संघ आणि भाजपा २ : पत्रकार हेमंत जोशी

संघ आणि भाजपा २ : पत्रकार हेमंत जोशी 

स्त्रिया मोठ्या प्रमाणावर बाहेर पडायला लागल्यानंतर, नोकरी व्यवसाय करू लागल्यानंतर, हि जाऊन जाऊन जाणार कुठे, हे आम्हा पुरुषांनी गृहीत धरणे बंद केले विशेषतः शहरांमधून फार मोठ्या प्रमाणावर वाढलेले घटस्फोटाचे प्रमाण, थोडक्यत स्त्रियांना जसे अंडर-एस्टीमेट करणे आम्ही पुरुषांनी बऱ्यापैकी सोडून दिलेले आहे ते तसेच एकदा रा. स्व. संघातल्या बाजूला पाडलेल्या, टाकलेल्या, दुर्लक्षिलेल्या स्वयंसेवकांच्या बाबतीत देखील घडावे असे जर कट्टर स्वयंसेवकांना वाटत असेल तर त्यांनीही हि अशी एखादी कठोर कणखर भूमिका घेऊन निर्ढावलेल्या सत्तेतल्या मंडळींना झटका दाखविणे आवश्यक आहे. आपले अख्खे आयुष्य रा. स्व. संघासाठी वाहून घेतलेल्या स्वयंसेवकांच्या बाबतीत हे भाजपा संघामधल्या किंवा बाहेरून भाजपा मध्ये आलेल्या नेत्यांना तंतोतंत माहित असते कि काहीही झाले आणि कितीही अन्याय केला झाला तरी कोणताही कट्टर संघ स्वयंसेवक संघ सोडून जात नाही नेमका त्याच्या याच कट्टर बांधिलकेचा फार मोठा गैरफायदा संघ भाजपामधल्या संधिसाधूंनी घेतला आणि याची सुरुवात मुंडे महाजनांनी केली….


थोडेसे विषयांतर करतो, माझ्या ओळखीतल्या घटस्फोट झालेल्या दोन घटना येथे मांडतो, दोन्हीही ठिकाणी घटस्फोट घेण्याचे कारण जरासे वेगळे असले तरी मूळ संदर्भ सेम टू सेम होते, असे मला वाटते. एका स्त्रीने नवऱ्यापासून घटस्फोट यासाठी घेतला कि तिच्या नवर्याच्या तोंडाचा सतत घाणेरडा वास येत असे, आपल्या तोंडाचा घाणेरडा वास येतो हे आपल्याला चांगले कळत असते आणि तोंडाचा घाण वास येऊ न देणे आपल्याला अगदी सहज शक्य असूनही आपण त्याकडे केवळ विकृती म्हणून दुर्लक्ष करतो असे मला वाटते. मुळात त्या माणसाच्या तोंडाला सतत घाण वास येत असूनही वरून त्याला सिगारेट ओढणे आणि दारू पिणे, या दोन्हीही सवयी होत्या, रोमान्स करायला मनापासून आवडत असूनही जर त्या पुरुषाच्या तोंडाला जर कायम दुर्गंधी येत असेल मग का म्हणून त्या स्त्रीने हा दररोजचा किंवा दरक्षणी जाणवणारा त्रास सहन करावा, कोणताही रोमांस तोंडाशिवाय, ओठांशिवाय 

शक्य नाही, त्याला वारंवार सांगून देखील उपयोग झाला नाही शेवटी त्या देखण्या स्त्रीने हा कठोर निर्णय घेतला, मला वाटते पुढे तिने आधी तोंडाचा वास घेऊनच दुसरे लग्न केले असावे….


एका घटस्फोट प्रकरणी तर मीच मध्यस्थी करून तो होऊ न देण्याचे आटोकाट प्रयत्न केले पण ते जमले नाही आणि येथेही तेच, ते दोघेही उच्चशिक्षित अत्यंत देखणे, जोड्याला जोडा पण त्यांचे लग्न यासाठी टिकले नाही कि त्या स्त्रीच्या ज्या मुख्य अवयवाशी पुरुषाचा वारंवार संबंध येतो, अंतर्वस्त्र काढल्यानंतर त्यातून येणारी दुर्गंधी, तो तिचा नवरा मला म्हणाला, मी अगदी हात जोडून सांगूनही तिने त्याकडे दुर्लक्ष केले, मला वाटते ती डॉक्टरांचा सल्ला घेण्यात कमी पाडली, तो पुरुष मला म्हणला, आमच्या लग्नांनंतर असे एक दिवस देखील घडले नाही ज्यादिवशी मला वांती झाली नाही, फार वाईट वाटले, ते दोघे वेगळे झाले, मला वाटते असे अनेकांच्या बाबतीत घडत असावे, पुरुष किंवा स्त्री, दोघांपैकी कोणाच्याही शरीरातून येणारी दुर्गंधी त्यातल्या एकाने का म्हणून सहन करावी,महत्वाचे म्हणजे शारीरिक दुर्गंधी घालविणे अगदी सहज शक्य असूनही, नवरा बायको दोघांपैकी एकाने का म्हणून हे असे विकृत अत्याचार सहन करावेत. विशेष म्हणजे सिगारेट तंबाखू दारू इत्यादींचे व्यसन असलेल्या नवऱ्यांच्या सोबतीने संसार करणाऱ्या स्त्रियांची मनापासून किंवा करावीशी वाटे. दोघेही बेवडे असतील किंवा सिगारेट ओढणारे असतील तर ठीक अन्यथा जिवंतपणी नरक अनुभवणे त्या स्त्रियांच्या नशिबी असते म्हणजे त्यांना त्यावेळी हेच वाटत असावे कि आपण अक्षरश: संडासमध्ये तोंड घालून सेक्स अनुभवतोय…..


मला हे नेहमीच जाणवत आलेले आहे कि रा. स्व. संघ हे या देशातल्या अत्यंत बुद्धिमान हिंदूंनी केवळ हिंदू धर्माच्या रक्षणासाठी आणि धर्मांतर होऊ न देण्यासाठी उभारलेले हे प्रभावी संघटन आहे, त्यातही काही दोष आहेतच पण त्या दोषांकडे दुर्लक्ष यासाठी 

करणे गरजेचे आहे कि अल्पमतात येणार हिंदुत्व वाढले पाहिजे आणि हिंदुत्व संघटित देखील नक्कीच राहायला पाहिजे. इस्लाम नव्हे हिंदुत्व खतरेमे आहे. सुरुवातीला असे वाटायचे कि शाखा म्हणजे संघ पण हे संघवाल्यांनी १९९० नंतर झपाट्याने मोडीत काढले किंवा त्यांच्याही ते लक्षात आले कि केवळ शाखा चालविणे एवढेच जर संघाचे काम दिसले तर संघ आणि संघाशी संबंधित फांद्या वडाच्या झाडासारख्या वाढणे आणि खोलवर रुजणे अशक्य आहे. त्यांनी सुरुवात चांगली केली म्हणजे संघ हा केवळ फक्त ब्राम्हणांचा, हा डाग त्यांनी योजनाबद्ध आधी पुसून काढला, संघाचा विस्तार केला, जगभरात संघ प्रचारक पाठवून हिंदूंना संघाच्या भगव्याखाली आधी एकत्र आणले नंतर त्यांची कुवत ताकद ओळखून त्यांना विविध प्रांतात मोठे केले. संघ परिवारातल्या संस्था मोठ्या केल्या. जनसंघाचे नामांतर भारतीय जनता पक्ष करून त्याला काँग्रेस शी स्पर्धा करू शकेल या पद्धतीने अहोरात्र अक्षरश: सुरुवातीला पै पै जमा करून मोठे केले…

अपूर्ण :


पत्रकार हेमंत जोशी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *