राजकीय वजाबाकी पवार एकाकी : पत्रकार हेमंत जोशी

राजकीय वजाबाकी पवार एकाकी : पत्रकार हेमंत जोशी 

आज आणि डॉ काशिनाथ घाणेकर आठवले. त्यांना दारूच्या व्यसनाने संपवले, पवारांनाही राजकारणातले गलिच्छ घाणेरडे व्यसन भोवले. पवारांना आता सारे सोडून गेले, उरले सुरले चार दोन थांबा आणि वाट पहा पद्धतीने थांबले आहेत,अन्यथा उरले सुरले भुजबळ किंवा तत्सम देखील भुर्रकन उडून जाण्यातलेच. अक्ख्या घनदाट जंगलात स्वतः सेनापती तेही चार दोन सुप्रिया यांच्यासारख्या हाती तलवार नसलेल्या कृश सैनिकांना घेऊन दमलेला थकलेला सेनापती काही आशा अपेक्षा मनाशी बाळगून भटकतो आहे समोर ताकदवान वाघ सिंह, पवारांचे हे असे गलितगात्र जगणे त्यांना स्वतःलाच अवघड होऊन बसले आहे, लोकांची सिम्पथी मिळेल, चमत्कार घडेल पवारांचा देखील इंदिरा गांधी होईल म्हणजे तेही फिनिक्स सारखी पुन्हा एकवार भरारी घेतील असे आजतरी दूरदूरपर्यंत दिसत नाही, पवारांचे विरोधक निवडणुकीच्या रणांगणावर पांडवांच्या रूपात वावरताहेत त्याच वेळी पवार आणि त्यांचे साथीदार जनतेशी कौरवांसारखे वागले, प्रत्येकाच्या मनात निदान आजतरी हि अशीच भावना आहे…


एकदा मी वांद्र्याच्या ताज लँड्स हॉटेल च्या पोर्च मध्ये कार येण्याची वाट पाहत होतो, शेजारी असलेल्या हॉलच्या पायरीवर राजेश खन्ना अक्षरश: एकटा बसलेला मी त्यादिवशी बघितला, कोणे एके काळी केवढी ती सभोवताली गर्दी, त्यादिवशी तो एकटाच तेही पायरीवर बसून कोणाची तरी वाट पाहणारा राजेश खन्ना, शरद पवार हे देखील अगदी आत्ता आत्तापर्यंत राजकारणातले सुपरस्टार होते आज त्यांचाही राजेश खन्ना झाला आहे, वाईट वाटते खरे पण जे घडले त्यात पवारांची स्वतःची मोठी चूक आहे जी ते आज देखील मान्य करायला ते तयार नाहीत, मला लोकांचे शिव्याशाप भोवले कबूल करायला तयार नाहीत. मी आणि माझ्या लबाड हरामखोर लफंग्या भ्रष्ट देशद्रोही हलकट नेत्यांनी साथीदारांनी या देशाला विशेष म्हणजे या राज्याला लूट लूट लुटले पवार मान्य करायला तयार नाही, पवारांवर ज्या मतदारांनी एकेकाळी अतोनात प्रेम केले तेच आता त्यांच्यापासून दूर झाले कारण आपण कसे वापरल्या जातो, लोकांच्या कार्यकर्त्यांच्या ते उशिरा का होईना लक्षात आले…


www.vikrantjoshi.com


अत्यंत महत्वाचा मुद्दा असा कि इंदिरा गांधी यांनी केलेल्या घोडचूक त्यांच्या लक्षात आल्या त्यानंतर त्या इतर नेत्यांच्या नव्हे तर लोकांना शरण गेल्या आणि पुन्हा सत्तेवर आल्या मात्र तोपर्यंत भाजपा स्ट्रॉंग झालेली होती, कायमस्वरूपी एका मोठ्या विरोधकांचा जन्म झाला होता ज्याची परिणीती आज पुन्हा एकवार पाहायला मिळते आहे, इंदिरेच्या घरातले पक्षातले सारे संपले आहेत आणि भाजपाचे मोदी मोठ्या दिमाखात सत्तेवर आले आहेत. शरद पवार आणि इंदिरा गांधी यांच्यात एक साम्य घडू शकते पण त्यासाठी पवारांनी होय मी चुकलो लोकांसमोर येऊन मोठ्या मनाने सांगणे गरजेचे आहे, त्यांनी चूक कबूल केली तर पुन्हा ते एकवार राजकारणात भरारी घेऊ शकतील पण त्यांचेही ते तसेच, येथे या राज्यातही नेमका भाजपा प्रभावी 

ठरलेला आहे….

एखाद्या पक्षाला प्रचंड भगदाड हे या राज्यात पहिल्यांदा घडलेले नाही. एकेकाळी शहरी आणि ग्रामीण भागात अनेक काँग्रेस नेत्यांची मुले बंड करून बाहेर पडले थेट शिवसेनेत गेले पुढे शिवसेना वाढली आणि सत्तेत देखील आली पण काँग्रेस संपली नाही. काही वर्षानंतर याच शिवसेनेला गळती लागली आणि ज्यांनी ठाकरे यांच्या खांद्याला खांदा लावून सेना उभी केली होती ते सारेच्या सारे ठाकरे यांना सोडून थेट त्यावेळेच्या काँग्रेस मध्ये दाखल झाले, बहुतेक त्यातले पवारांच्याच वळचणीला लागले. त्यातून काँग्रेस वाढली, राष्ट्रवादी जन्माला आली पण शिवसेना संपली का, अजिबात नाही उलट पूर्वीपेक्षा मोठ्या संख्यने मोठ्या अधिक ताकदीने जोमाने वाढली. आज हेच पुन्हा घडले आहे, घडते आहे म्हणजे पवारांना सारे सोडून गेले म्हणजे पवारांचे राजकारण आता सारे संपले असे होणार नाही असे होत नाही पण त्यासाठी शरद पवारांनी लोकांच्या मनातले त्यांच्याविषयी जे वाईट मत आहे ते कृतीतून काढले पाहिजे, ते पवार करतील का, शंका आहे, त्यामुळे पवारांचा राजकारणात त्यांच्याचसमोर अस्त होऊ शकतो, पण पवारांना सांगावे कोणी, एखादा सांगायला गेला तर तोच अपमानित होऊन बाहेर पडेल, पवारांना आम्ही सांगणे म्हणजे आसाराम बापूंना सेक्स कसा करतात, शिकण्यासारखे आहे किंवा आशा भोसले यांना घरी जाऊन महेश मांजरेकर यांनी गाणे शिकवण्यासारखे आहे. त्यांनीच नेमके निर्णय घ्यावेत, अन्यथा पुढली वाट नक्की मोठी बिकट आहे…


पाणी नाकातोंडात जायला लागले कि माकडीण जशी पोटच्या पिलाच्या पाठीवर चढून स्वतःचा जीव वाचविण्याचा प्रयत्न करते हुबेहूब पवारांना किंवा काँग्रेसला सोडून गेलेल्यांचे होते आहे, झाले आहे. पाप कमाई वाचविणे आणि त्यातून स्वतः वाचणे हेच आज बाहेर पडलेल्यांचे प्रमुख उद्दिष्ट आहे, सर सलामत तो पगडी पचास पद्धतीने त्यांनी पवारांपासून किंवा काँग्रेस मधून विभक्त होतांना मनाशी ठरविले आहे, पुढचे पुढे बघू आधी तुरुंगात जाण्याचे टाळू, हेच सेना किंवा भाजपा मध्ये आलेल्यांच्या मनात आहे जे अत्यंत सीझन्ड फडणवीसांच्या लक्षात आलेले नाही असे का तुम्हाला वाटते आहे, तसे अजिबात नाही, त्यांच्याकडे आलेले नेते त्यांना काय वापरून घेतील नंतर पुन्हा सोडून जातील, अहो, फडणवीस आहेत ते, त्यांना यापुढे बेवकूफ बनविणे पक्षांतर केलेल्यांना वाटते तेवढे सोपे नाही…

तूर्त एवढेच : हेमंत जोशी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *