणून मी अरविंद भानुशाली विषय बाजूला ठेवत आलो होतो, तशी गरज भासलीच तर काही अंक नक्की त्यांच्यावर काढून मोकळा होईल, तुम्ही मात्र मोकळा श्वास घ्या, अजिबात अशांना घाबरण्याचे कारण नाही, मी तुमच्या पाठीशी आहे. तसेही माझे या लेखा निमित्ताने अरविंद जेथे जेथे तोंड घालतात, त्या सर्वांना सांगणे आहे, घाबरायचे असेल तर देशभक्त पत्रकारांना घाबरायला हवे, हे असे अरविंद कचऱ्यासारखे उचलून बाहेर टाकायचे असतात, त्यांचे लाड खपवून घेणे, मोठ्यांदा येऊन बोलणे, काहीही खपवून घेणे आवश्यक नाही, त्यांनी आणलेले काम समाजाशी संबंधित असेल तर सहकार्य करण्यास हरकत नाही अन्यथा कमाईचे काम आणले कि थेट अशा पत्रकारांना वाटेला लावावे आणि चंद्रकांत पाटलांसारख्या बुजुर्ग मंत्र्यांनी अशा तद्दन फाल्तुक पत्रकारांना अजिबात डोक्यावर बसवून घ्यायचे नसते, नको त्या कमाईच्या कामांसाठी जर कायम दलाली करणारे वार्ताहर तुमच्यावर दबाव आणत असतील तर तुमच्यासाठी लढण्याची माझी तयारी आहे, नेमकी माहिती देऊन तुम्ही मोकळे व्हावे…

अलीकडे मी चंद्रकांत पाटलांच्या बंगल्यात बसलेलो होतो, काही गंभीर विषय त्यांच्याशी बोलायचे होते, पत्रकार अरविंद भानुशाली देखील तेथे नेहमीचे टोळके घेऊन बसले होते. तेवढ्यात एक तरुण आमदार आम्हा पत्रकारांच्या संदर्भात काहीतरी अपशब्द बोलले, माझी सटकली, मी त्या आमदाराला आडवे तिडवे घेतले, अरविंद मात्र काहीतरी पांचट विषय काढून हसत होते, अर्थात त्या आमदाराच्या चूक लक्षात आली, त्यांनी लगेच तेथल्या तेथे माफी मागितली, हा प्रकार संपल्यानंतर मग मात्र मी अरविंद वर घसरलो, म्हटले, आमदार आपली आई बहीण घेत असतांना तुम्ही हसत होते, निर्लज्ज कुठले, मग अरविंद बाहेर पडले. चंद्रकांत पाटील त्यांचे सचिव श्रीनिवास जाधव आमदार संजय कुटे म्हणजे तेथे जमलेले मला म्हणाले, हेमंत जोशी, कमाल केलीत, आम्ही याला पार वचकून असतो, मी हसून म्हणालो, आता यापुढे निर्भय व्हा, दलालांना घाबरायचे नसते…

दिवाळी निमित्ते भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी पत्रकारांसाठी जेवण ठेवले होते, मला त्यांच्या कार्यालयातून साध्या टेलिफोन ऑपरेटरचा फोन आला, तुम्हाला संध्याकाळी जेवायला यायचे आहे, मी चिडलो, म्हणालो, तुझ्या प्रदेशाध्यक्षाला कशी ग लाज नाही, माझ्यासारख्या बुजुर्ग पत्रकारांनाही ते तुमच्यामार्फत निमंत्रणे पाठवतात, चूक आमची आहे, आम्ही स्वस्त झालो आहोत म्हणून या नेत्यांची हि अशी आम्हाला भिकाऱ्यासारखे जेवायला बोलवायची हिम्मत होते, संघटनेची कामे कमी आणि व्यक्तिगत कामांवर अधिक भर देणार्या या अशा नेत्यांना वास्तविक हे असे वागणे शोभत नाही पण चूक नक्की आमची आहे, आमच्यातल्या मंडळींची आहे, आम्हीच आमच्या हाताने मान सन्मान घालवून बसतो, तीच वस्तुस्थिती आहे….अर्थात काही आंबे सडके असणे म्हणजे सारेच वार्ताहर किंवा पत्रकार तसेच, अजिबात असे नाही, माझ्यासंगे फेरफटका मारा, या राज्यातली अनेक मोठी प्रकरणे धसास लावणारे वार्ताहर कमाईची मोठी संधी असूनही, केवळ त्यांच्या वेतनावर किती छान जगतात, बघण्यासारखे असते. पत्रकारांनी अगदीच सोवळे असावे माझे तसे सांगणे नाही पण फुकाची दहशत चार टाळकी घेऊन निर्माण करायची वरून आम्ही कसे गल्लीतले अरुण शौरी सांगत सुटायचे, कोणीही हे असले फाल्तुक वार्ताहर पत्रकार डोक्यावर बसवून घेऊ नये, माझी हात जोडून विनंती आहे…

एका प्रसिद्ध दैनिकातला तो नामवंत वार्ताहर माझा अतिशय चांगला मित्र आहे. एक दिवस सकाळी सकाळी त्याचा दोन आला, म्हणाला, अजित पवारांचा वाढदिवस होता म्हणून अमुक एका नेत्याकडून मी आमच्या दैनिकाची मोठ्या रकमेची जाहिरात घेतली होती, दोन वर्षे उलटून गेली, तो नेता त्या जाहिरातीचे पैसे देत नाही, अलीकडे तर फोन देखील घेत नाही, मग मी त्या नेत्याला फोन लावला, तोही नेता माझा खूप वर्षे जुना मित्र. म्हणालो, त्या अमुक दैनिकाचे पैसे देऊन टाक रे. तो हसायला लागला, म्हणाला, स्वतःसाठी हे कधी केले नाही आणि जे दैनिक तुझ्या मृत्यूची चार ओळी बातमी छापणार नाही, त्या साठी तू हे करतोय, ठीक आहे, पाठवतो, आणि त्याने मुंबईत येताच दिलेला शब्द पाळला. ज्या वार्ताहराचे मी काम केले त्याच्या उपकाराचे माझ्यावर ओझे होते, थोडेसे फेडले, असे मनाला वाटले…

असे अनेकदा घडते, जे आमचे कर्तव्य असते म्हणजे आमच्या व्यवसायात असलेल्यांना मनापासून या कानाची त्या कानाला बातमी कळू न देता सहकार्य करण्याची सवय लावून घेणे, आवश्यक असते. अगदी अलीकडे चळवळीतल्या एका वार्ताहराचे मुख्यमंत्री कार्यालयात काम होते, काम सार्वजनिक होते तरीही त्या वार्ताहराला मुख्यमंत्री कार्यालयात काम घेऊन जाणे आवडणारे नव्हते, त्याने मग ते मला सांगितले, मुख्यमंत्री कार्यालयातल्या संबंधित अधिकाऱ्याने डोक्याला हात लावून घेतला, अहो, स्वतःच्या फाईल्स आणत चला कि, मी फक्त हसलो. मी फार सोवळा पत्रकार आहे, आमच्यातला संत तुकाराम म्हणजे भाऊ तोरसेकर आहे, अजिबात नाही, चान्स पे डान्स मी पण करतो मात्र केवळ तेच, असे होत नाही, असे करायचेही नसते, सहजगत्या सहज जे मिळते त्याचे नियोजन करायचे, पत्रकारितेशी संबंधित व्यवसाय उभा करायचा आणि पत्रकारितेचा उपयोग फक्त तो व्यवसाय वाढवून घेण्यासाठी करवून घ्यायचा, वरून मी म्हणजे दादा किंवा मोठा पत्रकार, असे वातावरण निर्माण करून लोकांना घाबरवून सोडायचे असे करणे योग्य नसते, असे जर कोणी आढळले तर माझे अशांवर तुटून पडणे ठरलेले असते…

पत्रकारितेतल्या भामट्यांविरुद्ध लढतांना माझे कितीही नुकसान झाले तरी चालेल पण जे लोकांना घाबरवून सोडतात आणि पत्रकारितेचा उपयोग वैयक्तिक कामे करवून घेण्यासाठी करतात, मग ते कोणीही असोत, शेवटच्या श्वासापर्यंत लढणे निदान मला तरी आवश्यक वाटते, चार चांगले पत्रकार जर सहकार्य करण्या पुढे आले तर आपले आयुष्य सार्थकी लागले असे म्हणता येईल अन्यथा एकला चालो रे पद्धतीने जगणे लढणे सुरूच आहे. अत्यंत अत्यंत महत्वाचे म्हणजे अरविंद भानुशाली हा विषय एवढा साधा सरळ आणि लहान नाही कि जो येथे मी संपवून मोकळा झालोय, बॉम्बस्फोट नक्की घडवून आणणार आहे…


पत्रकार हेमंत जोशी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *