जैसी करनी….–पत्रकार हेमंत जोशी

जैसी करनी….–पत्रकार हेमंत जोशी 

मी अनेकांवर टीका करतो पण जैसी करनी….मधून मी किंवा माझे कुटुंब देखील सुटलेले नाही, या हातावरचे त्या हातावर येथेच फेडावे लागते, त्यातून कोणाचीही सुटका नाही, येथेच सारे फेडून वर जावे लागते आणि चांगले काम केलेले असेल तर याच जन्मी त्याचे फळ चाखायला मिळते. एक फोटो अलीकडे सुप्रसिद्ध आरटीआय आक्टिविस्ट आणि आमचे कुटुंब मित्र श्री अनिल गलगली यांनी त्यांच्या फेस बुक वर टाकला होता, भय्यू महाराजांच्या कुटुंबासमवेत तो फोटो होता, महाराजांच्या जेमतेम ५ महिन्याच्या मुलीवर मुंबईत कुठलीशी शस्त्रक्रिया करण्यात आली होती, त्यानिमीत्ते सिद्धी विनायकाच्या दर्शनाला आलेल्या कुटुंबासमवेत गलगली, असा तो फोटो होता, फोटो बघून खूप गलबलून आले, आपल्या कर्माची फळे नक्की आपल्या पुढल्या पिढीला भोगावी लागतात, हे तितकेच खरे आहे. गर्व, माज, फसवणूक करणे यातून पापांचा घडा अत्यंत वेगाने भरत असतो, हे शंभर टक्के सत्य आहे….


थोडेसे अनिल गलगली या महान आरटीआय आक्टिविस्ट विषयी सांगतो, सध्या ते चीनला गेलेले आहेत, साधारणतः वयाची चाळीशी उलटलेले गलगली अविवाहित असूनही आणि राज्यातले फार मोठे, नामवंत आरटीआय आक्टिविस्ट असूनही चाळीशी उलटल्यानंतर पहिल्यांदा परदेशात गेले आहेत, त्यांनी पैसे खायचे ठरविले असते तर आज ते किमान दोन तीनशे कोटींचे अगदी सहज मालक राहिले असते पण प्रामाणिक गलगली अद्याप पर्यंत भारताबाहेर कधीही गेलेले नव्हते, यावरून त्यांचे प्रामाणिक जीवन आणि देशभक्त वृत्ती सहज लक्षात येते, माणूस पैशांनी नक्की कफल्लक आहे पण त्याचे नाव आदराने घेतल्या जाते, अनेक लढाया त्यांनी अगदी लीलया जिंकलेल्या आहेत, गलगली यांना सलाम…


अनिल गलगली यांच्यापेक्षा नाव कमावण्याची खूप मोठी संधी दिवंगत भय्यू महाराजांना होती पण त्यांनी चालून आलेल्या संधीचे सोने नव्हे शेण केले, स्वतःला त्यातून तर संपवलेच पण पाठीमागे कुटुंब सदस्य वार्यावर ते सोडून गेले. जर्जर शरीर झालेली आई, देखणी तरुण मुलगी, अत्यंत तरुण आणि सुंदर पत्नी आणि पाच महिन्यांची अपंग मुलगी, पाहवत नाही अशी आज त्यांच्या कुटुंबाची अवस्था आहे, लुटून जमा केलेले पैसे, आले त्याच मार्गाने निघून जातील असे साधारण त्यांच्या घरी वातावरण आहे, मी आम्ही मित्र भय्यू महाराजांना जिवाच्या आकांताने ओरडून सांगतो होतो, मिळालेल्या यशाचा माज डोक्यात घालून जमलेल्या मंडळींना बेवकूफ बनवू नका, त्यांनी ऐकले नाही आणि बघता बघता होत्याचे नव्हते झाले…


जेव्हा तुम्हाला वयाच्या ३५ व्या वर्षांपासून हेवी मधुमेह, डायबेटिज आहे, म्हणजे मधुमेह होऊन साधारणतः दहा पंधरा वर्षे उलटलीत कि कोणत्याही पुरुषाने मूल जन्माला घालायचे नसते, तरीही पन्नाशीला आलेल्या भय्यू महाराजांनी नको ती चूक केली, डॉ. आयुषी लग्नाआधी कि लग्नानंतर पोटुशी राहिल्या, लवकरच धारा झाली तीही नको त्या अपंगावस्थेत, यापुढे तिचे अपंग आयुष्य तिला घालवायचे आहे, एकेकाळी मानलेल्या या जिवलग मित्राच्या कुटुंबाचे हे भोग नको तेवढे कठीण आहेत. वास्तविक कोणतेही साधू संत त्यांच्या मृत्यू पश्चात अधिक मोठे झालेले आहेत त्या गजानन महाराज किंवा शिर्डीच्या साईबाबांसारखे पण भय्यू महाराजांच्या बाबतीती नेमके उलटे घडलेले आहे निदान ते जिवंत असेपर्यंत त्यांच्या सभोवताली भक्त जमायचे पण पार पडलेल्या गुरु पौर्णिमेला असे कुठेही या राज्यात आढळले किंवा घडले नाही कि भय्यू महाराज जाऊन जेमतेम काही महिने उलटले आहेत आणि त्यांच्या भक्तांनी त्यांच्या नावाने गुरु पौर्णिमा धुमधडाक्यात साजरी केली, जमलेले फार कमी त्यांचे सच्चे भक्त होते, बहुसंख्य मतलबी जमा झालेले असल्याने असे भक्त भय्यू महाराजांना एका झटक्यात विसरले..


नेहमीप्रमाणे पुन्हा तेच कि सारे येथेच फेडावे लागते मग वर जाता येते म्हणजे १९८० नंतर या राज्यातल्या ज्या ज्या मंडळींनी गरिबांचा पैसा लुटून जे नवश्रीमंत झालेले आहेत, आम्ही सारेच मग ते नेते असतील, मराठा असतील, मराठेतर असतील, अधिकारी असतील, कंत्राटदार असतील, दलाल असतील, मंत्री असतील, सर्वांना येथेच सारे भोगून वर जायचे आहे आणि सारे येथेच सोडून जायचे आहे. जो तो भ्रष्टाचाराविरुद्ध बोलतो पण जो या विषयावर मोठमोठ्याने बोलतो तो सर्वाधिक भ्रष्ट असतो. असे कधी कोठे घडणार आहे का कि समजा अमुक एखाद्या शिक्षण सम्राटाने धर्तीवर मिळविलेले पापाचे पैसे तिरडीला बांधून वर नेले, नाही असे कधीही घडत नसते, याउलट अत्यंत यातनामय मृत्यूला या साऱ्याच मंडळींना सामोरे जावे लागते. वाईट याचेच वाटते कि आपल्या राज्यातल्या एकही पदाधिकाऱ्याला असे वाटत नाही कि पुण्य जमा करून वर जावे, जवळपास सारेच पैसेखाऊ आणि स्त्रीलंपट म्हणजे ज्याच्या हाती ससा तो पारधी…

तूर्त एवढेच:

पत्रकार हेमंत जोशी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *