व्यक्ती विशेष ३ : जयंत पाटील आणि धनंजय मुंडे–पत्रकार हेमंत जोशी

तुम्ही हा लेख वाचून संपवेपर्यंत राज्यातील बजेट अधिवेशनाचे सूप वाजलेले असेल. हे अधिवेशन प्रामुख्याने दोन नेत्यांमुळे माझ्या कायम स्मरणात राहील. हे दोनही नेते विशेष म्हणजे राष्ट्रवादी पक्षाचे आहेत, पहिले माजी मंत्री सांगलीचे जयंत पाटील आणि दुसरे आहेत तरुण नेते श्रीमान धनंजय मुंडे, दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे आणि विधान परिषदेतले विरोधी पक्ष नेते….

एखाद्या गोष्टीचा म्हणे योग यावा लागतो, जे जेव्हा नशिबात असते ते तेव्हाच मिळते, कितीही प्रयत्न केलेत तरी म्हणजे पत्रकार राजन परकर विवाहबंधनात अडकण्यासाठी कमी प्रयत्न करीत असेल का, पण नाही जमले अजून त्याचे, मी त्याला अनेकदा म्हणालो 

देखील कि माझ्या ओळखीच्या मुलीशी लग्न करशील का म्हणून, पण तो साफ नकारदेतो, त्याला उगाचच वाटत असावे कि त्याचे माझ्या ओळखीच्या मुलीशी लग्न झाले तर तो सकाळी घराबाहेर पडल्यानंतर मी त्याच्या घरी गप्पा मारायला जात राहीन, असे काही 

नसते हो, पण त्याला सांगावे कोणी. एकदा बुटावर लघवि सांडायला लागल्यानंतर लग्न करण्यात काहीही उपयोग नसतो. जयंतराव यांचेही नेमके तेच झाले, त्यांना तो योग जुळून आला नाही. जयंत पाटील यांना नेमके जे हवे होते ते मिळविण्यासाठी त्यांना आजचा दिवस बघावा लागला म्हणजे जयंत पाटील यांना या राज्यात त्यांच्या पक्षाचे नेतृत्व करायचे होते, पक्षातला मोठा नेता असे नाव गाजवून सोडायचे होते पण जेव्हा जयंत पाटील यांचा राजकीय उदय होऊन ते मंत्री झाले नेमके त्याचवेळी त्यांच्या स्पर्धेत जे दोन तरुण उतरले होते त्यांनी जयंतरावांना जणू कोपच्यात बसवून ठेवले होते, नाही म्हणायला त्या दोघांच्या बरोबरीने जयंतराव देखील तोडीचे मंत्री होते, वित्त सारखी महत्वाची खाती त्यांच्याकडे होती पण सांगलीतलेच एक आर आर आबा पाटील आणि दुसरे श्रीमान अजितदादा या दोघांत 

जयंतराव कुठेतरी काहीसे कमी पडत असल्याने त्यांना नेत्यांच्या हव्या त्या रांगेत बसण्याची कधी संधी चालून आलीच नाही, पण या अधिवेशनात तो योग जुळून आला, नागपूरपेक्षा हे बजेट अधिवेशन जयंत पाटलांनी आपल्या भाषणातून दणाणून आणि गाजवून सोडले, त्यांच्या सभागृहातील कामगिरीवर आणि भाषणांवर दस्तुरखुद्द मुख्यमंत्री देखील अनेकदा अस्वस्थ झाले, त्यांना स्वत:ला जयंत पाटलांच्या भाषणांची अनेकदा दाखल घ्यावी लागली आणि जयंत पाटील यांना हा योग जुळून आला कारण आता आर आर आबा नामक त्यांचे पक्षातले स्पर्धक देवाघरी निघून गेले आहेत आणि नको त्या भानगडी करून ठेवल्यामुळे अजित पवार यांच्यातला सभागृहातला ‘ दादा ‘ तूर्तास तरी इतिहास जमा झाला आहे, या दोहोंपैकी एक जरी स्पर्धेत असता तर जयंतरावांना पुन्हा एकदा मागच्यारांगेत बसून समाधान मानावे लागले असते आणि टाळ्या म्हणून टेबल वाजवण्याचे नेहमीचे काम त्यांना करावे लागले असते. यापुढे मात्र जेव्हा केव्हा राष्ट्रवादी सत्तेत येईल मुख्यमंत्रीपदाचे दोन दावेदार असतील एक जयंतराव आणि दुसरे 

धनंजय मुंडे….

मुलाचे पाय पाळण्यात दिसतात, मी याठिकाणी जे सांगतो तेच उद्या खरे ठरेल, धनंजय मुंडे उद्या नेतृत्वात काका गोपीनाथ यांच्या दोन पावले पुढे असतील, हि संधी तूर्तास तरी पंकजा यांनी गमावलेली आहे, त्या सत्तेत असून कुठेतरी वागण्यातून किंवा अनुभवत कमी पडल्या, अल्लड ठरल्या, नेमका त्यांच्या या उणीवांचा फायदा शरद पवार यांनी करवून घेतला त्यांनी उद्याचा गोपीनाथ मुंडे आजच आपल्या घरी आणून ठेवला. माणसे ओळखावीत ती शरद पवार यांनीच, म्हणून मी नेहमी सांगतो कि उद्या जर मुख्यमंत्री राष्ट्रवादीतून करायचा ठरले म्हणजे मतदारांनी तसे ठरविले तर मुख्यमंत्री पदास लायक अनेक दुसर्या फळीतले नेते शरद पवार यांच्या भात्यात असतील, इतर पक्षात ते अभावाने आढळते…..फार पूर्वी म्हणजे धनंजय अगदीच बाळबोध असल्यापासून काकांचे बोट पकडून या 

मंत्रालयात येतांना मी बघितले आहेत, त्यांची ती पावले मी १९९५ दरम्यान ओळखली होतीकि हा तरुण गोपीनाथ यांचा राजकीय वारसदार असेल म्हणून, आज तेच घडले आहे, बजेट अधिवेशन धनंजय यांनी गाजवून सोडले आहे, त्यांचे वागणे, बोलणे, माणसे जोडणे, काम करण्याची पद्धत, कार्यकर्त्यांच्या खांद्यावर हात ठेवून त्याला आश्वासक करण्याची पद्धत, लिहून आणलेला कागद समोर न ठेवता सभागृहात किंवा सभेच्या ठिकाणी प्रभावी भाषण करण्याची कला, रुबाबदार वागणे आणि राहणीमान, सारे काही त्या गोपीनाथ मुंडे यांची आठवण करून देणारे, विशेष म्हणजे गोपिनाथ्जी गेल्यानंतर अत्यंत पराक्रमी असा वंजारा समाज, जो काहीसा त्यांच्या जाण्याने सैरभैर झाला होता, आता ती कसर नक्कीच काही प्रमाणात धनंजय यांनी भरून काढली आहे, उद्या हा समाज संपूर्ण त्यांच्या पाठीशी उभा राहिल्यास आम्हाला फारसे आश्चर्य वाटणार नाही, कारण आज हा समाज मोठ्या प्रमाणावर फक्त आणि फक्त पंकजा यांचे नेतृत्व मानतो, त्यांच्या लाडक्या नेत्याशी म्हणजे गोपीनाथजी यांच्याशी धनंजय आणि त्यांचे पिताश्री पंडितराव यांनी वैर केल्यामुळे तूर्तास हवा तेवढा प्रतिसाद वंजारा समाजातून धनंजय यांना नाही. अर्थात पंकजा यांनी योग्यवेळी लोकप्रियतेला धक्का पोहोचण्याचा हा धोका ओळखून आता याक्षणापासून त्यांचे स्वत:चे नेतृत्व कसे वृध्धींगत होईल, मोठी काळजी घ्यायला हवी, चालून आलेली संधी त्यांनी गमावल्यास पंकजा यांना पुन्हा समाजातले आजचे त्यांचे स्थान मिळविणे नक्कीच खूप कठीण जाईल. धनंजय यांनीही एक सावधगिरी बाळगावी म्हणजे हलक्या कानाचे राहू नये, अमुक एखाद्याला आधी जवळ घ्यायचे नंतर एखाद्याने त्यांच्या कानात काही सांगून टाकले कि लगेच जवळ घेतलेल्या कार्यकर्त्याला दूर करायचे, त्यांनी आपल्या स्वभावातला हा दोष तातडीने काढून टाकावा, त्यांचे काका समोरच्या माणसाला त्याच्या गुण दोषांसहीत स्वीकारायचे, म्हणून कार्यकर्ते त्यांच्यापासून कधीही दूर गेले नाहीत….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *