स्वाभिमानी संघटना आणि हिरवे हिरवे दिसे नेत्यांना १: पत्रकार हेमंत जोशी

कामगार श्रीमंत झाला किंवा नाही मला फारसे त्यातले ठाऊक नाही कारण मंत्रालयात किंवा कुठल्याही मोक्याच्या कमाईच्या ठिकाणी 

मला कामगार कधीही दिसला नाही, दिसत नाही त्यामुळे या राज्यात कामगार गरीब कि श्रीमंत, मला नेमके सांगता येणार नाही पण याच कामगारांचे नेते मात्र नक्की कामगारांच्या भरवशावर श्रीमंत झाले  असावेत, आहेत हे मी ठामपणे सांगू शकतो कारण विजय चौगुले, 

सचिन अहिर, दिवंगत बाबुराव रामिष्टे, भाई जगताप, विजय कांबळे, शशिकांत शिंदे, सुर्यकांत महाडिक, दिवंगत अशोक पोहेकर, दिवंगत गुलाब जोशी इत्यादी बहुसंख्य कामगार नेत्यांना मी ते श्रीमंत होत गेले, बघत आलोय. भाई जगताप यांची गाठ जशी नेहमी पंचतारांकित हॉटेल मध्ये कामगारांसोबत नव्हे तर विविध व्यावसायिकांबरोबर ते गप्पा मारतांना किंवा तेथील पदार्थांवर ते ताव मारतांना पडते तशी माझी जेव्हा केव्हा शेतकऱ्यांचा पुळका असलेले नेते खासदार राजू शेट्टी यांच्याशी देखील चार पाच वेळा गाठ पडली ती पंचतारांकित हॉटेल मध्येच….एक मात्र नक्की कामगार श्रीमंत झालेत किंवा नाही मला माहित नाही पण मी स्वत: एक शेतकरी असल्याने हमखास सांगू शकतो कि ज्यांचे कुटुंब केवळ शेतीवर अवलंबून आहे तो शेतकरी मात्र अजिबात श्रीमंत नाही, माझ्यासारखे काही पूरक उत्पन्न आहे म्हणून दोन घास व्यवस्थित खातात पण आमच्या विदर्भात ज्यांच्याकडे २५-३० एकर शेती आहे तो देखील दोन वेळेचे पोटभर अन्न मिळेल किंवा नाही या चिंतेत असतो. मधला १९९५ ते २००० हा कालावधी सोडल्यास १९९० ते २०१५ या दरम्यान राज्याचे सिंचन खाते फक्त आणि फक्त आपल्या हक्काच्या माणसाच्या हाती कसे असेल हेच शरद पवार यांनी बघितले आणि कायम हे खाते या राज्यातल्या अतिशय भ्रष्ट ठरलेल्या उजव्या डाव्या हात समजल्या जाणार्या नेत्यांच्या मंत्र्यांच्या हाती पवार यांनी हे अत्यंत महत्वाचे असे सिंचन खाते सोपविले मग ते अनेक वर्षे अजित पवार आणि त्यांचे मेव्हणे डॉ. पद्मसिंह पाटील किंवा अजितदादा यांचा पेंद्या सुनील तटकरे किंवा शरद पवार यांचा सांगकाम्या भारत बोंद्रे यांच्याकडे होते, अर्थात १९९५ च्या दरम्यान युतीकडे सत्ता असतांना या खात्याची जबाबदारी ज्या महादेव शिवणकर यांच्याकडे होती त्यांनी किंवा तद्नंतर अल्पकाळ ज्यांच्याकडे या खात्याची जबाबदारी ज्या एकनाथ खडसे यांच्याकडे आली होती त्यांनी किंवा गेल्या वर्षभरापासून श्रीमान गिरीश महाजन यांनी हे बुडीत असे सिंचन खाते भरभराटीला आणले असे अजिबात नाही, गिरीश महाजन अद्याप बदनाम व्हायचे आहेत पण महादेव शिवणकर यांनी त्यांच्याकडे असलेल्या याच सिंचन खात्यात घोटाळे केले म्हणून त्यांच्याकडून हे खाते काढून घेण्यात आले होते, एकनाथ खडसे तद्नंतर सिंचन खात्याचे मंत्री झाले. मी वर्सोव्यात राहत असतांना आमच्या समोरच्या इमारतीत आठवीत शिकणारी एक अत्यंत देखणी, उफडी हिंदू मुलगी राहत होती, एक दिवस कुठल्याशा कारणाने तिचे आईवडिलांशी भांडण झाले म्हणून ती जुहु समुद्र किनारी रडत बसली. तिची 

हि अवस्था नेमकी एका दलालाने हेरली आणि तिला फूस लावून, या अत्यंत खानदानी, सुस्वरूप मुलीला त्याच्या घरी नेउन डांबूनठेवले आणि पुढल्या चार पाच दिवसात त्याने त्या मुलीला पाकिस्थानात विकले, या मुलीचा बाप सैरावैरा झाला, तो एयर इंडियात मोठ्या हुद्द्यावर होता, सतत चौदा वर्षे पोटच्या पोरीला वेड्यासारखा जगभर शोधत होता, आम्ही त्याच्या पाठीशी होतो, शेवटी चौदा वर्षानंतर ती मुलगी स्वत:च मोठ्या खुबीने भारतात परतली पण तेव्हा तिच्या आयुष्याचा पार चुराडा झाला होता, तिचे तीन वेगवेगळ्या पुरुषांशी विवाह उरकले होते आणि त्यांच्यापासून तिला दोन तीन मुले होती. एका अत्यंत देखण्या मुलीची जशी त्या पाकिस्थान्यांनी वाट लावली ते तसेच या राज्यातल्या सुंदर अशा सिंचन खात्याची पवार गटातल्या नेत्यांनी, मंत्र्यांनी, ठेकेदारांनी पुरती वाट लावून ठेवली, १९९० 

नंतर झालेल्या सार्याच्या सार्या सिंचन खात्याच्या मंत्र्यांनी या खात्याकडे केवळ वेश्या म्हणून बघितले, एखाद्या सुंदर दिसणाऱ्या वेश्येच्या शरीराचा जसा चोथडा विकृतीने पछाडलेले ग्राहक करून ठेवतात ते तसेच सिंचन खात्याचे बारा वाजविण्याचे काम हे खाते ज्या ज्या 

म्हणून मंत्र्यांकडे होते त्यांनी या खात्यातील विशेषत: अभियंत्यांना आणि सचिवांना हाताशी धरून केले, एकही मंत्री धुतल्या तांदळासारखा नव्हता आणि शरद पवार यांच्या माणसांनी तर या खात्याची नागपुरातलीफार गंगा जमना करून ठेवली…..

या लेखाचा विषय आहे, वाहिनीत काम करणारा गोडबोल्या मंगेश चिवटे,त्याचा भाऊ, राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत आणि त्यांनी वेठीस धरलेली शेतकरी संघटना, सत्य पुढल्या भागात….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *