पार्थ पवार : पत्रकार हेमंत जोशी

पार्थ पवार : पत्रकार हेमंत जोशी 

आपले स्वतःचे तारुण्य शाबूत राखणे अजिबात वाईट नाही. पण पोटची मुले देखील मोठी झालेली आहेत, केव्हाच वयात येऊन त्यांचे वयात येण्याचे वय देखील उलटून गेलेले असतांना जर आई वडिलांचेच तारुण्यातले नको ते छंद जोपासणे सुरु असेल तर अशा घरातली मुले कायम बंड करण्याच्या अवस्थेत असतात किंवा मायबापाचेच तारुण्यातले धंदे जर संपत नसतील तर पुढली पिढी व्यसनेच्या आहारी जाते. उद्या समजा राष्ट्रवादीच्या जयंत पाटलांची मुले लग्नाची असतील आणि जयंतरावांचेच येथे तेथे तोंड मारणे सुरु असेल तर अशा घरातल्या मुलांना नैराश्य फ्रस्ट्रेशन येते त्यातून त्यांच्या विविध समस्या पुढे निर्माण होतात, अशी पिढी स्वतःचे मोठे नुकसान करवून घेते. घरात बापाचे लक्ष नसलेली पैसे खाणाऱ्यांची ऐय्याशी करणाऱ्यांची पुढली पिढी मोठ्या विचित्र मानसिक अवस्थेत जगते, व्यसनांकडे अनेकदा हमखास वळते…


जयंत पाटील तसे आहेत असे येथे मला म्हणायचे नाही सहजच उदाहरण दिले. पार्थ पवार यांच्या मनातली अस्वस्थता हि अशाच पद्धितीची होती काय, त्यावर जाणून घेणे अत्यावश्यक ठरते. होय, पार्थ किंवा त्यांचे बंधू, नेमके आयुष्यात काय करावे या दबलेल्या अवस्थेत असावेत कारण अजित पवारांचे स्वतःवरच एवढे प्रेम कि मुलांचे नेमके काय करावे त्यावर त्यांनी फारसे लक्ष दिले असावे वाटत नाही, विशेष म्हणजे मुलांमध्ये राजकारणात अजितदादांच्या पुढे जाण्याची क्षमता असतांना सुद्धा हे असे घडत होते. आता एक बरे झाले, पार्थ अजित पवार राजकारणात आले. अत्यंत अत्यंत महत्वाचे म्हणजे यावेळी स्वतः अजित पवारांनाच याची जाणीव झाली कि काहीतरी वेगळे करवून दाखविण्याचे त्यांच्या मुलांचे वय झालेले आहे त्यातून या लोकसभा निवडणुका दरम्यान अजितदादा पार्थ यांच्याबाबतीत त्यांच्या राजकीय करिअरच्या बाबतीत खूपच सिरीयस आहेत हे अलीकडे पदोपदी जाणवते, अजित पवार यांच्या स्वभावातला, घरातला हा बदल नक्की कौतुकास्पद आहे. देर आये दादा लेकिन दुरुस्त आये. उद्या पार्थ अजित पवार निवडणुकीला उभे राहिलेत तर निवडूनही येतील खासदारही होतील याचे मुख्य कारण पार्थ यांचे वागणे कोठेही विचित्र उर्मट वात्रट नाही ते कार्यकर्त्यांना, विशेषतः वडीलधाऱ्यांना अतिशय मानसन्मान देऊन बोलतात, वागतात, समोरच्या माणसाला एका क्षणात आपलेसे करतात आणि निर्माण केलेले संबंध जपण्याची वाढवण्याची त्यांची स्वतःची अशी खास आणि चांगली पद्धत आहे..


www.vikrantjoshi.com


शरद पवार आज राजकारणात आहेत, अजित पवार देखील राजकारणात आहेत पण उद्या हे दोघे जरी निवृत्त झाले तरी पार्थ पवार यांचे इतर नेत्यांच्या अनेक मुलांसारखे होणार नाही कि बापाचे आजोबांचे राजकीय अस्तित्व संपल्याने आता पार्थ यांचा देखील ‘ राहुल महाजन ‘ झालेला आहे. अजिबात तसे होणार नाही, त्यांची काम करण्याची स्वतःची अशी वेगळी पद्धत ते डेव्हलप करताहेत त्यात ते यशस्वी होऊन आदित्य ठाकरे पद्धतीने ते पुढल्या पिढीवर नक्की छाप मारून वेगळे होतील. त्यांनी आता लग्नाच्या बेडीतही अडकायला हरकत नाही अर्थात आदल्या पिढीची हौस मिटली कि पुढल्या पिढीच्या लग्नाचा विचार नक्की होतो. अन्यथा पुढल्या पिढीने देखील डावखर्यांच्या मुलांसारखे निर्णय घ्यावेत, स्वतःच स्वतःचे उरकून घ्यावे…


अचानक आलेला प्रचंड काळा पैसा, लहानपणी किंवा ऐन तारुण्यात दाबल्या गेलेल्या भावना त्यातून आमच्या पिढीने मोठा धुमाकूळ घातला, घालताहेत. स्वतःचे शौक पूर्ण करता करता आम्हाला घरी द्यायला वेळ उरलाच नाही त्यामुळे आम्ही मजा मारतोय पुढल्या पिढीकडे होणारे दुर्लक्ष हे लॉटरीच्या तिकिटासारखे झालेले आहे म्हणजे मुले चांगली निघालेत तरी ती ऐय्याशी करणाऱ्या मायबापांची लॉटरी समजावी पण लॉटरी हजारात एखाद्यालाच लागते, बहुतेक नवश्रीमंत झालेल्या घरातली मुले देखील व्यसनाधीन झालेली भरकटलेली आढळतात त्यामुळे आपण हे आपल्या आयुष्याचे काय करून घेतले, याचे मायबापांना पुढे वाईट वाटते, तोवर वेळ निघून गेलेली असते. म्हणून एकच सांगणे, स्वतः नक्की मजा मारा पण पैदा केलेल्या मुलांची त्यांना निदान घडविण्याची आपलीच जबाबदारी असते हे बेधुंद जगणार्या मायबापांनी विसरता कामा नये. बहुतेक घरात पाश्चिमात्य वातावरण घुसल्याने मोठी विचित्र अवस्था राज्यात सर्वत्र, घराघरात आहे, काळजी वाटते. मला आवडलेली माणसे सहसा समाजालाही मनापासून आवडतात जसे देवेंद्र, उद्धव तसे पार्थ देखील सर्वांचे आवडते नेते असतील…

तूर्त एवढेच :

पत्रकार हेमंत जोशी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *