लेखा जोखा सरत्या सरकारचा : पत्रकार हेमंत जोशी

लेखा जोखा सरत्या सरकारचा : पत्रकार हेमंत जोशी 

वयाच्या विसाव्या वर्षांपासून या राज्याचा कारभार मी अतिशय म्हणजे अतिशय जवळून बघत आलोय, जी बोटावर मोजण्याइतकी माणसे हे राज्य हाकतात, चालवतात, घडामोडी घडवून आणण्यात आघाडीवर असतात, अशा सर्व मंडळींना मग त्यात आमदार, खासदार, विविध पुढारी, आजवरचे मंत्री व मुख्यमंत्री, शासकीय प्रशासकीय अधिकारी, दलाल, पत्रकार, कंत्राटदार, समाजसेवक, व्यापारी, उद्योगपती,इत्यादी प्रामुख्याने हे राज्य ज्यांच्या ताब्यात असते त्या सर्वांना जवळून बघत आलोय, त्याचवेळी सर्वसामान्य मराठी माणसांशी ते जगात जेथे जेथे म्हणून भेटतील त्या सर्वांशी सतत चर्चा करीत आलोय, कधी गर्व म्हणून केला नाही कारण गर्व करण्यासारखे देवाने आम्हा बहीण भावन्डात नेमके माझ्याकडे फारसे काही वाट्याला दिले नव्हते पण जे दिले ते सहन करीत करीत प्रगती साधण्याचा प्रयत्न केला…


परदेशातल्या उच्चशिक्षित चंद्रू आचार्य सारख्या मित्रांशी गप्पा मारतांना त्यांच्याकडून हे राज्य नेमके समजावून घेत असतांना त्याचवेळी माझा एखादा मित्र साधा वॉचमन जरी असला तरी न लाजता त्याच्याकडून आजवर विविध विषयांची माहिती करून घेत आलो, त्यातून हे लक्षात आले कि महाराष्ट्राची धुरा नेमकी कोणत्या वृत्ताच्या लोकांच्या हाती असायला हवी, त्यातून मग जेथे चुकीची माणसे आढळली अजिबात न घाबरता, कुठेही विचलित न होता लिहीत आलो, राहिलो. चांगली कामें करून देखील पैसे खाता येतात, पैसे मिळविता येतात हे सांगत आलो पण वर उल्लेख केलेल्या फार कमी मंडळींच्या ते लक्षात आले. दोन हजार शतकाच्या सुरुवातीला ‘तेही शरद पवार मुख्यमंत्री ‘ असतांना एक ग्रामीण नेता या राज्याचे मंत्री म्हणून चित्र पालटतो हे असे आजवर फार कमी लोकांनी या राज्यासाठी केले…


दिवंगत आर आर पाटील या राज्याचे ग्रामविकास मंत्री झाले आणि केवळ पाच वर्षात त्यांनी त्या खात्याचा चेहरा मोहरा बदलवून टाकला, हे या पंकजा मुंडे किंवा त्या त्या वेळेच्या ग्रामविकास मंत्र्यांना का हो करता आले नाही, पैसे काय थोडे कमी जास्त, कोठेही खाता आले असते, नालायक आणि हरामखोर राज्यबुडवे मंत्री कोठले. परवा मला कोणीतरी म्हणालेही कि फडणवीसांची सतत जरा अधिकच तारीफ मिस्टर जोशी तुमच्याकडून होते. अहो, करणार काय, तोच एकमेव नेता आता या राज्यात नजरेसमोर दिसतोय जो हाती सोटा घेऊन अनेकांकडून विकासाची कामें करवून घेतोय. त्याला अपेक्षाविरहित सहकार्य करायलाच हवे. जे सहकार्य आर आर आबा ग्रामविकास खाते मंत्री असतांना मी त्यांना करीत असे. ग्रामविकासाचा चेहरामोहराच त्यांनी चंद्रकांत दळवी यांच्यासारख्या मूठभर अधिकाऱ्यांना हाताशी घेऊन बदलवून टाकला होता, म्हणून सांगत आलोय, ते एकमेव असे जे स्वर्गात असतील त्या बाळासाहेब ठाकरे त्यांच्यासारखे, इतर अनेक मेले, मरतील पण केवळ नरकात सडत असतील…


अलीकडे यावेळी जून महिन्यात जेव्हा अमेरिकेत गेलो होतो तेव्हा मुद्दाम न्यूयॉर्क मध्ये ३-४ दिवस थेट टाइम स्क्वेअरला थांबलो, एका हॉटेलात उतरलो. एका रात्री मुख्य टाइमस्क्वेअरच्या भर चौकात जगात जो सर्वाधिक खपाचा आणि बघितल्या जाणारा हलत्या जाहिरातीचा फलक आहे ज्याचे बुकिंग किमान पाच वर्षे आधी करावे लागते तो बघत असतांना एका मोठ्या जाहिरातींकडे लक्ष गेले आणि मला आधी अभिमान वाटला नंतर माझीच मला लाज वाटली. मित्रांनो, वाचकांनो, त्या फलकावर केरळ राज्याच्या टुरिझम खात्याची टुरिझमची भव्य अशी जाहिरात दाखविण्यात येत होती. हे असे महाराष्ट्र केरळ पेक्षा टुरिझमच्या बाबतीत कितीतरी पुढे जाऊ शकत असतांना रावल आडनावाच्या राज्याच्या टुरिझम मंत्र्याला किंवा आधीच्या जयदत्त क्षीरसागर सारख्या मंत्र्यांना का हो करता आले नाही, मिळतील तेथून केवळ पैसे लुटायचे एवढेच या आजवरच्या नालायक मंत्र्यांचे उद्दिष्ट, मग कसा हो पर्यटनातून जनतेचा विकास साधणे शक्य होईल ? एकट्या फडणवीसांनी कोठे कोठे लक्ष घालावे, कधीतरी गिरीश महाजन देखील व्हावे ज्या महाजन यांनी या राज्यातले करोडो गोरगरीब शासनाच्या पैशांचा योग्य वापर करून रोगमुक्त केले. गिरीश महाजन यांची मंत्री म्हणून रुग्णसेवा, त्यावर एक कादंबरी लिहिता येईल. मग का म्हणून महाजन यांना खान्देशच्या जनतेने डोक्यावर उचलून घेऊ नये जे खडसे यांना अगदी सहज जमले असते…


त्या देवेंद्र फडणवीसांची तर थेट द्रौपदी करून ठेवली आहे. सारे काही त्यांना बघावे लागते. लक्ष घातले नाही तर मंत्र्यांनी त्या त्या योजनांची पैसे खाऊन वाट लावलेली असते. देवेंद्र म्हणजे आधुनिक द्रौपदी, भीम पप्पी घेऊन गेला कि लगेच अर्जुन हजार. येतो आणि कडेवर उचलून घेतो, अर्जुन गेला कि लगेच नकुल नाचवायला येतो, तो जात नाही तो सहदेव येऊन वाकुल्या दाखवतो, शेवटी धर्मराज देखील सोडत नाही, हे असे फडणवीसांचे द्रौपदीसारखे म्हणजे एकाचवेळी अनेक पती असलेल्या बायकोसारखे झालेले आहे, ज्या फडणवीसांना पुढे त्यांचे योग्य चांगले आरोग्य ठेवून राज्यातल्या जनतेला देशाची मोठी सेवा करण्यासाठी केंद्रात पाठवायचे आहे. सहकारी मंत्र्यांनी देखील जबाबदारीने वागून आम्ही देखील कसे फडणवीसांच्या विचारांचे, लोकांना केवळ विकास कामातून दाखवून दिले पाहिजे…

पत्रकार हेमंत जोशी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *