तापलेले ठाणे : पत्रकार हेमंत जोशी

तापलेले ठाणे : पत्रकार हेमंत जोशी 

ठाणे जिल्ह्यातल्या राजकीय वर्तुळात आता म्हणजे अलिकडल्या चार वर्षात भाजपाने मोठी मुसंडी मारून राष्ट्रवादीने मिळविलेले स्थान पटकावले आहे, बळकावले आहे, जेथे चार वर्षांपूर्वी म्हणजे क्रमांक दोन वर राष्ट्रवादी होती आता तेथे भाजपा आहे, ठाणे जिल्ह्यात अर्थात आजही पहिल्या क्रमांकावर शिवसेना आहे आणि राष्ट्रवादीची मोठी पीछेहाट झाल्याने सेनेनंतरचे स्थान भाजपाने मिळविले आहे. अलीकडे मुंबई भाजपाध्यक्ष आमदार आशिष शेलार आणि मनसेतून बाहेर पडलेले माजी आमदार शिशिर शिंदे यादोघांत गाठीभेटी होताहेत याचा अर्थ शिशिर शिंदे थेट भाजपामध्ये प्रवेश घेऊन मोकळे होणार आहेत हा एकमेव अर्थ त्यातून निघत नाही जसे जितेंद्र आव्हाड यांच्या मातोश्रीवरील भेटीगाठीने अर्थ काढल्या जातोय कि आव्हाड सेनेच्या मार्गावर आहेत…


मुंब्रा विधान सभा मतदार संघाचे एक प्रभावी आणि लोकप्रिय आमदार म्हणून काम करणारे जनाब जितेंद्र आव्हाड यांना तसेही शिवसेनेत प्रवेश करून मोठ्या कष्टातून बांधलेला मुंब्रा, बहुसंख्य मुस्लिम मतदार असलेला मतदार संघ सहजासहजी यापुढे इतरांच्या हाती जाऊ द्यायचा नाही, विशेष म्हणजे मुंब्रा मतदार संघ एवढा संवेदनशील आहे कि जितेंद्र आव्हाड हे चार दोन वेळा अलीकडे जे मातोश्रीवर जाऊन थडकले, हा मेसेज जर निगेटिव्ह पद्धतीने त्यांच्या मतदारांमध्ये पसरला तरीही आव्हाड यांच्या मतदारांची टक्केवारी मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकते आणि आव्हाड हे तर मुंब्रा या मतदार संघात एवढे एकरूप झालेले आहेत कि उद्या जर त्यांनी स्वतःची सुंता करून घेतली तर आमच्यासारख्या त्यांच्या मित्रांना किंवा दादा सामंत यांच्या लाडक्या कन्येला त्यावर फारसे आश्चर्य वाटणार नाही, ये तो होनाही था, म्हणून मोकळे होऊ…


युती झाली आणि झाली नाही तरीही फारसा फरक पडू न देता २०१९ मध्ये होणाऱ्या विधान सभा निवडणुकीत ठाणे शिवसेना जिल्हा प्रमुख नरेश म्हस्के ठाण्यातून शिवसेनेतर्फे निवडणूक लढवतील, आमदार होतील आणि युती सत्तेत आली तर मंत्रीही होतील, बहोत मजा मार लिया है तुमने मिस्टर एकनाथ शिंदे, यापुढे मीच आमदार असेल आणि मीच नामदार असेल हे त्यांनी सर्वांना सांगून ठेवले आहे. पुरे झाले आता कपडे सांभाळणे किंवा मैदानावर जाऊन खेळणाऱ्या खेळाडूला एखाद्या राखीव खेळाडूसारखे पाणी नेऊन देणे, सरबताचे पेले पोहोचविणे, म्हस्के यांना यापुढे एकनाथ शिंदे यांच्यासमोर राखीव खेळाडू म्हणून भूमिका घ्यायची नाही म्हणजे पदे तुम्ही पटकवायची करोडो रुपये तुम्हीच मिळवायचे आणि आम्ही दरवेळी केसेस अंगावर घेऊन लढत राहायचे, नरेश म्हस्के यांना या हमालीचा आता मनातून मनापासून उबग आला आहे, त्यांना आधी आमदार तदनंतर धाडसी नामदार या नात्याने थेट रवींद्र चव्हाण यांच्यासारख्या दादा मंडळींना अख्ख्या ठाणे जिल्ह्यातल्या मातब्बर विरोधी पक्षातल्या नेत्यांना कधी शक्तीने तर कधी युक्तीने आव्हान देऊन त्यानंतर हळूच एकदिवस निवृत्त व्हायचे आहे, हि वाक्ये माझ्या नव्हे तर दस्तुरखुद्द शिवसेनेचे धाडसी प्रभावी नेते नरेंद्र म्हस्के यांच्याच तोंडून निघालेली आहेत. आणि तसेही वसंत डावखरे यांच्या निधनानंतर अत्र तत्र सर्वत्र मैत्रीचे संबंध जोपासण्यात एकनाथ शिंदे यांचे नव्हे तर नरेश म्हस्के यांचे नाव घेतल्या जाते.अत्यंत महत्वाचे म्हणजे आजही शिंदे आणि म्हस्के यांच्यात कोणतेही राजकीय वैमनस्य नाही, स्पर्धा असली तरी ती निकोप आहे म्हणजे शिंदे यांना पद मिळाले की नरेश म्हस्के अस्वस्थ होतात किंवा म्हस्के अमुक मोक्याच्या ठिकाणी बसले म्हणजे शिंदे सैरभैर होतात असे अजिबात नाही, हे दोघेही दिवंगत आनंद दिघे यांचे पट्टशिष्य होते आणि त्यांच्याच तालमीत एकाचवेळी तयार झाल्याने ते आजपर्यंत म्हणाल तर सख्ख्या भावासारखे किंवा म्हणाल तर जिवलग मित्र म्हणून एकत्र जगले आहेत, सुखदुःख्खात कायम एकमेकांसाठी प्रसंगी प्राणाची पर्वा चिंता काळजी न करता धावून आले आहेत त्यामुळे एकनाथ शिंदे हे मंत्री झाल्याने म्हस्के यांच्या फार पोटात दुखले असं अजिबात नाही पण त्यांनाही स्वतःच्या राजकीय महत्वाकांक्षा असल्याने म्हस्के यांना यापुढे आधी आमदार नंतर नक्की नामदार व्हायचे आहे…

क्रमश:


पत्रकार हेमंत जोशी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *