मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती : पत्रकार हेमंत जोशी



मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती : पत्रकार हेमंत जोशी 

जत्रेत कमावलं आणि तमाशात गमावलं तसे शिवसेना नेते आणि माजी मंत्री दिवाकर रावते यांच्या बाबतीत घडले आहे. शिवसेना घडविण्यात वाढविण्यात जोपासण्यात कठीण प्रसंगी शिवसेना सांभाळण्यात दिवाकर  रावते यांचा मोठा वाटा किंबहुना सिंहाचा वाटा. पण ज्या दिवाकर रावते यांनी जत्रेत कमावलं म्हणजे नेता म्हणून नाव जोपासलं राखलं होतं त्याच रावते यांचे नाव मंत्री झाल्यानंतर शिवसेना वर्तुळात बऱ्यापैकी रसातळाला गेल्याचे मला जाणवते आहे त्याची  नेमकी कारणे आणि पुरावे देखील मला ठाऊक आहेत पण रावते माझ्या राज्यातल्या आवडीच्या नेत्यांपैकी एक, त्यामुळे मागल्या पाच वर्षात विशेषतः परिवहन महामंडळाचे परिवहन खात्याचे जे बारा वाजले त्यावर मला सारे काही तंतोतंत माहित असतांना ठाऊक असतांना मी लिहिणार नाही आणि तसेही साऱ्यांचे सारेच दोष लिहिण्याचा मी काही ठेका घेतला नाही. पण ज्या दिवाकर रावते यांना अगदी सुरुवातीला म्हणजे ते मंत्री झाल्यानंतर मी निक्षून सांगितले होते कि सुधीर तुंगार नावाच्या सहकार खात्यातील भ्रष्ट व बदमाश अधिकाऱ्याला तुम्ही दूर ठेवा, रावते यांनी माझे ऐकले नाही आणि थेट सतत पाच वर्षे याच तुंगार यांनी रावते यांना हाताशी धरून परिवहन खात्याची तसेच दिवाकर रावते यांच्या राजकीय वाटचालीची वाट लावली, नशीब माझ्यासारखे रावते यांचे मित्र असल्याने त्यांची परिवहन खात्यातली प्रकरणे अद्याप बाहेर आलेली नाहीत. सुधीर तुंगार अत्यंत बुद्धिमान अधिकारी तो रावते यांचा खाजगी सचिव म्हणून सहजासहजी हाती सापडणे तसे कठीण काम होते पण सतत पाच वर्षे कोणीतरी चिडलेला रावतेप्रेमी तुंगार वर बारीक नजर ठेऊन होता त्यातूनच मला तेथल्या अनेक भानगडींचा नेमका उलगडा मला झाला आहे…

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीची वाट लावण्यात जी दोन नावे प्रामुख्याने घेतली जातील त्यातले एक शशिकांत शिंदे आणि दुसरे नाव प्रामुख्याने सुधीर तुंगार यांचेच घेतल्या जाईल. तसे बोरीकर, पहिनकर असे अनेक सहकार खात्यातले आणखी काही नावे मी टप्प्याटप्प्याने नक्की घेणार आहे पण जे सुधीर तुंगार आता थेट मिलिंद नार्वेकर यांना हाताशी धरून सिडको मध्ये महत्वाचे पोस्टिंग घेण्यासाठी धडपडताहेत अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांना विशेषतः उद्धव ठाकरे यांनी दूर ठेवलेले बरे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शशिकांत शिंदे आणि गॅंग ने जो हैदोस मागल्या अनेक वर्षांपासून घातला आहे तो डोक्याला झिणझिण्या आणणारा आहे. आणि या भ्रष्टाचाराविरुद्ध जे दोघे अगदी मनापासून लढा देताहेत त्यातले एक कोकणातले प्रभु पाटील आडनावाचे सद्गृहस्थ शशिकांत शिंदे आणि गँगच्या दुर्दैवाने अलीकडे झालेल्या त्यांच्या निवडणुकीत पुन्हा एकवार तेथे निवडून आले आहेत. प्रभू पाटील यांनी वास्तविक कमालीचे सावध असावे कारण कृषी उत्पन्न बाजार समिती मधल्या भ्रष्टाचारी संचालकांना आणि अधिकाऱ्यांना जाब विचारणाऱ्याला प्रसंगी खुनाची थेट धमकी दिल्या जाते किंवा प्रसंगी एखाद्याचा खून देखील होतो आणि अशा खुन्यांची मला कधीही भीती वाटत नसल्याने मी तर ठरविले आहे कि मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भानगडी प्रसंगी ईडी किंवा आयकर खात्याला कळवून मोकळे व्हायचे वरून त्यांना ऍक्शन घेण्यास भाग पाडायचे…

www.vikrantjoshi.com

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधल्या अनेक भ्रष्ट हलकट थर्डग्रेड संचालकांविरुद्ध अधिकारी व कर्मचाऱ्यांविरुद्ध सतत लढा देणाऱ्या ऍडव्होकेट संतोष यादव यांचाही येथे प्रामुख्याने मला उल्लेख करावा लागेल. संतोष यादव यांचा इतिहास त्यांचे आजतागायतचे तारुण्य आणि बेधडक लढा हा एखाद्या चित्रपटातल्या हिरोसारखा आहे. संतोष लहान असतांना त्यांच्या कुटुंबाचे तेथे एक उपहार गृह होते विशेष म्हणजे तेच त्यांच्या वडिलांच्या काकांच्या एकत्रित कुटुंबाचे उदरनिर्वाहाचे साधन होते, दुर्दैवाने शशिकांत शिंदे यांच्यासारख्या काही अपप्रवृत्तीनी यादव आणि कुटुंबाला सतत त्रास देऊन शेवटी ते उपहार गृह यादवांना बंद करावे लागल्यानंतर संतोष यादव यांनी वयाच्या ३४ व्या वर्षी कायद्याचा अभ्यास केला आणि ते वकील झाले, त्यांनी मग मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचा सखोल अभ्यास केला तेथल्या नेमक्या घडणाऱ्या भानगडींचा अभ्यास केला आणि आता धाडसी संतोष यादव या अशा हलकट अधिकारी कर्मचारी आणि संचालकांविरुद्ध एकाकी न घाबरता हिम्मत न हरता सतत लढा ते देताहेत. असे एक ना अनेक किस्से, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीची प्रकरणे वरपर्यंत धसास लावणे नितांत गरजेचे आहे, आवश्यक आहे…

क्रमश: हेमंत जोशी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *