हमारी अमृता : पत्रकार हेमंत जोशी


हमारी अमृता : पत्रकार हेमंत जोशी 

वर्षा विनोद तावडे, ज्योती पराग आळवणी आणि अमृता देवेंद्र फडणवीस, या तिघी तीन मान्यवरांच्या बायका यापैकी असे वाटले होते कि वर्षा राजकारणात उतरतील आणि पुढेही निघून जातील जसे मधू चव्हाण यांची दुसरी पत्नी खूप पुढे किंवा त्यांच्याही पुढे निघून गेली तशी पण ते घडले नाही, एकेकाळी विद्यार्थी परिषदेची हि आघाडीची नेता पण विनोद यांच्याशी प्रेमविवाह केल्यानंतर त्यांनी अधिकाधिक वेळ चूल आणि मूल सांभाळण्यात घालविला. ज्योती मात्र थांबल्या नाहीत त्या राजकारणात नवऱ्यासंगे अधिकाधिक व्यस्त होत गेल्या, सध्या त्या नगरसेविका आहेतच. व्हेरी व्हेरी ऍक्टिव्ह लेडी…


अमृता देवेंद्र फडणवीस मात्र एक अफलातून व्यक्तिमत्व, फार जवळून त्यांना कधी बघितले नव्हते जरी देवेंद्र यांच्याशी त्यांच्या अगदीच तरुण वयापासून संबंध होते तरी, अलीकडे मात्र दिवाळी निमित्ते मी आणि विक्रांत मुख्यमंत्र्यांनी आमंत्रण दिल्याने वर्षा बंगल्यावर गेलो होतो आणि मुख्यमंत्र्यांनी अमृता यांची ओळख करून दिली, काही मिनिटे छान बोलणे झाले, तेवढीच ओळख पण मध्यंतरी भलतेच घडले, अमृता यांचे ते रूप बघून मी आश्चर्याने तोंडात बोटे घातली….


मुंबईतल्या सुप्रसिद्ध जगप्रसिद्ध शाळांपैकी एक, जुहूची म्हणजे जमनाबाई नरसी स्कुल. ऋषितुल्य पिढीजात श्रीमंत, मोठे उद्योगपती, अतिशय स्पष्टवक्ते, बुद्धिमान, आणि शाळेवर नितांत प्रेम करणारे श्रीमान जयराजजी ठक्कर या स्कुलचे जवळपास सर्वेसर्वा, त्यांचे उत्साही आणि उत्सवी कर्तबगार सुपुत्र सुजय ठक्कर देखील शाळेच्या कारभारात त्यांना सहकार्य करतात. दोघा बाप बेट्यांचे आपापसातले फ्रेंडली ट्युनिग, बघायला छान वाटते. स्कुल कशी असावी तर जमनाबाई स्कुल सारखी, आणि मी हे स्वानुभवातून सांगतो कारण माझे दोन्ही नातू आर्यवीर आणि अनमोल या स्कुलचे विद्यार्थी आहेत….


विशेष म्हणजे स्कुल मध्ये जवळपास ९० टक्के विद्यार्थी हे एकतर गुजराथी आहेत किंवा फिल्म इंडस्ट्रीशी संबंधित असलेल्या कुटुंबातले आजी माजी विद्यार्थी आहेत जसे अनिल कपूर, अभिषेक बच्चन, आलिया भट आणि असे कितीतरी. आम्ही सोडून बहुतेक सारे गर्भश्रीमंत कुटुंबातून आलेले आहेत. अलीकडे जमनाबाई स्कुल ने सर्वांगसुंदर आधिनिक पद्धतीने तयार केलेल्या खेळाच्या मैदानाचे उदघाटन अमृता देवेंद्र यांच्या हस्ते होते, त्यानंतर अभिषेक बच्चन यांच्या नेतृत्वाखाली एक फूटबॉल मॅच देखील आयोजित करण्यात आली होती. माझे नातू कोणत्या स्कुल मध्ये जातात हे त्या कार्यक्रमाला गेल्यानंतर माझ्या नेमके लक्षात आले म्हणजे श्रीमंत आणि उच्चशिक्षित आईवडील तेथे बघायला मिळाले, धन्य वाटले….


www.vikrantjoshi.com


अनेकांची भाषणे झाली आणि अमृता फडणवीस भाषणाला उभ्या राहिल्या, एक नागपूरकर तरुणी जमलेल्या एलिगंट जमावासमोर भाषण करायला उभी राहिली, अमृता यांचा तेथला सहज वावर, विशेष म्हणजे हाती कोणताही कागद न घेता केलेले फाडफाड, इंग्रजीतून भाषण, मिस्टर देवेंद्र उद्या जर तुम्ही अमुक एखाद्या वक्तृत्व स्पर्धेत उतरलात आणि त्या स्पर्धेत अमृता यांनीही भाग घेतला असेल, मला खात्री आहे, प्रथम क्रमांक देवेंद्र पत्नीने पटकावलेला असेल. त्यांच्या त्या उत्स्फूर्त आणि अस्क्खलीत भाषणातील प्रत्येक वाक्यावर जमलेले सारे टाळ्या मारीत होते, कान देऊन ऐकत होते. मला अभिमान वाटला, मन आनंदाने भरून आले…..


अमृता फडणवीस आणि जयराजजी ठक्कर माझ्या पुढल्याच रांगेत बसले होते,अमृता यांना हाय हॅलो करावे किंवा नाही या विचारात होतो, निघतांना जयराज यांना सांगण्यासाठी त्यांच्या जवळ गेलो आणि अमृता यांचे केवळ माझ्याकडे लक्ष गेले नाही तर त्यांनी मला ओळखले देखील, पुढली पाच मिनिटे मी, त्या आणि जयराजजी ज्या पद्धतीने बोलत होतो, जयराज यांच्या चेहऱ्यावरचे कौतुकाचे भाव त्यातून लपले नाहीत आणि अमृता तुमचे हे असे वागणे मला थेट त्या शरद पवारांसारखे वाटले, म्हणजे एकदा ओळख झाली रे झाली कि पवार जसे एखाद्याला नावासहित आवाज देतात, तसे तुमच्या बाबतीत वाटले. 

काय हरकत आहे तुम्हीही राजकीय क्षेत्रात पाय ठेवायला…आगे बढो….

तूर्त एवढेच.


पत्रकार हेमंत जोशी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *