तापलेले ठाणे २ : पत्रकार हेमंत जोशी

तापलेले ठाणे २ : पत्रकार हेमंत जोशी 

ठाणे जिल्ह्यात राष्ट्रवादीचे पाकिस्तानच्या क्रिकेट टीम सारखे झाले आहे म्हणजे पूर्वी ते या जिल्ह्यात टॉपला होते पण आज फारसे समाधानकारक चित्र नाही राष्ट्रवादीची जी दयनीय शोचनीय अवस्था मुंबईत आहे तेच चित्र त्यांच्याबाबतीत अख्ख्या ठाणे जिल्ह्यात आहे. काँग्रेस ची मते परंपरागत असतात त्यांना अमुक एखाद्या जिल्ह्यात उमदे नेतृत्व लाभलेले नसले तरी फारसा फरक पडत नाही. म्हातार्या झालेल्या गब्बरसिंग सारखी काँग्रेस ची अवस्था असते म्हणजे दे रे हरी खाटल्यावरी त्यांचे मतदारांना सांगणे असते आणि ठरलेले मतदार यांच्याव्यतिरिक्त इतरांना मतदान करून मोकळे होत नाहीत…


२०१४-१५ पर्यंत ठाणे जिल्ह्यात राष्ट्रवादीला मिळालेले नेते आणि मिळालेले यश अचंबित करणारे होते म्हणजे एखाद्या रिक्षावाल्याशी सरपंचाच्या मुलीने लग्न करून मोकळे व्हावे तसे या जिल्ह्यात राष्ट्रवादीला अचानक यश प्राप्त झालेले होते, पुढे ते टिकले नाही आणि यापुढे या जिल्ह्यात पुन्हा एकदा शरद पवार यांचे नेतृत्व मानणारे फार पुढे जातील असे वातावरण नाही अपवाद जितेंद्र आव्हाड किंवा गणेश नाईक आणि नाईक कुटुंबातले सदस्य. अर्थात नाईक आणि कुटुंबीय फार मनापासून पवारांसंगे आहेत असे अजिबात नाही, एक नक्की कुठलीतरी दुखरी नस पवारांच्या हाती असल्याने बायकोला घाबरणार्या पण दुसर्या स्त्रीच्या प्रेमात पडलेल्या पुरुषासारखे गणेश, संजीव आणि संदीप नाईक यांचे झाले आहे, त्यांना दुसरीकडे निश्चित निघून जायचे आहे पण पवारांना वचकून असल्याने त्यांची हिम्मत खचली आहे….


संघ भाजपाचे ख्रिश्चन मिश्नर्यांसारखे असते आणि राष्ट्रवादीचे मुस्लिम मुल्लांसारखे आहे. संघ भाजपा केव्हा कुठे झेप घेईल कळत नाही, सांगता येत नाही, त्यांच्याबाबतीत नेमका अंदाज बांधता येत नाही. पवारांना उगाचच वाटते कि मराठा समाज केवळ त्यांच्यासंगे मोठ्या प्रमाणात आहे, असे अजिबात नाही, पवारांना किंवा परंपरागत काँग्रेस ला सोडून मोठ्या संख्यने मराठा नेते आणि कार्यकर्ते भाजपासंगे गेले आहेत त्याखालोखाल शिवसेनेत आहेत. थोडक्यात ख्रिश्चन मिश्नर्यांमार्फत होणारे धर्मांतर जसे लक्षात येत नाही, संघ भाजपाचे नेमके चाललेले कार्य भल्याभल्यांच्या ध्यानात येत नाही. याउलट राष्ट्रवादी नेत्यांचे, अपवाद शरद पवार, सध्या काय चाललेले आहे हे आकांडतांडव करणाऱ्या मुल्लांसारखे असल्याने इतरांना पटकन कळते आणि विरोधक सावध होतात. सावधान होऊन अधिक जोमाने कामाला लागतात. ठाणे जिल्ह्यात शिवसेनेखालोखाल आज भाजपा नंबर दोनला पुढे आलेली आहे उद्या याच भाजपाने डिमाण्डेड नेते देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली सेनेच्याही पुढे मुसंडी मारली तरीही फारसे आश्चर्य वाटणार नाही. हे कदाचित तुम्हाला सांगून खरे वाटणार नाही कारण संघ भाजपामधले सारेच विश्वास पाठक पद्धतीने काम करून मोकळे होतात. आता हे विश्वास पाठक कोण आणि सध्या ते काय करताहेत, लवकरच त्यावर मोठा गौप्य्स्फोट मी करणार आहे….

क्रमश:

 पत्रकार हेमंत जोशी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *