अवधूत नावाचा वाघ : पत्रकार हेमंत जोशी

अवधूत नावाचा वाघ : पत्रकार हेमंत जोशी 

एक मंत्री होते ते शिक्षण सम्राट होते तेच शिक्षण मंत्रीही होते. एकदा मी त्यांना म्हणालो, ज्यांनी अमुक एखाद्या विषयात डॉक्टरेट मिळविलेली आहे, त्या विषयाशी संबंधित जर तज्ज्ञांनी त्यांच्याशी जाहीर चर्चा केली तर मला वाटते या राज्यातल्या बहुसंख्य बहुतांश लोकांची डॉक्टरेट सरकार हिसकावून घेईल, किंवा असे बोगस पदवीधारक स्वतःच हात वर करून जनतेसमोर शरण येतील, फसविले आहे म्हणून. ज्यांना विचारले तेही नावाआधी डॉक्टर लावायचे, माझ्या या वाक्यावर ते घाबरून उठून आतल्या खोलीत निघून गेले, पळाले. मला अर्थात हे सहजच आठवले, अलीकडे भय्यू महाराज देखील नावाआधी डॉक्टर लावतात म्हणून, विचारा कि त्यांना हे असे आव्हान ते स्वीकारतील का म्हणजे ज्या विषयात त्यांना डॉक्टरेट मिळालेली कि मिळविलेली आहे, त्या विषयावर ते जाहीर चर्चा करतील का…शक्यता शून्य टक्के आहे पॉझेटिव्ह उत्तर येण्याची, प्रयत्न करायला काय हरकत आहे…


अलीकडे भाजपचे नेते आणि अभ्यासू प्रवक्ते अवधूत वाघ यांच्याशी फोनवर बोलतांना मी म्हणालो देखील कि एक दिवस तुम्ही सारे नेते तुमचे कार्यकर्ते माझी त्या गंगाजल मधल्या खलनायकासारखी म्हणजे मोहन जोशीसारखी सामुदायिक हत्या कराल, त्यावर ते हसले, म्हणाले, असे काही होणार नाही, तुम्ही ओरखडे तेवढे घेता, ज्यांच्याविरुद्ध लिहिता, ते आयुष्यातून उठले किंवा उध्वस्त झाले, असे तुमचे लिहिणे नाही, त्यामुळे तुमची सामुदायिक हत्या, हे असले काही घडणार नाही…

येथे अत्यंत यशस्वी उद्योगपती मनाने आणि पैशाने श्रीमंत श्री अवधूत वाघ यांना ते प्रवक्ते असूनही अभ्यासू यासाठी म्हंटले आहे कि एकतर ते बुद्धिमान तर आहेतच पण शब्दप्रभू आणि स्पष्टवक्ते देखील आहेत, वाहिन्यांवर कायम बोलणारे, चर्चेत भाग घेणारे किंवा त्या त्या पक्षाचे नीलम गोर्हे किंवा विश्वास पाठक यांच्यासारखे फार कमी व्यक्तिमत्वे आहेत कि जे अमुक एखाद्या 

विषयावर बोलण्याआधी त्यांची त्यावर तयारी झालेली असते….अर्थात हे वाहिनीवालेही काही कमी नाहीत त्यांचेही गावातल्या भटजीला बोलावण्यासारखे असते म्हणजे तेथे गावाकडे गरजू भटजींकडे अगदी वेळेवर जाऊन सांगितल्या जाते कि या आज आमच्याकडे मेहुण म्हणून जेवायला कि हे निघालेच म्हणून समजा. येथेही तेच, बहुतेक वाहिन्यांनी हे गृहीतच धरले आहे कि चर्चेत भाग घेणाऱ्यांना प्रसिद्धीची खाज असल्याने त्यांना बोलावणे गावाकडल्या भटजीसारखे आहे,फोन केला कि वाहिन्यांवर बोलणारे बहुतेक बहुसंख्य, कामे बाजूला ठेवून, वाहिन्यांच्या कार्यालयाकडे पळत सुटलेले असतात…वाहिन्यांनी जर कोणत्या विषयावर बोलण्यासाठी नेमके कोणास बोलवायला हवे याचे जर व्यवस्थित नियोजन केले तर हे असे त्या त्या विषयांचे भजे आणि हसे होणार नाही. ज्यांना साधा नागीन डान्स येत नाही त्यांना जर वाहिन्यांनी नृत्य कलेवर बोलण्यासाठी श्रीमती सुरेखा पुणेकर किंवा फुलवा खामकर शेजारी आणून बसविले तर कसे चालायचे, अर्थात असे एखादेच त्या अवधूत वाघ यांच्यासारखे जे चर्चेत भाग घेण्यापूर्वी नेमकी माहिती घेऊन बोलणे पसंत करतात म्हणजे उद्या जर अवधूत वाघ यांना सांगितले कि दिवस गेल्यानंतर पहिले सहा महिने स्त्रीला काय वाटते, त्यावरही ते राबडी देवी सारख्या चार प्रचंड अनुभवी बायकांशी बोलून, माहिती घेऊन वहिनीला आणि वाहिनीला सामोरे जातील, हातचे न राखता, परिणामांची पर्वा चिंता न करता नेमके स्पष्ट बोलावे ते भाजपातल्या अवधूत वाघ यांच्यासारख्या मोजक्या मोठ्या मंडळींनीच, त्यातून अशांचे अनेकदा राजकीय नुकसान देखील होते पण स्पष्ट बोलणाऱ्यांनी आपले स्थान नक्की स्वर्गातच पक्के केलेले असते. डावपेच खेळून खोटे बोलून फसवून लबाडी करून वामार्गानेच फक्त मोठे होता येते, हे ज्यादिवशी या राज्यातले प्रमुख मनातून काढून टाकतील, महाराष्ट्र त्या क्षणी जगातले खऱ्या अर्थाने महा राष्ट्र हे नाव मिळवून मोकळे होईल…


इकडे प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर जयंत पाटील यांनी अगदी जाहीर सभेत सत्काराला उत्तर देतांना सांगायचे कि यापुढे पक्षातल्या सामान्य धडपडणाऱ्या कार्यकर्त्याची कदर केली जाईल, दखल घेतली जाईल आणि भाषण ठोकून झाल्यानंतर त्याच  जयंत पाटलांनी विधानसभा किंवा विधान परिषद निवडणूक मग ती नाशिकची असो कि मराठवाड्यातली किंवा कोकणातली, कार्यकर्ते दूर उभे आणि सुनील तटकरे सारखी घराणे पुन्हा सत्तेत आणायचे, हे असले सारे नेते, सतत डावपेच खेळणारे आणि राज्याला लुटून खाणारे, कसे मराठींचे भले व्हायचे…

तूर्त एवढेच.


पत्रकार हेमंत जोशी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *