एक हट्टी मुलगा : पत्रकार हेमंत जोशी

एक हट्टी मुलगा : पत्रकार हेमंत जोशी 

काही स्त्रिया किंवा पुरुष वयाने कितीही वाढलेत तरी शेवटपर्यंत त्यांच्या चेहऱ्यावर निरागस इनोसंट भाव कायम टिकून असतात. काही स्त्रिया आणि पुरुष अगदी तरुण वयात किंवा आपण बघतो, लहानपणापासूनच खूपसे पोक्त भाव त्यांच्या चेहऱ्यावर असतात. पत्रकारितेतल्या आजीबाई, काकूबाई, मावशी म्हणण्याचा अवकाश, कोणते बरे नाव तुमच्या ओठावर आले…आले ना लक्षात…राष्ट्रवादीचे प्रमोद हिंदुराव आठवतात का…त्यांना नजरेसमोर आणा…हं..आधी त्यांची मिशी काढा, आता त्यांना शाळेचा युनिफॉर्म चढवा, नंतर हनुवटीला छोटीशी काजळी लावा, बघा आता त्यांच्याकडे…झालेना शाळेतले बाळ, बालक तयार…सांगणारे सांगतातही, प्रमोदजी १२-१३ वर्षांचे होईपर्यंत कडेवर बसूनच बाहेर पडायचे…आमचे हे मुख्यमंत्रीही ते तसेच, राजकारणात मोठ्या तयारीचे पण चेहऱ्यावर आजही म्हणजे चाळिशीतही भाव मात्र बालक मंदिररतल्या बालकासारखे, छे…तो जोडा जमलंच नसता, कुठे त्या पोक्त बाई आणि कुठे हे आमचे निरागस चेहऱ्याचे मुख्यमंत्री, आमची हि भावजयी गायिका ताईच त्यांच्यासाठी एकदम परफेक्ट…नशीब, चारित्र्य कसे जपायचे हे मुख्यमंत्र्यांना नेमके माहित, अन्यथा त्यांचाही राजकारणातला राजेश खन्ना झाला असता त्या नागपुरात…त्याकाळी नाही का तरुणी काका च्या फोटोशी पण लग्न उरकून मोकळ्या व्हायच्या….फार कमी असतात असे नेते जे लंपट नसतात, ज्यांच्या संगें सेफ सुरक्षित वाटते, असे नेते नेहमी हवेहवेसे वाटतात, फारच कमी असतात असे, या किंवा आधीच्या मुख्यमंत्र्यांसारखे, सुभाष देसाई, सुधीर मुनगंटीवार, इत्यादी बोटावर मोजण्या इतक्या नेत्यांसारखे…देवेंद्र निरागस दिसतात, मग त्यांचे त्यांच्या पक्षश्रेष्ठींकडे हट्टही रुसून बसणार्या बालकासारखेच असतात. फार विचार करणे नको, अगदी थेट सांगतो. गेले ७-८ महिने मग त्या विविध वाह्यात वाहिन्या असोत किंवा वृत्तपत्रे, आम्ही सोडून जो तो लिहून, बोंबलून मोकळा होतोय कि माजी मुख्यमंत्री नारायण राणे अमुक तमुक दिवशी भाजपा मध्ये जाताहेत…

एखाद्या मोठ्या नेत्याच्या बाबतीत या पक्षातून त्या पक्षात जाणे म्हणजे अंडरवेअर बदलण्याएवढे सोपे नसते कि हि ओली झाली का मग ती घाला किंवा हागवणीचा त्रास असतांना थोडे कुठे सावरल्या गेलो नाही म्हणजे थोडी जरी कुठे पिरपिर झाली कि लगेच आपण आतली चड्डी बदलून मोकळे होतो, पक्षांतर हे असे एवढे विशेषतः मोठ्या मान्यवर नामवंत नेत्यांना अमुक पक्षातून तमुक पक्षात जाणे, पक्षांतर सोपे नसते, अनेक स्थित्यंतरे आधी घडतात नंतर घडते ते एखाद्या नेत्याचे पक्षांतर,त्यामुळे ७/८ महिन्यांपूर्वीच जेव्हा नारायण राणे यांचे ठरले कि काँग्रेस सोडून भाजपा मध्ये जायचे तेव्हाच भाजपा मधल्या नेत्यांनीही त्यांचे हे पक्षांतर उचलून धरले विशेषतः भाजपामधले कोकणचे नेते शिक्षण मंत्री विनोद तावडे किंवा प्रभावी नेते नितीन गडकरींनी देखील, पण प्रसंगी पक्षश्रेष्ठींकडे म्हणजे थेट नरेंद्र मोदी किंवा अमित शाह यांच्याकडे हट्ट करून बसणार्या वरून त्यांचे लाडके ठरलेल्या देवेंद्र फडणवीसांच्या जोपर्यंत हे मनात नव्हते कि राणे यांना सामावून घ्यायचे आहे किंवा नाही, तोपर्यंत भाजपा मधल्या इतर कोणत्याही नेत्याची लुडबुड अजिबात महत्वाची ठरणारी नव्हती. विनोद तावडे यांचे मात्र एक बरे आहे त्या गडकरींसारखे म्हणजे ते आपली रेषा मोठी करण्यात अधिक रस घेतात त्यामुळे कोणेएकेकाळी नवख्या आशिष शेलारांना थेट मांडीला मांडी लावून बसवून घेतांना त्यांनी कधीही आपण हे चुकीचे करतो मानले नाही, आपला मित्र पुढे जातोय हे त्यांना अधिक भावायचे त्यामुळे राणेंच्या येण्याने आपले महत्व कमी होईल, त्यांनी हे असे मनाला कधीही लावून घेतले नसल्याची माझी माहिती आहे. उलट राणेंच्या येण्याने कोकणातली काहीशी कमकुवत भाजपा नक्की बळकट होऊ शकत त्यांनाही वाटते, शेवटी सारे शत्रू त्या शिवसेनेचे, त्यांचे साऱ्यांचे उद्देश सेम आहेत, थेट वरपासून म्हणजे नरेंद्र मोदींपासून तर नारायण राणे यांच्यापर्यंत, पण ते तितके सोपे नाही म्हणून जरी चेहरा केवळ निरागस बालकासारखा असला तर मुख्यमंत्र्यांचे निर्णय घेणे दूरदर्शी, विचाराअंती असते, उठसुठ काहीही करून मोकळे होणे त्यांना ते पसंत नसते, आवडत नाही…

त्यामुळे नारायण राणे यांना तूर्तास भाजपा मध्ये घेऊ नये हा त्यांचा हट्ट अगदी परवा परवा पर्यंत कायम होता, पण राजकारणात आज जे आहे ते उद्या नसते किंवा काल जे होते ते आज नसते त्यामुळे पक्षात आल्यानंतर नारायण राणे आपल्या पक्षाला काहीसे अडचणीचे ठरू शकतात असे मानणारे फडणवीस अलीकडे मात्र गोल गिरकी घेऊन थेट राणेंच्या शेजारी येऊन बसले आहेत आणि क्रेडिट गोज टू श्री नारायण राणे ओन्ली. त्यांनी अलीकडे मराठा मोर्च्याच्या संदर्भात घेतलेली अतिशय उघड कणखर भूमिका किंवा त्यांचे पार पडलेल्या पावसाळी अधिवेशनातले भाजपाला किंवा प्रसंगी मुख्यमंत्र्यांना सुखावणारे भाषणातून मांडलेले मुद्दे, माझा अभ्यास सांगतो, राणे हे आता थेट फडणवीसांच्या मनात हृदयात प्रवेश करून मोकळे झाले आहे, त्यामुळे त्यांचा भाजपा प्रवेशही नक्की झाला आहे, पुढल्या काही दिवसात हे नक्की घडणार आहे, राणे यांचे आता भाजपामध्ये आगमन निश्चित आहे, त्यांचा यशवंतराव चव्हाण अजिबात झालेला नाही…

अलीकडे सेनेतल्या कोकणातल्या एका ज्येष्ठ मंत्र्याकडे गप्पा मारीत बसलो होतो, राणेंचा भाजपा प्रवेश नक्की आहे त्यावर ते म्हणाले राणे चूक करताहेत, जे सहज शक्य होते त्यांच्या फायद्याचे होते ते त्यांनी करायला हवे होते, सेनेत यायला हवे होते. राणेंना म्हणावे ब्राम्हणांचा संघ भाजपा वरून जेवढा मवाळ वाटतो, आतून त्यांच्यासारखे खतरनाक मी बघितले नाहीत, गॉड बोलणारी माणसे तसेही अधिक खतरनाक असतात, मी म्हणालो, तुमचा या शेवटल्या वाक्यातला रोख माझ्यावर तर नाही, ते मनापासून हसले….

ते मंत्री जे म्हणाले, ते अधिक भावले, मनाला मनापासून पटले. राणे यांचे भाजपा मध्ये जाणे, का कोण जाणे पण काँग्रेस परवडली, मे बी, राणेंवर हे असे म्हणण्याची वेळ येऊ शकते. संघ भाजपा संस्कृती वेगळी आहे, ती जी वरकरणी दिसते, खोलवर मात्र त्यांची वर्किंग स्टाईल अतिशय वेगळ्या धाटणीची आहे, राणे आणि त्यांच्या दोन्ही चिरंजीवांना अतिशय थंड शांत डोक्याने भाजपा संघ नेमके कसे, आत्मसात 

करणे तसे खूप आवश्यक आहे. भाजपापेक्षा शिवसेना, प्रवेश आणि विचारसरणी, वरून राजकीय फायदे, नारायण राणे पुढल्या काही वर्षात तेथे अधिक शांत चित्ताने राजकीय निवृत्ती घेऊन मोकळे झाले असते आणि तेच वास्तव आहे….

आता एका अतिशय मुद्द्याकडे वळतो. अलीकडे या राज्यात भाजपाने जे काय मोठ्या प्रमाणावर इनकमिंग सुरु केले ठेवले आहे, मला हे काळात नाही, व्हाय इट्स सो स्पीडीली….? ज्या भागात पक्ष कमजोर आहे तेथे त्यांनी हे केले असते तर आपण समजू शकलो असतो पण विरोधातला नेता दिसतो छान, बोलतो छान, पैसेवाला आहे, अच्छा खासा दलाल आहे, पुढे पुढे करणारा आहे म्हणून कि काय अशांना घ्या सामावून असे जर सरसकट पोरकट धोरण त्यांनी आखले असेल, तर आपण त्यांच्या या भूमिकेवर हसत खेळात दाद देत मोकळे होऊ पण ते तसे घडतांना दिसत नाही. मुंबई विले पार्ले पूर्वेमध्ये भाजप चे पराग आळवणी जन्मल्यापासून तर आजतागायत संघात आणि भाजपात आहेत, मागल्या वेळी या कट्टर भाजपा नेत्याने त्याच्या ज्या प्रभावी विरोधकाचा म्हणजे काँग्रेस च्या ज्या कृष्णा हेगडे यांचा पराभव केला आणि आमदारकीला निवडून आले, अलीकडे त्याच कृष्णा हेगडे यांना भाजपामध्ये प्रवेश दिल्याने भाजपने त्यांच्याच कट्टर माणसाचे पंख कापले आहेत असे राहून राहून वाटते. जे पार्ल्यात घडले तेच सायन कोळीवाड्यात घडले म्हणजे भाजपाच्या ज्या तामीलसेल्वन यांनी राष्ट्रवादीच्या प्रसाद लाड यांचा विधानसभेला दणदणीत पराभव केला होता, त्याच प्रसाद लाड यांना भाजपा मध्ये प्रवेश देऊन नेमके काय साधले, कळत नाही, वरून भाजपाचा कट्टर आमदार मनातून व्यथित झालाय ते वेगळेच. तोच प्रकार तिकडे जळगाव जिल्ह्यातील अमळनेर विधानसभा मतदार संघात घडलाय. तेथे अपक्ष शिरीष चौधरी यांनी ज्या विद्यमान आमदार साहेबराव पाटील यांचा पराभव केला होता आणि विधान सभा निकाल बाहेर येताच ज्या शिरीष चौधरी यांनी कोणत्याही अटि न घालता भाजपाला पाठिंबा दिला, अलीकडे त्याच साहेबराव पाटीलांच्या नगराध्यक्ष पत्नीला भाजपा मध्ये प्रवेश देऊन शिरीष चौधरी यांचे आसन डळमळीत करून सोडले आहे. येथे आळवणी तामील सेल्वन किंवा शिरीष चौधरी माझे मित्र आहेत आणि लाड किंवा हेगडे किंवा साहेबराव पाटील माझे शत्रू आहेत, मला त्यांच्याविषयी राजकीय असूया आहे असे अजिबात नाही,कोणीही सत्तेत असले आणि कोणीही विरोधात बसले, पत्रकार म्हणून आम्हाला 

त्यात काहीही घेणे देणे नसते, पण हे असे विचित्र इनकमिंग भाजपामध्ये का सुरु झाले आहे, मोठे अवघड असे हे कोडे आहे….

तूर्त एवढेच !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *